तुझ्याशी खूप बोलावे वाटते
पण शब्द चुकण्याची भीती वाटते
तुझ्याशी खूप मैत्री करावी वाटते
पण विरहाची भीती वाटते...
तुझ्या खूप जवळ यावे वाटते
पण तोल सुटण्याची भीती वाटते
तुझा तो मन भुलविणारा चेहरा
मला अस्वस्थ करतो
पण त्याचे उत्तर देण्याची भीती वाटते...
तुझ्या सहवासात मी नाही याची उणीव भासते
पण तू माझ्या आयुष्यात आहे याची
मला सतत जाणीव असते
तुझी स्तुती शब्दात करावी वाटते
पण तुझ्या पुढे शब्द अपुरे पडतात....
तुझ्या पुढे जग सोडावे वाटते
पण समाजाची भीती वाटते
तुझ्या याच गुणांवर मी प्रेम करते
पण तुला सांगण्याची भीती वाटते....
तुझी माझी मैत्री अशीच सुगंधी राहो
अशी मी जन्मो जन्मी प्रार्थना करते
तूच संग मला हे प्रेम आहे कि मैत्री
तुला काय वाटते....???
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment