स्वप्नांची परीक्रमा…..!!!
सांभाळते आता मीच माझं स्वप्नं….देणार नाही तूला…..चुकूनही उसनं….जमतील तसे फटकारे मारीन ब्रशचे…..मागणार नाही तूझ्याकडे आभाळ रंगाचे…..!!माझी स्वप्नं अलगद पापण्यांवर ठेवेन माझ्या….मागीतली तरी तु ……देणार नाही तूला….
तशी आधीपसूनच जपते …..फूलपाखरं स्वनांची….फूलपाखरंच ती रे……एकजात हळवी….!!!पायवाट होती फूलांची……काळजात छळवी….स्वप्नांचे वेचे घातले ओच्यात माझ्या…..दिली गर्भरेशमी नक्काशी….तूच ना रे पदराला….
बघून येते माझी मीच आधीसारखी…नाहीतरी एकटीच होते….राहीन एकटी…येवू नकोस… आता तिथेच तु थांब…..अस्साच रहा उभा….मी करून येते स्वप्नांची परीक्रमा…..फूलांसारखी स्वप्ने येतात का रे आभाळाला…??
कारण…..कोणाच्यातरी स्वप्नांनी आज…केली म्हणे…..आत्महत्या…!!!
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment