तू अशी तू तशी…
November15
चमचमत्या किनारीची,तु कोरीव चांदणी,गोर्या चेहर्यावर तुझ्यानांदते हास्य नंदिनी
तू अशी कोमल,फुलांची गंधराणी,तुला पाहता दरवळे,सुंगध मनोमनी..
तू अशी शीतल,आळवावरचे पाणी,तुला छेडीताअंग घेतेस चोरूनी ..
तू अशी रंगाचीरंगेल ओढणी,टिपक्यांच्या गर्दित,नक्षी लपेटूनी..
तु अशी मऊ,मखमल मृगनयनी,ठाव तुझ्या कस्तुरीचा घेता,फिरतो मी वेड्यावानी..
तु अशी ओलीसरसर श्रावणी,चिंब देहावरनितळले मोत्याचे मणी..
तु अशी स्वप्नांची,ऐकमेव राणी,तुला आठवतागातो मी गाणी..
तु अशी तु तशीजिव गेला मोहरूनी,छेडता तुला अवचितगेलीस तू लाजूनी..
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment