सारखे सारखे आम्हीच
मारावे का तिच्यासाठी
जरा तिलाही झुरुदे
माझ्यासाठी.
कारणे शोधावी भेटण्यासाठी
बहाणे करावे बोलण्यासाठी
आम्हीच का तडपावे तिच्यासाठी
जरा तिलाही झुरुदे माझ्यासाठी.
दिवस उजाडावा तिच्यासाठी
रात्र व्हावी तिच्या स्वप्नासाठी
हे आम्हीच ठरवावे कशासाठी
जरा तिलाही झुरुदे माझ्यासाठी.
आशा एकच मनाची
तिच्या माझ्या मिलनाची
पूर्ण होण्याच्या पायवाटा
जरा तिलाही शोधुदे माझ्यासाठी........
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment