Tuesday, September 15, 2009

आणी मग बोभाटा गावभर..


July8

आणी मग बोभाटा गावभर..

कुणाला तरी समजेल उगीच
आणी मग बोभाटा गावभर..
चोरुनच भेटत राहु आपण
क्षिताजाला आभाळ भेटते ना तसे अगदी
उगाच ढगासारखे भेटायचो
अन पावसात मात्र आपल्यासोबत सारेच भिजायचे
कुणाला तरी समजेल उगीच
आणी मग बोभाटा गावभर..
मग आभाळात सोडुन, घरात वीजा पडायच्या
आणी नदीला सोडुन डोळ्यांनाच पुर यायचा
उगीच नंतर वाहुन जाण्यापेक्षा
आताच पुल सांभाळायला हवा
नाहीतर पुलावरुन पाणी जयच
आणी मग बोभाटा गावभर..
चार - दोन लोक ओळखायचे गर्दीत तुला मला
आणी मग हे चांदणस्पर्शी दिवस
वाळवंटच होऊन जातील

नको वाटतो रे रखरखीत उन्हाळा आता
पावसाच व्यसनच जडलय कोवळ्या वयात
हे व्यसन चोरुनच भोगुयात,
कुणाला तरी समजेल उगीच
आणी मग बोभाटा गावभर..

No comments: