Monday, September 7, 2009

आमच 'हे'

'लक्ष कुठाय तुझ ?'तुझा प्रश्न 'अं?काही नाही 'माझ उत्तर'जा,मी नाही बोलत'तू म्हणतेस फुगलेले तुझे गाल पाहून मी सुखावतो 'बोल ना'म्हणुन विनवतो 'बर बर 'सांगायला जणू ओठ तुझे विलग होतात 'मी नाही जा'अरे!भलतेच शब्द बाहेर पडतात मला आणखी गम्मत वाटते मग तुझ ख़ास ठेवानितल नाव घेउन 'बोल ना प्लीज़ 'म्हणतो मग तू उठून चालु लागतेस आणि मी तुझ्यामागुन...तू दणादणा पाय आपटत निघतेसआणि मी मधुनच रस्त्याने एखाद फूल खुडतोतू रागातच मी सुखातचशेवटी तुझ एक पाय जोरात माझ्या पायावर पडतो आणि माझ्या मुठीतल ते फूलजमिनीला मीठी मारत आणि तू मला... अचानकच ...

No comments: