आज असा मला वर द्या…
नाही माझ्याकडं सागरासारखं गहीरेपणनाही माझं नदीसारखं निर्मळ दर्पणया भवसागराचा तुमच्यासारखाच एक थेंब मीआजन्म मला ईथ सुख-दुख:चा सौदागर होऊ द्याप्रयत्न करुन मला यश-अपयशाच्या या सागरात पोहु द्या
ऊमलतोय लेखणीचा एक अनोखा गंध घेउन मीनका लादु आत्ताच नियमांचा असा बंध तुम्हीरोज नव्या रंगाची उधळण या रानात करायचीये मलापण त्याआधी मला नीट तरी फ़ुलू द्याशब्दसौंदर्याने नटलेल्या या जगात मलाही थोडं लिहु द्या
खुललेत आज माझ्यासाठी दार य़ा मोकळ्या नभाचेफ़ुटलेत आजच पर मला नव्या दमाचेनियमाच्या कात्रीने नका हो त्यांना असे कापुएखाद्या नकोश्या फ़ांदीसारखा नका हो मला असे छाटू
व्हायचय या नीर तळ्याचा खळखळता आवाज मलाचढवायचाय या मनावर आत्मविश्वासाचा नवा साज मलाफ़क्त तुम्ही थोडा उत्साहाचा, विश्वासाचा स्वर मला द्या“मिळो शिघ्र दर्शन मज विजयलक्ष्मीचे“आज असा मला वर द्या…….आज असा मला वर द्या…
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment