थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
थेंब अश्रुंचे दोन गालावरती..कसे पुसायाचे राहून गेले..लपविलेले दु:ख माझेचार चेहरे पाहून गेले....सांगितले बरेच काही..आनंदाश्रु अन काही बाही..अर्थ सुकल्या आसवाचा परीलावायचा तो लावून गेले...लपविलेले जे दु:ख माझेचार चेहरे पाहून गेले..
पुसले डोळे.. हसून खोटेचाचपले कितिक मुखवटेमुखवट्याला चेहर्यावरतीचढवायाचे आज राहून गेले.लपविलेले जे दु:ख माझेचार चेहरे पाहून गेले..
हसून आता.. विसरून सारेवावरते जणू.. उनाड वारेहसताना पुन्हा भरले डोळेपापणीतून अश्रु वाहून गेले.लपविलेले जे दु:ख माझेचार चेहरे पाहून गेले....थेंब अश्रुंचे दोन गालावरती..कसे पुसायाचे राहून गेले..लपविलेले दु:ख माझेचार चेहरे पाहून गेले..
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment