Tuesday, September 15, 2009

अनोखे नाते….

अनोखे नाते….

March25
विवाह वेदीवर उभी मी..
अनेक स्वप्नं..
थोडी संभ्रमित..काहीशी सतरंगी..
अनेक घटना..पाहिलेल्या..अनुभवलेल्या…
आठवणा-या..न आठवणा-या…

माझा जन्मच जन्मदाती कडून नाकारलेला..
मला जन्मत: नाकारलेले…..
आज माझ्या असण्याचा तिसरा टप्पा..

हो तिसरा..
एक नाळ सूटताना ..
दुसरा तिने नाळेचे संबंधही तोडताना..अनाथालयाने स्विकारताना..
आणि आजचा तिसरा..
परत नविन नावानिशी..
साताजन्मांचे ॠणानुबंध जोडताना..

नातलगांच्या झोंब-या,स्विकारलेपणाच्या नजरा..
माझ्या यशोदेचं आणि माझं नातच वेगळं आहे..

सखीच नातं……

तिच्या माझ्या नात्याचे हे एक अल्लड नाव..
त्याचा माझा नातेबंध..तिलाच पहिल्यांदा सांगितला..
त्याचे मला स्विकारणे समाजकार्य नाही ना??

मनातला डोंब..अनेक काहूरं..
अनेक गोष्टी share केल्यात आम्ही!!

आज कन्यादानाच्यावेळी
तिचे कृतार्थतेचे अश्रू तिच्या हस-या नजरेत ..!!!

No comments: