आयुष्यात प्रेम करायचय मला..
दुर कुठेतरी समुद्र किनारी हातात हात घालून बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना भविष्याचे हितगुज करायचय मला...
माझ्या मांडीवर डोके ठेऊन तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहऱ्याकडे पहाताना स्वतःशी स्मित करायचय मला...
तिच्या सोबत थोडं दुष्टपणे वागुन तिला रागाने लालबुंद करायचय मला,
तिची आसवे पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय मला...
आयुष्यतील माझं शिखर तिच्या सोबतीने चढायचय मला,
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीचा आनंद तिच्या डोळ्यांतून व्यक्त झालेला अनुभवायचाय मला...
ती माझ्यापासून दूर जात आसताना ती नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना डोळ्यांवाटे मुक्त करायचय मला,
तिच्या सोबत माझे आयुष्य झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला...
आयुष्यात प्रेम करायचय मला....
जे घडेल ते सहन करायचे असतं..
14 years ago

No comments:
Post a Comment