कुणीतरी असावे
कुणीतरी असावे,
गालातल्या गालात हसणारे !
भरलेच डोळे कधी तर
ओल्या आसवांना पुसणारं !!!
कुणीतरी असावे,
पैलतीरी साद घालणारं !
शब्दांना कानात साठवून,
गोड प्रतिसाद देणारं !!!
कुणीतरी असावे,
चांदण्यांच्या बरोबर न्हाणारं !
अंधारलेल्या वाटेत,
आपल्या सोबती येणारं !!!
कुणीतरी असावे,
फुलासम फुलणारं
फुलता फुलता,
सुगंध दरवळनारं !!!
कुणीतरी असावे,
आपल्या मनात रमणारं !
पलीकडील किनार्यावरून,
आपली वाट पाहणारं !!!
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment