July20
वा-याच गाणं..
लवती पानं..
धुन मेघात साचली
भिजली वाट..
गंधाची लाट..
पहाट स्वैर नाचली
ओला काळ…
सरींची माळ…
आभाळ जातया उतु
शहारे धरा..
स्पर्श बावरा..
जरा अल्लडसा हा ऋतु
झरलेच क्षण..
विरलेच मन..
अन ठसे तिच्या बोटांचे
वाहते कोण?..
मागते कोण..?
दोन थेंब तिच्या ओठांचे
भिजते ती..
सजते ती…
ती गोड अशी लाजते
नशा नजरेत..
धुंद नशेत…
डोळ्यात मंद न्हाहते
मस्तीतली चाल..
कोठला ताल?..
सवालही हा ओला
वा-यात गाणं ..
वारंच गाणं..
गाणं रुणझुणता झुला
No comments:
Post a Comment