Wednesday, September 30, 2009

ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!


जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील

तुला माझी आठवण होईल

तुझ्याही डोळयांत तेव्हा

माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या

तुला एकांतात कवटाळतील

तुझ्याही नजरा तेव्हा

माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील

तेव्हा तुला मी दिसेन...

त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत

तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील

तुझ्याही नजरेत तेव्हा...

माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू

तेव्हा तुझ्यावरच हसतील

कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना

ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

कुणावर इतकेही प्रेम करु नये

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये


की आपल्याला त्याची सवय व्हावी

तडकलेच जर ह्रुदय कधी

जोडताना असह्य वेदना व्हावी



डायरीत कुणाचे नाव इतकीही येऊ नये

की पानांना ते नाव जड व्हावे

एक दिवस अचानक त्या नावाचे

डायरीत येणे बन्द व्हावे



स्वप्नात कुणाला असेहि बघु नये

की आधाराला त्याचे हात असावे

तुटलेच जर स्वप्न अचानक

हातात आपल्या काहिच नसावे



कुणाला इतकाही वेळ देऊ नये

की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा

एक दिवस आरशासमोर आपनास

आपलाच चेहरा परका व्हावा



कुणाची इतकीही ओढ नसावी

की पदोपदि आपण त्याची वाट बघावी

आणि त्याची वात बघता बघता

आपलीच वाट दीशाहीन व्हावी



कुणाचे इतकेही ऐकू नये

की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा

आपल्या ओठांतुनही मग

त्याच्याच शब्दांचा ऊच्चार व्हावा



कुणाची अशीही सोबत असू नये

की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी

ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने

डोळ्यात खळकन अश्रु जमावेत



कुणाला इतकीही माझी म्हनू नये

की त्याचे मीपण आपन विसरून जावे

त्या संभ्रमात त्याने आपल्याला

ठेच देऊन जागे करावे



पण.........

कुणाच्या इतक्याही दूर जाऊ नये

की आपल्या सावलीशिवाय सोबत काहीच नसावे

दूर दूर आवाज दिला तरी

आपले शब्द जागीच घूमवेत

आपले शब्द जागीच घूमवेत...............

****माझ्यासाठी****

सारखे सारखे आम्हीच

मारावे का तिच्यासाठी

जरा तिलाही झुरुदे

माझ्यासाठी.



कारणे शोधावी भेटण्यासाठी

बहाणे करावे बोलण्यासाठी

आम्हीच का तडपावे तिच्यासाठी

जरा तिलाही झुरुदे माझ्यासाठी.



दिवस उजाडावा तिच्यासाठी

रात्र व्हावी तिच्या स्वप्नासाठी

हे आम्हीच ठरवावे कशासाठी

जरा तिलाही झुरुदे माझ्यासाठी.



आशा एकच मनाची

तिच्या माझ्या मिलनाची

पूर्ण होण्याच्या पायवाटा

जरा तिलाही शोधुदे माझ्यासाठी........

तुझं ते निरागस बोलणं

तुझं ते निरागस बोलणं


मला खुप आवडतं ,

चारचौघातही तुझ वेगळेपण

अगदी आपसुखच जाणवतं!!!



डोळ्यात तुझ्या दिसुन येतो

माझ्यावरचा अतोनात विश्वास,

खळखळून तुझ हसणं

खरंच वाटतं झकास!!!



तुझा तो मिश्कीलपणा

आणि ते खोड्या करणं,

जरा जरी रागावलो मी तरी

चट्कन डोळ्यातनं पाणी काढणं!!!



माझा प्रत्येक शब्द

तु किती सहजपणे जपतेस,

सांग बरं ही कला

कुठ्ल्या शाळेत शिकतेस?



तुलाही फुलाप्रमाणे जपण्याचा

मी आटोकाट प्रयत्न करतोय,

अभिमान वाटतोय मला माझा

की मी तुझ्यावर प्रेम करतोय!!!

आहे एक वेडी मुलगी......!

आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला


सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?





आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,

माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?





तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,

पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!







माहित आहे तिला, आहे मी खुप shy,

एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY?





''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,

आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ!

Friday, September 18, 2009

गालावर खळी........

गालावर खळी......

गालावरी खळी डोळ्यात धुंदि
ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो एका ईशा-याची
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे

कोणताहा मौसम मस्त रंगाचा
तुझ्यासवे माझ्या जिवनी आला
सुने सुने होते किती मन माझे
आज तेच वाटे धूंद मधुशाला
जगण्याची मज आता कळते मजा
नाहि मी कोणाचा आहे तुझा
सांगतो मी खरे खुरे तुझ्यासाठी जीव झुरे मन माझे थरारे
कधी तूझ्या पुढे-पुढे कधी तुझ्या मागे-मागे करतो मी ईशारे
ए जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे

तुझ्या पापण्यांच्य़ा सावलीखाली
मला जिंदगीही घेऊनी आली
तुझ्या चाहुलीची धुन आनंदि
अंतरास माझ्या छेडूनी गेली
जगण्याची मज आता येई मजा
तू माझे जिवन तू माझी दिशा
आता तरी माझ्यावरी कर तुझी जादूगीरी हुर-हुर का जिवाला
बोल आता तरी काहि तरी भेट आता कुठे तरी कसला हा अबोला
ए जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे

आयुष्यात प्रेम करायचय मला..

आयुष्यात प्रेम करायचय मला..

दुर कुठेतरी समुद्र किनारी हातात हात घालून बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना भविष्याचे हितगुज करायचय मला...

माझ्या मांडीवर डोके ठेऊन तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहऱ्याकडे पहाताना स्वतःशी स्मित करायचय मला...

तिच्या सोबत थोडं दुष्टपणे वागुन तिला रागाने लालबुंद करायचय मला,
तिची आसवे पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय मला...

आयुष्यतील माझं शिखर तिच्या सोबतीने चढायचय मला,
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीचा आनंद तिच्या डोळ्यांतून व्यक्त झालेला अनुभवायचाय मला...

ती माझ्यापासून दूर जात आसताना ती नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना डोळ्यांवाटे मुक्त करायचय मला,
तिच्या सोबत माझे आयुष्य झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला...

आयुष्यात प्रेम करायचय मला....

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या
आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे

आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा

आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची

एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस

जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी

आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही

आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील

बा॓लताना जरा सांभाळून...

बा॓लताना जरा सांभाळून...
बा॓लताना जरा सांभाळून...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓,
फरक फक्त एवढाच की,
तलवारीन॓ मान तर,
शब्दांनी मन कापल॓ जात॓
जरी तलवारीच्या जखम॓तून रक्त
आणि शब्दांच्या जखम॓तून अश्रू...
य॓त असल॓ तरी,
दा॓घांपासून होणारी व॓दना मात्र सारखी असत॓.
म्हणून सांगतो शब्द जरा सांभाळून...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓
शब्दच माणसाला जोङतात आणि
शब्दच माणसाला तोङतात
ह॓ शब्दच आह॓त, त॓ कधी रामायण
तर कधी महाभारत रचतात
तुझ्या एका शब्दावर माझ॓ सर्वस्व अवलंबून आह॓
तुझ्या एका शब्दावर माझ॓ हसण॓
तर, तुझ्या एका शब्दावर
माझ॓ रडण॓ अवलंबून असत॓.
म्हणून म्हणतो शब्द जरा सांभाळून...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓...

आज वेळ नाही....

आज वेळ नाही....
आज वेळ नाही....
अमाप सुख आहे सगळ्यान्च्याच
पदरात पण ते अनुभवयला
आज वेळ नाही.....

आईच्या अन्गाईची जाणिव आहे
पण आईला आज
'आई' म्हणायलाच वेळ नाही.....

सगळी नाती संपवुन झालीत
पण आज त्या नात्यान्ना
पुरायलाही आज वेळ नाही.....

सगळ्यान्ची नाव मोबाईल मध्ये सेव आहेत
पण प्रेमाचे चार शब्द
बोलायलाही आज वेळ नाही.....

ज्या पोराबाळान्साठी मेहनत दिवस-रात्र करतात
त्यान्च्याकडे क्षणभर
बघायलाही आज वेळ नाही....

सान्गेल कोण कशाला दुस-याबद्द्ल
जेव्हा ईथे स्वतःकडेच
बघायला वेळ नाही......

डोळ्यावर आलीये खुप झोप
पण आज कोणाकडे
झोपयलाही वेळ नाही.....

ह्रुदयात वेदनान्चा पुर वाहतोय
पण त्या आठवुन
रडायलाही वेळ नाही....

परक्यान्ची जाणिव कशी असेल
जर ईथे आपल्याच माणसान्साठि वेळ नाही...

आयुष्यात पुढे जाण्यासाठी चाललेल्या
या संघर्षात जरा माग वळुन
पहायलाही वेळ नाही........

अरे जीवना तुच सान्ग
जगण्यासाठीच चाललेल्या या धावपळीत
जगायलाच आज वेळ का नाही?

आलाय प्रेम

आलाय प्रेम
आलाय प्रेम आणि विश्वासाचा हा उत्सव गुलाबी..
आनंदाचे इन्द्रधनु उमटो तुझ्या आयुष्याच्या नभी..

प्रेमाने सजो तुझे जीवन..
जसे पारिजातकाच्या सडयाने फुलते अंगण..

मिळो तुला ती नजर,जी करेल तुझ्या ह्रदयात घर..
साथ निभाव नेहमीच,नको करु दुनियेची फिकर..

गुलाब आणि गिफ्ट्स ही होतील जुने..
अंतकरणातून साद दे,जोड तू मने..

स्वीकार तू नकार ही,जे असेल तुझे..ते तुला मिळेलही
ऐक पण..
'प्रेम दिन' जरी एक दिवसाचा..
'ख-या' प्रेमाचा उत्सव जीवनभराचा..

अजुनही आठवतयं मला ...

अजुनही आठवतयं मला
अजुनही आठवतयं मला
तो लिंबोणीच्या फांदीचा झुला
त्यावर बसून हसत म्हणायचीस..
"मुर्खा, बघतोस काय झुलव ना मला.."

अजुनही आठवतयं मला
तो तुला आवडणारा पाऊस
मला विसरून म्हणायचीस,
"पावसा, बघतोस काय चिंब भिजव ना मला.."

अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारं ते फुलपाखरू
त्याकडे हात लांबवत म्हणायचीस..
"पाखरा, बघतोस काय तुझ्या पाठीवर घे ना मला"

अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारं ते बेडकाच पोहणं
त्याला हुश्श करून म्हणायचीस..
"बेडका, पाण्याचा ठाव कुठे आहे सांग ना मला"..

अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारं ते सोनचाफ्याच झाडं,
त्याला पाहुन लाजून म्हणायचीस..
"चाफ्या, माझ्या लग्नात तुझ्या फुलांची माळ घालीन त्याला.."

अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारा तो बर्फाचा गोळा..
तो खाताना ओठांवरून जिभ फिरवत म्हणायचीस..
"गोळावाल्या, अजुन थोडासा गोड कर ना याला"

अन आजसुद्धा तु तशीच आहे,
हे पानीपुरी खाताना पाहीलं
अन तेव्हा माझं मन खरचं,
तुझ्या त्या छकुल्या कुशीला कवटाळत राहीलं.


मैत्रिचा हा नाजुक धागा दोघांनीही आता सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म...यास दोघांनीही पाळायला हवा
येणारे येतात अन जाणारे जातातही... मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि सहज होवुन जाते ... करायची ठरवली तरी ती करता येत नाही
तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही...
म्हणुनच वाटतं...तुझ्या माझ्या मैत्रिला भय नाही

Thursday, September 17, 2009

मेल्यानंतर…..

मेल्यानंतर…..
January9
स्वप्न माझे, मी गेल्यानंतर काय हवेमला हवे ते तुला आज जे हवे हवे….चिअर्स करूनी रडणारा तो ग्लास हवाघाटावरती घोटामधले प्राण हवे….!!
मेल्यानंतर हिशोब करणे शक्य असेजगताना गणिताचे केवळ भय असेबघतो मी आले गेले कोण कोण तेमला आता इथे कुणाचे भय नसे….
मेल्यानंतर खोटे खोटे रडले कोणदिसतील मजला मित्रच माझे.. दुसरे कोण ?हाय गेला रे…. पांड्या आता उडुनी गेलागुत्त्यामधले पैसे आता देइल कोण ?
मेल्यानंतर माझ्या सौ रडतील आताआठवण येइल तिला माझी येता जाताकरेल काय पण सांगेल कुणाला…भांडायाला हक्काचा मी निघुन जाता..!!
मेल्यानंतर कळेल मला जगणे सारेहातामधे येतील माझ्या चंद्र नी तारेअरे सख्या रे उशीर झाला कळता कळताबदलून गेल्या दिशाही सगळ्या वळले वारे….

फ़ुल स्टॉप नाही तर निदान कॉमा तरी…..

फ़ुल स्टॉप नाही तर निदान कॉमा तरी…..
July16
फ़ुल स्टॉप नाही तर निदान कॉमा तरी…..
शब्द धरताहेत भोवताली फ़ेरती येणार.. जन्म घेणार म्हणूनलेखणी उतावीळ सळसळते आहेती येणार.. जन्म घेणार म्हणूनशुभ्र को-या कागदाचा कोरा वासउर भरून घेतोय श्वाससमरस अर्थगंधात होण्यासाठीती येणार.. जन्म घेणार म्हणूनसारी तयारी झालीय..आता फ़क्त वाटती येणार.. जन्म घेणार म्हणूनमलाही येऊ घातल्यात कळा आतल्या आतआत्ता फ़ुटेल वाचा…आत्ता होईल जन्मएका नव्या कवितेचा…पण…दाबून ठेवल्यात त्या भावना आतल्या आतल्यातकळा येऊच दिल्या नाहीत पुढे..तिथेच थोपावलेत विचार,शब्द, लेखणी, कागद, अर्थ…नकोच आता
पॉप्युलेशन(कवितांचं) फ़ार वाढलय..कुणितरी कुठेतरी थांबायलाच हवं ना…फ़ुल स्टॉप नाही तर निदान कॉमा तरी….

तू अशी तू तशी…

तू अशी तू तशी…
November15

चमचमत्या किनारीची,तु कोरीव चांदणी,गोर्‍या चेहर्‍यावर तुझ्यानांदते हास्य नंदिनी
तू अशी कोमल,फुलांची गंधराणी,तुला पाहता दरवळे,सुंगध मनोमनी..
तू अशी शीतल,आळवावरचे पाणी,तुला छेडीताअंग घेतेस चोरूनी ..
तू अशी रंगाचीरंगेल ओढणी,टिपक्यांच्या गर्दित,नक्षी लपेटूनी..
तु अशी मऊ,मखमल मृगनयनी,ठाव तुझ्या कस्तुरीचा घेता,फिरतो मी वेड्यावानी..
तु अशी ओलीसरसर श्रावणी,चिंब देहावरनितळले मोत्याचे मणी..
तु अशी स्वप्नांची,ऐकमेव राणी,तुला आठवतागातो मी गाणी..
तु अशी तु तशीजिव गेला मोहरूनी,छेडता तुला अवचितगेलीस तू लाजूनी..

जेव्हा मला कोणी माझ्यासार्खा भेटतो,

जेव्हा मला कोणी माझ्यासार्खा भेटतो,
November25
मला कधी कळलच नाहीकी नेमक मला दुख कशाच आहे?ती मला सोडुन गेली याच्..कीती मला सोडुन गेली म्हनुन मलादुख झाल हे जगाला कळल नाही याच….
मेलेल्या बापालाही काही काळानंतर,माणुस विसरतोच ना….मग पहिल प्रेम विसरण कठिण का??कदाचित आपल्यालच ते विसरायच नसत
सतत वाटत असत की सर्वाना कळाव,मी किती सहन केलय मी चांगला आहे..प्रश्न ही माझाच असतो आणिउत्तर ही माझेच……
फक्त मी त्या व्यक्तीच्या शोधात असतोजो मला हव ते उत्तर सांगेल…………जेव्हा मला कोणी माझ्यासार्खा भेटतो,तेव्हा वाटत चला कुणीतरी मला समजत.किंबहुना …………………..त्यालाही तसच वाटत असेल..
वाक्यही एकच असत आणि विचारही एकच असतात,फक्त ते वेगवेगळ्या ओठांतुन निघतात बस एवढेच……….

काय सांगु तिच्या बद्दल

काय सांगु तिच्या बद्दल
काय सांगु तिच्या बद्दलमलाच काही कळत नाही
बोलायच खुप असत मलापण बोलणं मात्र जमत नाही.काय सांगु तिच्या बद्दलमलाच काही कळत नाही
दुखवल जात मलादुखवता मात्र येत नाही.काय सांगु तिच्या बद्दलमलाच काही कळत नाही
खोट खोट हसता हसतारडता मात्र येत नाही.काय सांगु तिच्या बद्दलमलाच काही कळत नाही
दुःखात सुख अस समजतादुःख ही फिरकत नाही.काय सांगु तिच्या बद्दलमलाच काही कळत नाही
बरोबर बरेच असतातपण एकटेपणा काही सोडत नाही.काय सांगु तिच्या बद्दलमलाच काही कळत नाही
चार शब्द सांगतेपण कोणी ऐकतच नाही.काय सांगु तिच्या बद्दलमलाच काही कळत नाही
मांडायचा प्रयत्न करते…..पण शब्द ही मला पुरत नाहीत

आज असा मला वर द्या…

आज असा मला वर द्या…

नाही माझ्याकडं सागरासारखं गहीरेपणनाही माझं नदीसारखं निर्मळ दर्पणया भवसागराचा तुमच्यासारखाच एक थेंब मीआजन्म मला ईथ सुख-दुख:चा सौदागर होऊ द्याप्रयत्न करुन मला यश-अपयशाच्या या सागरात पोहु द्या
ऊमलतोय लेखणीचा एक अनोखा गंध घेउन मीनका लादु आत्ताच नियमांचा असा बंध तुम्हीरोज नव्या रंगाची उधळण या रानात करायचीये मलापण त्याआधी मला नीट तरी फ़ुलू द्याशब्दसौंदर्याने नटलेल्या या जगात मलाही थोडं लिहु द्या
खुललेत आज माझ्यासाठी दार य़ा मोकळ्या नभाचेफ़ुटलेत आजच पर मला नव्या दमाचेनियमाच्या कात्रीने नका हो त्यांना असे कापुएखाद्या नकोश्या फ़ांदीसारखा नका हो मला असे छाटू
व्हायचय या नीर तळ्याचा खळखळता आवाज मलाचढवायचाय या मनावर आत्मविश्वासाचा नवा साज मलाफ़क्त तुम्ही थोडा उत्साहाचा, विश्वासाचा स्वर मला द्या“मिळो शिघ्र दर्शन मज विजयलक्ष्मीचे“आज असा मला वर द्या…….आज असा मला वर द्या…

स्वप्नांची परीक्रमा…..!!!

स्वप्नांची परीक्रमा…..!!!
सांभाळते आता मीच माझं स्वप्नं….देणार नाही तूला…..चुकूनही उसनं….जमतील तसे फटकारे मारीन ब्रशचे…..मागणार नाही तूझ्याकडे आभाळ रंगाचे…..!!माझी स्वप्नं अलगद पापण्यांवर ठेवेन माझ्या….मागीतली तरी तु ……देणार नाही तूला….
तशी आधीपसूनच जपते …..फूलपाखरं स्वनांची….फूलपाखरंच ती रे……एकजात हळवी….!!!पायवाट होती फूलांची……काळजात छळवी….स्वप्नांचे वेचे घातले ओच्यात माझ्या…..दिली गर्भरेशमी नक्काशी….तूच ना रे पदराला….
बघून येते माझी मीच आधीसारखी…नाहीतरी एकटीच होते….राहीन एकटी…येवू नकोस… आता तिथेच तु थांब…..अस्साच रहा उभा….मी करून येते स्वप्नांची परीक्रमा…..फूलांसारखी स्वप्ने येतात का रे आभाळाला…??
कारण…..कोणाच्यातरी स्वप्नांनी आज…केली म्हणे…..आत्महत्या…!!!

हसण्यासाठी कितीदा रडलो

हसण्यासाठी कितीदा रडलो
इवलीशी इच्छाघटकाभर कुणीसाथ असावेसाथ हसावेसाथ रडावेओठांवरती स्मीत फ़ुलावेडोळ्यांवाटे गात असावेतळहातावर हात असावे
या ईच्छेने किती झुलवलेकिती फ़सवलेहसण्यापायी किती रडवले
वाट पाहुनी शीळा बनलोप्रकाश शोधत कितीदा जळलो
आज भॆटलीस अशी अचानकत्या शीळेचे सोने झालेत्या राखेतून फ़िनिक्स बनलोअन आकाशी भुर्र उडालो.

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
थेंब अश्रुंचे दोन गालावरती..कसे पुसायाचे राहून गेले..लपविलेले दु:ख माझेचार चेहरे पाहून गेले....सांगितले बरेच काही..आनंदाश्रु अन काही बाही..अर्थ सुकल्या आसवाचा परीलावायचा तो लावून गेले...लपविलेले जे दु:ख माझेचार चेहरे पाहून गेले..
पुसले डोळे.. हसून खोटेचाचपले कितिक मुखवटेमुखवट्याला चेहर्‍यावरतीचढवायाचे आज राहून गेले.लपविलेले जे दु:ख माझेचार चेहरे पाहून गेले..
हसून आता.. विसरून सारेवावरते जणू.. उनाड वारेहसताना पुन्हा भरले डोळेपापणीतून अश्रु वाहून गेले.लपविलेले जे दु:ख माझेचार चेहरे पाहून गेले....थेंब अश्रुंचे दोन गालावरती..कसे पुसायाचे राहून गेले..लपविलेले दु:ख माझेचार चेहरे पाहून गेले..

Tuesday, September 15, 2009

वा-यासवे लहरणारी


July16

वा-यासवे लहरणारी
मुक्त लहर मी
अबोल अव्यक्त फुलणारी
मुग्ध अबोली मी
आसमंती दरव्ळणारी
कस्तुरी मी
हसणारी, हुरहुरणारी
भिरभिरणारी, थरथरणारी
सोनसळी किरणांची
प्रतिमा मी
मी मुग्धा मी स्निग्धा
चांदणे उधळीत जाणारी
चंदनशलाका
मागे येशील
तर उडून जाईन
कापरासारखी
ये ये म्हणशील
मुळीच येणार नाही
करशील तू आराधना जेव्हा
तपस्वी होऊन
आणशील मला वेड्या
चांदण्यातून खेचून
सख्या तुझी, तुझीच रे मी
शुभ्र प्रतिभा !!

वा-याच गाणं..


July20

वा-याच गाणं..
लवती पानं..
धुन मेघात साचली
भिजली वाट..
गंधाची लाट..
पहाट स्वैर नाचली

ओला काळ…
सरींची माळ…
आभाळ जातया उतु
शहारे धरा..
स्पर्श बावरा..
जरा अल्लडसा हा ऋतु

झरलेच क्षण..
विरलेच मन..
अन ठसे तिच्या बोटांचे
वाहते कोण?..
मागते कोण..?
दोन थेंब तिच्या ओठांचे

भिजते ती..
सजते ती…
ती गोड अशी लाजते
नशा नजरेत..
धुंद नशेत…
डोळ्यात मंद न्हाहते

मस्तीतली चाल..
कोठला ताल?..
सवालही हा ओला
वा-यात गाणं ..
वारंच गाणं..
गाणं रुणझुणता झुला

मन पावसात चिंब न्हाले..


July20

मन पावसात चिंब न्हाले..
मन गारव्यात धुंद झाले..
पावसात, गारव्यात मन
आठवात गुंग झाले…….ही सरसरती सर ओली..
आभाळाला तुच दिली..
ती झेलताना, पेलताना
उरातुनी वीज गेली..
लख्खलख्ख चमकुनी मन
ओंजळीत बंद झाले….
मन पावसात चिंब न्हाले..

हा दरवळता ऋतु गार..
वा-यावरी नशा स्वार..
सळसळता अन छळता
फ़ुलांवरी झाला वार ..
श्वास दग्ध घेऊनी मन
पाकळीत गंध झाले…
मन पावसात चिंब न्हाले..

सये अंगणात सुर येई..
तो वा-यासवे दुर जाई..
गुणगुणतो, ऋणझुणतो
हिरवा रानी पुर वाही..
पानावरी झरुनी मन
थरथरता थेंब झाले….
मन पावसात चिंब न्हाले..
मन गारव्यात धुंद झाले…

पहाटेचा प्राजक्त………


August1

पहाटेचा प्राजक्त………

निळे निळे आकाश
खाली हिरवे गालीचे
उरतो मधला आसमंत
आणि समुद्रा निळाशार

असते कधी पहाट
खूपच गोजिरवाणी
त्यासाठी जावी लागते
रात्र उधाणलेली

सूर्योदयाची लाली माझ्या
गाली अशी उतरावी
पण सूर्यास्ताची रक्तिमा
त्याच्या मनी फुलावी

चंद्र शांत,शीतल
रात्रीचा अनभिषिक्त राजा
चांदण्या आहेतच ना
जीव त्याच्यावर लावायला

सूर्य दिवसभर आकाशात
तळपत तळपत राहणार
आणि एकडे आम्हालाही
जळवत जळवत ठेवणार

बरसलेला पहाटेचा प्राजक्त
फूललेली रात्रीची रातराणी
पण त्याने आणलेल्या
मोगर्‍याला कशाची सर नाही

येईलच तो आता
माझ्या जीवाचा राजा
घेऊन मला कवेत तो
म्हणेल,उशीर झाला का??

शिरल्यावर त्याच्या मिठीत
कशाचे नाही भान
उरतो मोगर्‍याचा सुगंध
आणि उधाणलेली रात

बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!!


July7

बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!!

माझ्या गालावरची खळी तुझ्या ओठाआड़ दडताना
तुझ्याच प्रेमाच्या मोहात माझे प्रेम पडताना
बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!

माझा गेलेला तोल तू हलुवारपणे सावरताना
मनातला गोंधळ हलक्या स्पर्शाने आवरताना
बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!

तुझ्या बाहुपाशांत मी सुख-स्वप्नं रंगवताना
मावळत्या सुर्यालाही आशेचे किरण पांगवताना
बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!

दुरवर उभा राहून तू माझ्याकडे पाहून हसताना
मृगजळ असुनही सारं काही सत्यात भासताना
बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!

पोटातलं दुःख लपवुन ओठात हसू ठेवून वागताना
तरीही माझ्या सुखासाठी देवाकडे मागणं मागताना
बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!

पावसाच्या सरींच्या प्रेमात पडलेल्या चातका सारखं आनंदात न्हाताना
माझे दुखा:श्रुही तुझ्या आनंदात गातांना
बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!

माझी सारी स्वप्नं तुझ्याबरोबर पूर्ण झालेली पहातांना
सारी सुखं आपल्या समोर हात जोडून उभी राहतांना
बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!

आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……………..


July7

आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……………..

आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव………….
प्रेमासाठि जगाव………..
प्रेमाखातर मराव…………….

त्याच्या एका हास्यावरती
अवघं विश्व हरावं
अन अश्रुच्या थेंबालाहि
डोळ्यात स्वत:च्या घ्यावं….
दुखाची भागी होऊन ….
सुख त्याच्यावर उधळाव………………
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….

तु आणि मी हे व्याकरण
प्रेमात कधीच नसावं………….
आपलेपणाच्या भावनेतच
सार मी पण सराव…..
एकमेकांच होऊन
एकमेकांना जपाव………
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….

मधुर त्याच्या आठवणीमध्ये
रात्र - रात्र जागावं……….
अन चुकून मिटताच पापण्या
स्वप्नात तयाने यावं..
बहरल्या रात्रीत चांदण्या
त्याच्या विरहात झुराव…….
पण खरच……………..

आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर करावं……….

आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….

आणी मग बोभाटा गावभर..


July8

आणी मग बोभाटा गावभर..

कुणाला तरी समजेल उगीच
आणी मग बोभाटा गावभर..
चोरुनच भेटत राहु आपण
क्षिताजाला आभाळ भेटते ना तसे अगदी
उगाच ढगासारखे भेटायचो
अन पावसात मात्र आपल्यासोबत सारेच भिजायचे
कुणाला तरी समजेल उगीच
आणी मग बोभाटा गावभर..
मग आभाळात सोडुन, घरात वीजा पडायच्या
आणी नदीला सोडुन डोळ्यांनाच पुर यायचा
उगीच नंतर वाहुन जाण्यापेक्षा
आताच पुल सांभाळायला हवा
नाहीतर पुलावरुन पाणी जयच
आणी मग बोभाटा गावभर..
चार - दोन लोक ओळखायचे गर्दीत तुला मला
आणी मग हे चांदणस्पर्शी दिवस
वाळवंटच होऊन जातील

नको वाटतो रे रखरखीत उन्हाळा आता
पावसाच व्यसनच जडलय कोवळ्या वयात
हे व्यसन चोरुनच भोगुयात,
कुणाला तरी समजेल उगीच
आणी मग बोभाटा गावभर..

प्रेमात पडल्यावर


July8

प्रेमात पडल्यावर

प्रेमाचं कोडं
प्रेमाचं उत्तर
मिळुन सोडवणं
प्रेमात पडल्यावर..

प्रेमाची खुण
प्रेमाची चाहुल
प्रेमाचं स्वागत
प्रेमात पडल्यावर..

प्रेमाचे रंग
प्रेमाचे ढंग
प्रेमात संग
प्रेमात पडल्यावर..

प्रेमात हे
प्रेमात ते
प्रेमात काय-काय
प्रेमात पडल्यावर..

प्रेमात मी
प्रेमात तू
प्रेमात जग
प्रेमात पडल्यावर..

*तिला न जिंकता यावं इतकं मानवी हृदय पौलादी नाही रे


July8

*तिला न जिंकता यावं इतकं मानवी हृदय पौलादी नाही रे

ही कविता म्हणजे, प्रेमात हताश, निराश झालेल्या एका प्रेमवीराला, त्याच्या मित्रा कडून दिलेला सल्ला, नवी उमेध, नवी चेतना…….
.
.
प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती

भावना तुझ्या शुद्ध असतील, तर
तीही त्यात वाहून जाईल
मनावर अमृत सरी झेलत
तीही त्यात न्हाहून जाईल

विचार तुझा नेक असेल, तर
तीही तुझा विचार करेल
हृदयाच्या तिच्या छेडून तारा
सप्तसूरांचा झंकार उरेल

आधार तुझा बलवान असेल, तर
तीही तूझ्या कवेत वाहील
मग, कितीही वादळं आलीत
तरी प्रित तुमची तेवत राहील

आशा सोडण्या इतकं
जिवन निराशवादी नाही रे
तिला न जिंकता यावं इतकं
मानवी हृदय पौलादी नाही रे

पण, मित्रा जर ती नाहीचं आली
तरीही तू हार मानू नकोस
तू तर प्रामाणिकपणे खेळलास
आयुष्याला जुगार मानू नकोस

शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं
थांबत नाही ते कोणासाठी
घे भरारी पुन्हा गगनी
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.

पुन्हा एकदा ती परतली..तेव्हा


July12

पुन्हा एकदा ती परतली..तेव्हा

तिच्याविना आयुष्य जगण्यास असह्य झालं होतं,
तिच्यावाचून मन माझं सुन्न सुन्न झालं होतं..

स्वप्नही रातीला सोडून दुर गेली होती,
झोपेलाही डोळ्यात तिचं निघून जाणं सलत होतं..

चित्त थारयावर नाही म्हणून काही सुचत नव्हतं,
तिच्या आठवणीच्या पदराभोवती माझं काळीज घोटाळत होतं…

सारं काही नरकवेदनेच्या पलीकडचं हे एकाकीपण,
अन देहात फक्त तिच्या श्वासांच जगण शिल्लक होतं..

पण…. अचानक….

पुन्हा एकदा ती भेटली अशी एकांतात तेव्हा,
काळीज माझं भितीने धडधडत होतं…

पुन्हा एकदा आभासाच मृगजळ छळणार मला म्हणून,
मन माझं थरकापाने घाबरत होतं..

तेव्हा अचानक तिच्या त्या तळहातांचा स्पर्श झाला,
तसं अंग माझं रोमारोमातून शहारत होतं…

ती म्हणाली पुन्हा आली परतून मी तुझ्यासाठी,
हे सांगताना तिच्या डोळ्यातूनही थेंबांच येणं जाणं सुरूच होतं..

नाही विचारलं मी तिला कूठे होती ? का गेलीस सोडून ?
कारण तिचं येणं माझ्यासाठी एक नव्या जन्माच नवं विश्वचं होतं…

तेवढ्यात ती म्हणाली , “नाही मी राहू शकले तुझ्याशिवाय”
ते ऐकताना खरचं माझं वाट पाहण सफल ठरत होतं…

मग आली पावसाची सर धावून आमच्या भेटीला,
अन सारं काही विसरून ऎकमेकांच्या मिठीत आयुष्य पुन्हा अंकुरलं होतं…

सावरु शकलोच नसतो

सावरु शकलोच नसतो

July12

सावरु शकलोच नसतो

तुझा स्पर्श टाळ्ण्याचा
आज प्रयत्न करत होतो
कदाचीत त्यानंतर मी
स्वतःला सावरुच शकलो
नसतो मिठीत तुला घेण्याचा
प्रयत्नही करत नव्हतो
खरेच एकदम खरे प्रेम
तुझ्यावरती करत होतो

तु माझ्या जिवनाचा किनारा बनलीस
त्या वेळी विरहाचे गित
मी लाट बनुन गात होतो
तेंव्हाही तुझा स्पर्श टाळण्याचा
प्रयत्न मी करत होतो
तुला कवेत घेण्याची
हिम्मतही मी करत नव्हतो

तु बनलीस म्रुगजळ
मी शोधक नजर बनलो होतो
तु बनलीस कस्तुरीचा गंध
मी वाहणारा वारा आज बनलो होतो
तुझा स्पर्श टाळण्याचा
तेंव्हाही प्रयत्न करत होतो
तुला कवेत घेण्याची
हिम्मतही मी करत नव्हतो

नेहमीच तुमचाच

पट्टराणी..

पट्टराणी..

July22

..पट्टराणी..
————
करु नको माझ्याकडे तु गं अशी पाठ राणी..
सोडु का ग सांग तुझ्या चोळीची मी गाठ राणी..

जीव होतो कासावीस,तू गं अशी रुसताच..
पहा माझ्याकडे आणि हास ना ग एकदाच..
तुझ्या कुशेमध्ये पुरी सरु दे गं रात राणी…

राग इतुका गे आला,वर धरीला अबोला..
रात विरहात जाई.शिक्षा तुला आणि मला..
बोल ना ग माझ्याशी तु..बिलगुनि घट्ट राणी…

गुंफु दे गं हातामध्ये माझ्या तुझे दोन्ही हात
भिडु दे गं ओठालाही तुझे मधाचे गं ओठं..
लागु दे गं सुर आता..धुंद सप्तकात राणी…

दिस तर जातो जसा..रात नको विरहात..
मिठीमध्ये पाहु दे ना..मंद कोवळी पहाट..
वाटे मग मी गं राजा..तु गं माझी पट्टराणी.

न कळे माझे आयुश्य मजला

न कळे माझे आयुश्य मजला

August5

न कळे माझे आयुश्य मजला
सांग कोणता ठाव देवु तुजला

तुला पाहशी या डोहात
करे मी कौतुक तुझ्या रुपाच
नसे कोणताच चेहरा मला
ना लोभस ना मोहक
कुरुपही ना म्हणशी मला

लुटण्याचे रंग मनमुराद
जसा उषेचा किरण
अन रातीचा काळोख
ल्यालो मी जरि इंद्रधनुचे रंग
मी एक तो बेरंग

कोणी हसता मी हसत राही
कोणी रडता मी रडुन जाई
नाहीत माझ्या भावना थोर
नसेन मी भोगले दुख अपार
सुखाचे ही पाहिले ना दार
कोणते हास्य देवु तुला
मी तर एक उदासीन

माझे अस्तित्व नसे मला
विरघळुनी इतरांच्यात
शोधितो ध्यास नवा
देवु कोणता जन्म तुला
मरणाच्याही चक्रात नसे स्थान मला

लहरीतुन लहरतो
तरंगातुन तरंगतो
लाटातुन उसळतो
खळखळाटातुन खदखदतो
म्रुगजळातुन फ़सवितॊ
संथ होवुनी निस्तबध होतो
निसर्गाच्या किमयेने मी चालतो
तरी साथ मी देवु कशी तुला

न कळे माझे आयुश्य मजला
सांग कोणता ठाव देवु तुजला ….

एकदा आम्ही ठरवलं

एकदा आम्ही ठरवलं

August5

एकदा आम्ही ठरवलं
एकदा आम्ही ठरवलं
तिनं मी आणि मी ती व्हायचं
तिने माझ्यासारखं आणि
मी तिच्यासारखं वागायचं

मी रुसायचं गाल फ़ुगवुन
आणि तिने समजवायचं
ती गुदगुल्या करणार
मी खुदकन हसायचं

हसता हसता पाणि येइल डोळ्यात
तिने ओठांनी टिपायचं
मी मात्र तेव्हा लाजुन
तिलाच घट्ट बिलगायचं

मी हात फ़िरवायचा
तिच्या लांबसडक केसांतुन
गाणं सुद्धा गुणगुणायचं
तिने शांत पडुन रहायचं

कुशीत शिरेल तीच अचानक
मग तिनेच वादळ व्हायचं
मी मात्र तेव्हा
तिला अर्पण व्हायचं

बेभान होवुन मीही देहात
तिचं वादळ भिनवायचं
वादळ शमल्यावर दमलेल्या तिला
मी अलगद थोपटुन झोपवायचं

एकदा आम्ही ठरवलं
तिनं मी आणि मी ती व्हायचं
तिने माझ्यासारखं आणि
मी तिच्यासारखं वागायचं

तू माझ्याशी लग्न करशील….?

तू माझ्याशी लग्न करशील….?

August20

तू माझ्याशी लग्न करशील….?

एक अनोळखी मुलगा येईल,
तुझ मन नाही,तुझ रूप पाहील.
तुझ्या सुंदरतेवर भालुन नक्कीच,
तो लग्नाला होकार देईल.

मान्या आहे. तुझ्या चांगल्यासाठीच,
तुझे आई-वडील हा निर्णय घेतील.
पण एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील….

मग,तुझ्या भावनांशी खेळले जाणार,
कुणी बोलायला ,तर कुणी चालायला सांगणार,
हे सर्व झाल्यानतर, हुंडयाच्या नावाखाली,
तो तुझ्या आई-वडिलांकडे भीक मागणार..

तुझ्या चांगल्यासाठीच, तुझे आई वडील,
त्याला ही भीक द्यायला तयार होतील,
पण एका भीकार्‍या शी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील…

यदा कदाचित,
तो मुलगा चांगला निघाला तरी..
फक्त जीवनाशी तडजोड म्हणून,
तो लग्नाला होकार देईल..
तुझे पालक ही त्याचे रूप आणि
मुखया म्हणजे किती हजारांची नोकरी आहे,
हे पाहून लग्नस मान्यता देतील.

पण जीवनाशी तडजोड करणार्‍या श्रीमनताशी,
काय तू जीवांभरच नात जोडशिल..अग
एका हृदयाने भिकारी मुळशी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील….

तो तुला बायको म्हणून घरात ठेवेल..
तू माझ्या हृदयात राहशील..
तो तुझ्या भावनाना समजावून घेण्याचा प्रयत्न करेल..
मी त्याच भावनांशी माझे नाते जोडेल..

हृदयतून निघालेल्या माझ्या या शब्दांवर,
मला माहीत आहे तू नक्कीच हसशील..
तरी पण……….
एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील….

सहवास…सारा सुखाचा हव्यास

सहवास…सारा सुखाचा हव्यास

January3

सहवास अडकवतो
एकान्त छळतो,
सॆरभॆर आयुष्य
कशासाठि कळेना………

विश्वासातून नाईलाज, कि
नाईलाजाने विश्वास?
आवासलेले प्रश्न..
उत्तर मात्र मिळेना…

गूंतलेल्या भावना, का
भावनांचाच गुंता
सा-या विवस्त्र चिंता
सरणंहि जळेना……

खरतरं……….

सहवासातून आयुष्य
आणि आयुष्यासाठि सहवास…
सारा सुखाचा हव्यास
सुटता कुणा सुटेना………

आदर्श प्रेम…

आदर्श प्रेम…

January12

जवळ आलेल्या प्रेम दिवसा निमित्ताने , पं. हरिवंशराय बच्चन यांच्या
आदर्श प्रेम या कवितेचा भावानुवाद इथे देतोय..

आदर्श प्रेम…

प्रेम कुणावरही करावे..
त्याला सांगावे का ?
स्वतःला वाहून द्यावे..
त्याला वाहून न्यावे का..?

गुणांचे चाहते बनावे परंतु
गाऊन ते ऐकवावे का ?
मनाचे खेळ सारे
त्याला भ्रमात घ्यावे का ?

सुगंध फ़ुलांचा घ्यावा ..
तोडून त्यास रुसवावे का ?
शुभेच्छांची फ़ुलं द्यावी..
अधिकार आपले ठसवावे का ?

क्षणात त्यागाच्या वाढते प्रेम..
त्यात स्वार्थ वसावा का ?
वाहून हृदय…हृदय मिळावे..
भाव व्यर्थ असावा का ?

याला प्रेम म्हणायच असतं…

याला प्रेम म्हणायच असतं…

January13

उगाचच्या रुसव्यांना,
तु मला मनवण्याला,
प्रेम म्हणायचं असतं

एकमेका आठवण्याला,
आणि आठवणी जपण्याला,
प्रेम म्हणायचं असतं.

थोडसं झुरण्याला,
स्वतःच न उरण्याला,
प्रेम म्हणायचं असतं

भविष्याची स्वप्न रंगवत,
आज आनंदात जगण्याला,
प्रेम म्हणायचं असतं

कितीही रागावलं तरी,
एकमेका सावरण्याला,
प्रेम म्हणायचं असतं

शब्दातुन बरसण्याला,
स्पर्शाने धुंद होण्याला,
प्रेम म्हणायचं असतं

तुझं माझं अस न राहता,
’आपलं’ म्हणून जगण्याला,
प्रेम म्हणायचं असतं

प्रेमाला प्रेम म्हणत
फ़क्त प्रेमच करण्याला
प्रेम म्हणायचं असतं

एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

January29

दोघांच्याही मनात होतं,
दोघांनाही ते ठाऊक होतं
कुनी कधी काही बोललेच नाही…..
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

जाण्या-येण्याच्या वेळाही एक,
ठरुनच गेल्या होत्या बहुतेक
वाटा दोहोंच्या जुळल्याच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

नजर भिरभिरते,एकमेंका शोधते;
दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते
नजरेपलिकडे काही घडलेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

नसेना का घडले मिलन परि…
आजन्म फुलतिल प्रेमांकुर ऊरी
नियतीचे कोडे कळ्लेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

राहिले जरी हे प्रेम अव्यक्त
मनी न उरली बोच हि फक्त
जगणे…..वाटणार ओझे नाही
ज़रि……. हे अबोल प्रेम फुललेच नाही !!

माझं प्रेम आहे……….

माझं प्रेम आहे……….

January30

अंगणातल्या झाडावर
झाडांच्या फूलांवर
फूलांच्या गंधावर
माझं प्रेम आहे

काळ्याकुट्ट ढगांवर
पावसाच्या पाण्यावर
पाण्याच्या थेंबावर
माझं प्रेम आहे

मळक्या पायवाटेवर
समुद्राच्या लाटेवर
शेतातल्या मोटेवर
माझं प्रेम आहे

मणसातल्या देवावर
देवातल्या माणसावर
साऱ्या देवमाणसांवर
माझं प्रेम आहे

जगातल्या साऱ्यांवर
साऱ्यांच्या जगावर
माझं प्रेम आहे
कारण…..
माझं माझ्या आयुश्यावर प्रेम आहे.

तुझे प्रेम

तुझे प्रेम


तुझे प्रेम म्हणजे असे
उत्तुंग शिखरावर उभे राहणे जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
खोल खोल दरीत स्वत: ला झोकून देणे जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
पहाटे पहाटे फ़ुलावरच्या दवाला टिपणे जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
नदीच्या अवखळ पाण्याबरोबर वाहत जाणे जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
भर पावसात भिजणारे पारिजातक जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
कुडकुडणार्‍या थंडीत शेकोटीतले कोळसे जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
तुझे प्रेम म्हणजे असे वार्‍यासंगे उडणारे पतंग जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
उन्हाळ्याच्या रोहीणीत तापणारा सुर्यप्रकाश जसे

प्रेम करा… प्रेम करा….

प्रेम करा… प्रेम करा….


प्रेम करा प्रेम करा
सर्वांवरती प्रेम करा
कुणी तुमचा राग केला
त्याच्याशीही प्रेमाने बोला
प्रेमाने सर्व जिंकता येते
नम्रतेने सर्व आपलेसे होते
मनीचे द्वेष,राग,मत्सर काढून टाका
शत्रू आहेत ते सर्व आपले
जवळ त्याना बाळगू नका……

माझं आंधळ प्रेम…..

माझं आंधळ प्रेम…..


माझी ही एक मैत्रीण होती,
खुप शांत अन अल्लड स्वभावाची,
कधीतरी यायची लहर तेव्हाच ती,
लाजून गालातल्या गालात हसायची..

मधाच्या पोकळीतून बोल ऐकू यावे,
असं ती सुमधूर आवाजात बोलायची,
बोलता बोलता मग का कुणास ठाऊक,
ती अचानक गप्प होऊन जायची..

बागेतली फुले तीला आवडायच्याआधी,
ती त्या फुलांना आवडायची,
फुलेही तीची सवड बघून तिच्यासोबत,
आनंदाने लाडावून बागडायची…

तिच्यासोबत चालता चालता,
वाटही कमी पडत असे,
तिच्या सहप्रवासात नेहमीच,
वाट पावलांनाच संपताना दिसे…

अशी काहीशी ती मला खुप आवडायची,
रोज रोज मला दिवसाच्या स्वप्नातही दिसायची,
तिला विचारण्याची हिम्मत माझ्यात नव्हती,
पण तरीही माझ्या मनास तिचीच आस असायची..

एकदा असचं तळ्याकाठी बसून,
तिचं प्रतिबिंब तळ्यात पाहत होतो,
विस्कटू नये म्हणून तरंगाना,
शांत रहा म्हणून सांगत होतो…

तेवढ्यात तिने मला विचारलं,
आज काय झालं आहे तूला?
मी उत्तरलो माहित नाही पण
मला काहितरी सांगायचे आहे तूला..

तुझी दृष्टी होऊन मला,
तुझं व्हायचं आहे,
तेवढ्यात ती उत्तरली,
मला दृष्टी नसेल तरी चालेल,
पण तुला एकदा माझ्या मिठीत,
माझ्या ह्या आंधळ्या डोळ्यानी पहायचं आहे..

- अनामिक

माझी ती

माझी ती


माझी ती
चांदण्यात राहते
अंबरात विहरते
सागरात तरते
मॊ बोलावतो तिला.
तर मान वेळावून पाहते
कधी हसत येते
कधी रुसत येते
कधी.. रडत येते
कधी चिडत येते
कधी कधी
गालावर घेऊन रर्क्तिमा
चक्क लाजत येते..
वेडावतो, मी खुळावतो
लाजताना पाहताना
हळुच मी खुणावतो
कवितेला जागेपणी
स्वप्न दे… विनवतो !!

तू अशी ये !!



प्रिये
तू अशी ये…

श्वासातल, भासातल
तुझ्या माझ्या भानातल
वा-याच गीत हलक
ओठामधे घेऊन ये

जाईतला, जुईतला
गंध माझ्या मनातला
लहरीचा धूंद सुगंध
हसण्यामधे भरून ये

सरीतला, दरीतला
थेंब माझ्या डोळ्यातला
सुखाचा एक आसू
जगण्यामधे पेरून ये

प्रेम प्रेम अन् प्रेमच…….

प्रेम प्रेम अन् प्रेमच…….

March24

प्रेम प्रेम अन् प्रेमच…….
गाईचे वासरावरती असते ते प्रेम………
चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम………
आईचे मुलांवर असते ते प्रेम………
नवरा- बायकोचे एकमेकांवर असते ते प्रेम………
अन् प्रियकराचे प्रेयसीवर व प्रेयसीचे प्रियकरावर असते ते सुद्धा प्रेमच……..
प्रेमाचे प्रकार तसे अनेकच,
पण त्याच्या मागील भावना मात्र एकच…..
आजच्या जीवनात खरे प्रेम तसे क्वचितच मिळते…
खरे प्रेम असावे तरी कसे!!!!!
तर….

खरे प्रेम असावे…..
कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही….

खरे प्रेम असावे…..
गुलाबासारखे, जे कोमल आणि सुगंधी जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही….

खरे प्रेम असावे…..
आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण..
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणारे…..

खरे प्रेम असावे…..
पैशाने विकत न घेता येण्यासारखे,
वेळ आलीच तर पैशालाही झुकवण्यासारखे……

कारण…..

प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही……..

अनोखे नाते….

अनोखे नाते….

March25
विवाह वेदीवर उभी मी..
अनेक स्वप्नं..
थोडी संभ्रमित..काहीशी सतरंगी..
अनेक घटना..पाहिलेल्या..अनुभवलेल्या…
आठवणा-या..न आठवणा-या…

माझा जन्मच जन्मदाती कडून नाकारलेला..
मला जन्मत: नाकारलेले…..
आज माझ्या असण्याचा तिसरा टप्पा..

हो तिसरा..
एक नाळ सूटताना ..
दुसरा तिने नाळेचे संबंधही तोडताना..अनाथालयाने स्विकारताना..
आणि आजचा तिसरा..
परत नविन नावानिशी..
साताजन्मांचे ॠणानुबंध जोडताना..

नातलगांच्या झोंब-या,स्विकारलेपणाच्या नजरा..
माझ्या यशोदेचं आणि माझं नातच वेगळं आहे..

सखीच नातं……

तिच्या माझ्या नात्याचे हे एक अल्लड नाव..
त्याचा माझा नातेबंध..तिलाच पहिल्यांदा सांगितला..
त्याचे मला स्विकारणे समाजकार्य नाही ना??

मनातला डोंब..अनेक काहूरं..
अनेक गोष्टी share केल्यात आम्ही!!

आज कन्यादानाच्यावेळी
तिचे कृतार्थतेचे अश्रू तिच्या हस-या नजरेत ..!!!

मधुरात्र

मधुरात्र

March26
काही काळापुर्वी सुचलेल्या ओळी, पण त्या पूर्ण केल्याच नाहीत कधी……….

आजही आहे माझ्या मधुरात्र ती लक्षात ग,
चांदणे अवघ्या तनुवर चंद्र अन् वक्षात ग।

उत्तररात्रीतही उतरेना उन्मत्त ते आवेग ग,
उत्तर ना यास उतारा लगाम ना वेग ग।

स्मित ते विसरु कसे स्मरतो हरेक नखरा ग,
लज्जा खोटी रागही लटका, हां भाव तुझा न खरा ग।
=============================

आज त्यात भर घातलेल्या काही ओळी…..
________________________________________

करू नकोस उगाच सये रुसण्याचे रूक्ष बहाणे,
मार्दवाची आर्जवे करून वेडावती शहाणे।

खेळ केला तारकांनी चंद्र वेडावला बिचारा,
पूर ओसरून गेला कोरडा वेडा किनारा।

घे मला जवळि आता दूर लोटू नको गडे,
कोसळावे काय आता संयमाचे उंच कड़े।

रातराणीच्या फुलांचा गंध हां विरेल ग,
निशेस्तव रातकिडा रातदिन झुरेल ग.

चायनिस पावसाळा……

चायनिस पावसाळा……

June16

दोन चायनिस आपला पाऊस कसा पडतो ते सांगत आहे.

त्याचे कविता वाचताना नियम पुढील प्रमाणे आहे……..
1.पहिल्यांदा आपले नाक दाबावे.
2.सुरात आणि चालीत ही कविता वाचावी.आणि कवितेची मजा घ्यावी…..!

चायनिस पावसाळा……

सुन सान सुन सान सुन सान,
झिम झाम झिम झाम झिम झाम,
छुन छान छुन छान छुन छान,
रम राम… छुन छान.. सुन सान…
झिम झाम….छुन छान.. सुन सान……..

सर सर सर सर.. झिम झाम,
टाप टुप टाप टुप…छुन छान,
फ़र फ़र फ़र फ़र….रम राम,
रम राम… छुन छान.. सुन सान …
झिम झाम….छुन छान.. सुन सान……..

कां सु कां सु… छुन छान,
किं फ़ु किं फ़ु…. झिम झाम,
सुर सुर सुर सुर….सुन सान,
रम राम… छुन छान.. सुन सान …
झिम झाम….छुन छान.. सुन सान………

चांदणं माळून स्वप्नांना लेऊन

चांदणं माळून स्वप्नांना लेऊन

July10

चांदणं माळून स्वप्नांना लेऊन
शब्द फुलांचा सुगंध घेऊन तू येतेस
आनंदाची पखरण जेव्हा तू करीत जातेस
काय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस..

अंबराची शाल निळी अंगावर ओढून
निळाईच्या रंगाने तू अशी बरसतेस
श्रावणाच्या उन्हात, इंद्रधनुष्य फुलवतेस
काय सांगू तेव्हा, तू कित्ती गूढ दिसतेस

निराश मनाला, पुन्हा उभारी,
हळुवार साद, शब्दात तुझ्या, अलवार तू घालतेस
बेभान भरारी, माझ्या स्वप्नांना, पंख तुझे तू देतेस
काय सांगू तेव्हा, तू निळाईच असतेस !!!

भास

कसं रे सांगु तुला
मी तुझाच विचार करते,
धुंद तुझ्या मिठीत
मी स्वत:लाच हरवते.

बोलणे तुझे ते मधाळ
मी माझा राग ही विसरते,
बाहुपाशात मग तुझ्याच
अश्रुनां मोकळी वाट मिळते.

सांत्वन करता करता तू
मला स्वंत:मध्ये गुंतवतोस,
नकळत मग माझ्या
देहाशी खेळत बसतोस.

जादू तुझ्या स्पर्शातील
अशी माझ्यावर चालवतोस,
करुन मनाला बेधुंद
अवधे विश्वच माझे व्यापतोस.

नसतो तुझ्याशिवाय मला
दुसरा कसलाच ध्यास,
सांग ना रे तुच, का होतात?
स्वप्नांत मला हे असले भास.

ती समोर असली की..

ती समोर असली की..

ती समोर असली की
शब्द पाठमोरे होतात
सांगायचे खुप असले तरी
शब्दच दिसेनासे होतात

पण आज मी ठरवले होते
तिला सर्व काही सांगायचेच
वेडया ह्या माझ्या मनाला
तिच्यासमोर मांडायचेचं

हसु नको पण मी
आरशासमोर राहुन तयारी ही केली होती
सुरुवात नि शेवट ची
पुन्हा पुन्हा उजळणी केली होती

सगळं काही आठवत असुन ही
मी गप्पच होतो
तिच्या हालवण्याने
भानावर आलो होतो

ती माझ्याकडे बघत राहिली
न मी तिच्यात हरवलो
खोटं नाही बोलणार मी
पण पुन्हा सर्व विसरलो

ती च मग बोलली
निरव शांतता मोडत
तुझ्या मनात काय आहे
मला नाही का ते कळत..

तुझ्यात मनातलं मी
कधीच वाचलं होतं
माझं मन ही नकळत
तुझं झालं होतं

आता मात्र मी
घेतला तिचा हाती हात
आयुष्याभरासाठी द्यायची
ठरवली एकमेकांना साथ

आता मात्र मला
सर्व काही आठवले
ती समोर असली तरी
आपसुकच सुचत गेले

Cheesyकुणीतरी असावे Cheesy

Cheesyकुणीतरी असावे Cheesy
कुणीतरी असावे,
गालातल्या गालात हसणारे !
भरलेच डोळे कधी तर
ओल्या आसवांना पुसणारं !!!
कुणीतरी असावे,
पैलतीरी साद घालणारं !
शब्दांना कानात साठवून,
गोड प्रतिसाद देणारं !!!
कुणीतरी असावे,
चांदण्यांच्या बरोबर न्हाणारं !
अंधारलेल्या वाटेत,
आपल्या सोबती येणारं !!!
कुणीतरी असावे,
फुलासम फुलणारं
फुलता फुलता,
सुगंध दरवळनारं !!!
कुणीतरी असावे,
आपल्या मनात रमणारं !
पलीकडील किनार्‍यावरून,
आपली वाट पाहणारं !!!

Monday, September 7, 2009

मीच असेल

आठवण माझी कधीतरी येईलच तुलातु कदाचीत रडशीलहीहात तुझे जुळवुन ठेव तुसगळी आसवं तुझी त्यात सामावतीलजो थांबला तुझ्या हातावरनीट बघ त्याच्याकडेएकटाच राहीलेला तो थेंब मीच असेलमाझ्या आठवणी एखदयालासांगताना तु कदाचीत हसशीलहीजो थांबेल तुझ्या ओठावर येता-येतानीट वापर त्यालाअडखळलेला तो शब्द मीच असेलकधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्रालात्याच्या तेजाला तु निखरत राहशीलमध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलंनीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेलकधी जर सुटला बेधुंद गार वारामोहक डोळे तुझे मिटुन तु घेशीलमध्येच स्पर्शली तुलाजर उबदार प्रेमळ झुळुकनीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल

होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची

होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळचीफोनवर माझ्याशी तासंतास बोलत बसायचीमाझे PJ सुध्हा ती हसत हसत ऐकायचीतिच्या मनातल सगळच मला सांगायचीसुखांमध्ये मला नेहमीच तिची साथ होतीदुःखांमध्ये मला सावरनारा हात होतीमाझ्या सोबत हसायची माझ्या सोबत रडायचीअशी होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळचीएक दिवशी अचानक तिने मला भेटायला बोलवलतिच्या आवाजात थोडस दडपण मला जाणवल"लग्न ठरलय रे माझ" तिने भेटल्यावर सांगितल"लग्नाला नक्की ये" अस आहेर माझ्याकडे मागितलपायाखाली माझ्या जमीन राहिली न्हवती ते ऐकूनथोडावेळ स्तब्ध राहिलो आणि अश्रु टाकले मी पिउनबिखरलेल्या ह्रुदयाच मात्र कमी होत न्हवत कंपनखोट हास्य आणून चेहरयावर कसबस केल तिला अभिनंदनती गेल्यावर चुक माझी मला उलगडली होतीमीच मैत्रीची पायरी न कळत ओलांडली होतीप्रेम होत माझ तिच्यावर पण तिच्या मनातल माहित न्हवतम्हणुन प्रेमासाठी मैत्रीचा बळी देन मनाला कधीच पटत न्हवतनक्की मोठी चुक कोणती? तिच्यावर प्रेम करण की प्रेम व्यक्त न करणहे माझ्या जीवनातल न उलगड़लेल कोड होतमाझ्या चुकीचे प्रायच्छित बहुदा फ़क्त तिच्या दूर गेल्याने झाल न्हवतम्हणुनच बहुतेक ते कोड सोडवायला तीच मला पुन्हा एकदा भेटण ठरल होतती समोर आली पण सुरवात कुठून करायची तेच ती विसरलीतेव्हा आम्हा दोघांमध्ये जणू बोचरया शांततेची लाटच पसरलीएकमेकांबरोबरच्या प्रवासाचा FLASHBACK डोळ्यांसमोर आला होताआणि अश्रूंचा उद्र्येक दोघांनीही कसाबसा रोखला होता"सगळ सांगितल रे मनातल तुला, पण एकच गोष्ट सांगायची राहिली""खुप प्रेम केल रे तुझ्यावर आणि तुझ्या विचारण्याची नेहमीच वाट पहिली"न राहवून तिने तिच्या ह्रुदयाच अस मौन तोडलआणि न कळतच तिने माझ ह्रदय पुन्हा एकदा मोडल

काल लग्न झालेली माझी मैत्रीण मला भेटली

काल लग्न झालेली माझी मैत्रीण मला भेटली,सवाशनीच्या लेण्यामद्धे अजूनच सुंदर वाटली...!नजरा-नजर होताच ती 'पुन्हा' एकदा लाजली,आमच्या पहिल्या भेटीची आठवण, ताजी करून गेली...!"कशी आहेस?" विचारताच, नेहमीचेच उत्तर मिळाले,पण चेह~यावर, कुणास ठाऊक, तिने उगाच, उसने हसू आणले...!दोघा सौमित्रांच्या गप्पा-गोष्टी अशा काही रंगल्या,चेह~यावर हास्य आले...डोळ्यांच्या कडा मात्र पाणावल्या...!'व्यक्त न केलेल्या भावना सांगाव्या', अशी कल्पना मनात आली,पण माझी नजर पुन्हा एकदा तिच्या कुंकवाकडे गेली...!असेच काहीतरी, तिच्या मनालासुद्धा वाटले,पण कदाचित सप्तपदींच्या वचनांनी तिला रोखले...!शेवटपर्यंत दोघेही, मनातले ओठांवर आणू नाही शकले,साता जन्माच्या नात्यापुढे प्रेम हे, पुन्हा एकदा झुकले...!

आमच 'हे'

'लक्ष कुठाय तुझ ?'तुझा प्रश्न 'अं?काही नाही 'माझ उत्तर'जा,मी नाही बोलत'तू म्हणतेस फुगलेले तुझे गाल पाहून मी सुखावतो 'बोल ना'म्हणुन विनवतो 'बर बर 'सांगायला जणू ओठ तुझे विलग होतात 'मी नाही जा'अरे!भलतेच शब्द बाहेर पडतात मला आणखी गम्मत वाटते मग तुझ ख़ास ठेवानितल नाव घेउन 'बोल ना प्लीज़ 'म्हणतो मग तू उठून चालु लागतेस आणि मी तुझ्यामागुन...तू दणादणा पाय आपटत निघतेसआणि मी मधुनच रस्त्याने एखाद फूल खुडतोतू रागातच मी सुखातचशेवटी तुझ एक पाय जोरात माझ्या पायावर पडतो आणि माझ्या मुठीतल ते फूलजमिनीला मीठी मारत आणि तू मला... अचानकच ...

एकदा तरी तू...!

तुझे सहर्ष स्वागत करतील फुले,मोगरा फुलेल, निशिगंध बहरेल,कमलिनी उमलेल तुला पाहून,लाजतील फुले भावनाविवश होऊन,लपतील पानाआड लाजून तुला पाहून,मात्र सुगंध तुला देत राहतील,म्हणून-एकदा तरी तू....!एकदा तरी माझ्या बागेत ये.एकदा तरी माझ्या बागेत ये.तुझ्या केसांशी समीर करेल दंगामस्ती,तुझ्या स्नेहार्द लोचनांनी बहरतील फुले,तुझ्या सान्निध्याने हसतील पाने,मंद झुळूकीने शीळ घालतील पाने,मधुर फळे डंवरतील,तुझ्याकडे झेपावतीलतुला ते तृप्त करतील,त्या तृप्तीची माधुरी तुझ्या ओठांवर तरळेल,बाग आनंदाने बहरेल, म्हणून-एकदा तरी तू....!एकदा तरी माझ्या बागेत ये.

♥ माझे पहिले प्रेम ♥

माझे पहिले प्रेम म्हनजेजनु पोरकटपनाच होतापन त्या दिवसामधलात्याचा रंगच भारी होताप्रेमाच्या त्या वाटेवरआमची पावले पडत होतीपन त्या वाटेवर तेव्हागर्दी थोडी जास्तच होतीपहिल्या वेळेस पाहिलेतेव्हाच ती मनात भरुन गेलीहिच्यापेक्शा दुसरी सुंदर नसेलअशी शंका येउन गेलीकाही दिवसातच दोघांचीनजरानजर झालीतिच्या एका नजरेनेआमची छाती धडकुन गेलीकाही दिवसांनी ही गोष्टसगळी कडे पसरत गेलीमित्र म्हने याला अचानकप्रेमाची हुकी कशी आली ?रात्र रात्र तिच्या आठवनीतआम्ही प्रेमपत्रे लिहित होतोहोकार मिळेल की नकारएवढाच फ़क्त विचार करीत होतोकरुन धाडस जेव्हा तीलाआम्ही प्रेमपत्र दिलेमित्रानी तेव्हा सांगितलेआता तुझे नही खरेतेव्हा कळले की हीचे आधीचबाहेर दहा प्रकरन आहेतमुलांना फ़िरवन्याचे हिचेतंत्र जुने आहेआम्हाला आवडलेली रानीनेहमी दुसरय़ाचीच असतेआमच्या महालात रानीची जागानेहमी अशीच खाली असते

आतातरी ये ना !!

ये ना सख्याकिती बोलावू?किती आळवू?आतातरी ये ना !!!रस्त्यातून जातानासमोर बकुळफुलपुन्हा आभास तुझाजीवलगा, आतातरी ये ना !!वा-याची झुळूकअंगावर मोरपीसगहिवरला स्पर्श तुझाप्रियतमा, आतातरी ये ना !!रफिचे सूर"तुम जो मिल गये हो!!!"पुन्हा तीच आठवणलाडक्या, आतातरी ये ना !!......तुझ्या विरहातव्याकुळ जीवराजसा मेघराजाआतातरी ये ना !!

माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,

माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...सगळेच म्हणतात , मी तुझ्यासाठी चंद्र तारे घेउन येतो ,त्यापेक्षा मी तुला चंद्र तार्यांवरच घेउन जातो ...पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...मग आपनदेखिल चोरून चोरून भेटुया ,लपून लपून मोबाइल वर बराच वेळ गप्पा मारुया ...पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...तुला जर कधी एकटेपना भासेल तर ,फक्त माझी आठवण कर मी तुझ्या जवळच असेन ...पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...माझ्याशी बोलताना तू तुझे मन मोकळे करशील ,आलेच तुझे अश्रु तर ते मी पुसेन ...पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...तुझ्या दुःखात मी सुद्धा तुझ्या बरोबर असेन ,पण माझ्या बरोबर असताना तुला दुखाची जाणीवच नसेन ...आता तरी माझे म्हनने एकदा ऐकून बघ ,प्रेम माझ्यावर एकदा करुन बघ ...

विचार करत होतो मी

विचार करत होतो मीकोण माझा विचार करतय का?विचार करुन सांग मलातु माझा विचार करतेस का?जर करत् असशील विचार् माझातर पुढे काय विचार तुझा?जर करत नसशील विचार् माझातर का करत नाहीस विचार माझा?मी तुझा विचार करत असतानातु माझ्याबद्द्ल अविचारी का?हा प्रश्न मी तुला विचारलाच् का?ह्याचा विचार तु कधी केलास का?विचार करुन विचारतो तुलाजर् पटला माझा विचार तुलातर कळव तुझा विचार मला

तुला वेळ मिळाला तर

तुला वेळ मिळाला तर...आपण दोघांनी प्रेम करायचं,मी समोरुन जातानातु दारात उभं रहायचंआईला संशय नको म्हणुनझाडानां पाणी घालायचं,फुलानां फुलवायचं,आईला भुलवायचंतुला वेळ मिळाला तर...को~या कागदावर्,किवा रुमालावरमन मोकळ करायचंअस् एकमेकांनीकाळजात जपायचंतुला वेळ मिळाला तर...कळेल एक दिवस तुझ्या घरीकळेल एक दिवस माझ्या घरीतेव्हा अखेरीस परिक्षा प्रेमाचीदोघांत एक विषाची बाटलीतु आधी कि, मी आधीअसं नाही भांडायचंदोघांनी एक-एक घोट घ्यायचंहातात हात घेउन झोपी जायायचंतुला वेळ मिळाला तर...आपण दोघांनी प्रेम करायचं.

नको जाऊस इतक्यात साथ सोडून सखे तू

नको जाऊस इतक्यात साथ सोडून सखे तू......तुझ्यात पार गुंतुण गेलो मी,कशातही उरून न रहिलो मी……नको जाऊस इतक्यात साथ सोडून सखे तू,अधूरा राहीन मी.. जर गेलीस जीवनातून माझ्या तू......हसू नकोस तू अबोल अशी,येऊन जा एकदा माझ्या मनाशी.......नजरेत माझ्या नजर मिळव एकदा,दिसतील तुझ्याच प्रतिमा त्यात अनेकदा......प्रत्येक वेळी स्वपनांत येते तू अशी,जणू एक स्थान करून जाते हृदयाशी.......तुझे स्मित हास्य देऊन जाते एक आशा जगण्याची,त्यात नाही उरली आता भिती मरण्याची........नको घेऊस परीक्षा आता माझ्या प्रेमाची,देऊन जाईल आठवण ती निरंतर आपल्या नात्याची......आता फक्त तू तिथ मी.... अन् मी तिथ तू,मिळून जगु आयुष्य दोघे....नको “मी”.... अन् नको तो “तू",आता फक्त “आपण” अन् “आपणच” दोघे…..

प्रेम नावाचा "टाईमपास"

त्याची अन तिची पहिली भॆटदोघांची होणाऱी "नजऱभेट"काळजाला जाऊन भिडणारी थेटदोघांचं एकमेकांना पाहून हसणंअन नाजुकशा जाळ्यात अलगद फसणं...या हसण्या या फसण्याचीसवय झालीय सगळयांना...नजऱभेटीचं रूपांतर चोरून भॆटीतभेटीचं रूपांतर हळुवार मिठीतअन त्याहीपुढे कित्येक पटीतनात्यातल्या या वेगाचीसवय झालीय सगळयांना...मग रंगू लागतात स्वप्नंएक त्याचं,एक तिचं फक्त दोन मनंत्याचं हसणं तेव्हा तिचं हसणंतिचं रडणं तेव्हा त्याचं रडणंया हसण्या या रडण्याचीसवय झालीय सगळयांना...दिल्या जातात वेळा,पाळल्याही जातात वेळाघेतल्या जातात शपथा दिल्या जातात उपमात्याला ती वाटते "रांझ्याची हीर"तिलाही तो वाटतो "कपूरांचा रणबीर"या शपथा या उपमांचीसवय झालीय सगळयांना...मग येतो असाही एक दिवसपूनवेची रात्र वाटू लागते अवसदोघांनाही येऊ लागतो एकमेकांचा कंटाळाहीर वाटू लागते "बधीर" अनरणबीर वाटू लागतो चक्क "काळा"या अवसेची या पूनवेचीसवय झालीय सगळयांना...पहिल्या भेटीच्या चौकातचफूटतात "नव्या वाटा"दोघंही करतात एकमेकांना "टाटा"अहो तु्म्ही कशाला होताय डिस्टर्बदुःख वैगरे विसरात्याला भॆटते दूसरीतिलाही भॆटतो दूसरापुन्हा होते देवाणघेवाण,पुन्हा होते "दिलफेक"पुन्हा जुन्या कहानीचा नव्याने "रिटेक"बदलत्या प्रेमाच्या रंगाचीसवय झालीय सगळयांना...खरं सांगायचं अगदी मनापासून तरप्रेम नावाचा "टाईमपास" करण्याचीसवय झालीय सगळयांना...

ती समोर असली की..

ती समोर असली कीशब्द पाठमोरे होतातसांगायचे खुप असले तरीशब्दच दिसेनासे होतातपण आज मी ठरवले होतेतिला सर्व काही सांगायचेचवेडया ह्या माझ्या मनालातिच्यासमोर मांडायचेचंहसु नको पण मीआरशासमोर राहुन तयारी ही केली होतीसुरुवात नि शेवट चीपुन्हा पुन्हा उजळणी केली होतीसगळं काही आठवत असुन हीमी गप्पच होतोतिच्या हालवण्यानेभानावर आलो होतोती माझ्याकडे बघत राहिलीन मी तिच्यात हरवलोखोटं नाही बोलणार मी पण पुन्हा सर्व विसरलोती च मग बोललीनिरव शांतता मोडततुझ्या मनात काय आहेमला नाही का ते कळत..तुझ्यात मनातलं मीकधीच वाचलं होतंमाझं मन ही नकळततुझं झालं होतंआता मात्र मीघेतला तिचा हाती हातआयुष्याभरासाठी द्यायचीठरवली एकमेकांना साथआता मात्र मलासर्व काही आठवलेती समोर असली तरीआपसुकच सुचत गेले