August1
पहाटेचा प्राजक्त………
निळे निळे आकाशखाली हिरवे गालीचे
उरतो मधला आसमंत
आणि समुद्रा निळाशार
असते कधी पहाट
खूपच गोजिरवाणी
त्यासाठी जावी लागते
रात्र उधाणलेली
सूर्योदयाची लाली माझ्या
गाली अशी उतरावी
पण सूर्यास्ताची रक्तिमा
त्याच्या मनी फुलावी
चंद्र शांत,शीतल
रात्रीचा अनभिषिक्त राजा
चांदण्या आहेतच ना
जीव त्याच्यावर लावायला
सूर्य दिवसभर आकाशात
तळपत तळपत राहणार
आणि एकडे आम्हालाही
जळवत जळवत ठेवणार
बरसलेला पहाटेचा प्राजक्त
फूललेली रात्रीची रातराणी
पण त्याने आणलेल्या
मोगर्याला कशाची सर नाही
येईलच तो आता
माझ्या जीवाचा राजा
घेऊन मला कवेत तो
म्हणेल,उशीर झाला का??
शिरल्यावर त्याच्या मिठीत
कशाचे नाही भान
उरतो मोगर्याचा सुगंध
आणि उधाणलेली रात
No comments:
Post a Comment