पुन्हा एकदा ती परतली..तेव्हा
तिच्याविना आयुष्य जगण्यास असह्य झालं होतं,
तिच्यावाचून मन माझं सुन्न सुन्न झालं होतं..
स्वप्नही रातीला सोडून दुर गेली होती,
झोपेलाही डोळ्यात तिचं निघून जाणं सलत होतं..
चित्त थारयावर नाही म्हणून काही सुचत नव्हतं,
तिच्या आठवणीच्या पदराभोवती माझं काळीज घोटाळत होतं…
सारं काही नरकवेदनेच्या पलीकडचं हे एकाकीपण,
अन देहात फक्त तिच्या श्वासांच जगण शिल्लक होतं..
पण…. अचानक….
पुन्हा एकदा ती भेटली अशी एकांतात तेव्हा,
काळीज माझं भितीने धडधडत होतं…
पुन्हा एकदा आभासाच मृगजळ छळणार मला म्हणून,
मन माझं थरकापाने घाबरत होतं..
तेव्हा अचानक तिच्या त्या तळहातांचा स्पर्श झाला,
तसं अंग माझं रोमारोमातून शहारत होतं…
ती म्हणाली पुन्हा आली परतून मी तुझ्यासाठी,
हे सांगताना तिच्या डोळ्यातूनही थेंबांच येणं जाणं सुरूच होतं..
नाही विचारलं मी तिला कूठे होती ? का गेलीस सोडून ?
कारण तिचं येणं माझ्यासाठी एक नव्या जन्माच नवं विश्वचं होतं…
तेवढ्यात ती म्हणाली , “नाही मी राहू शकले तुझ्याशिवाय”
ते ऐकताना खरचं माझं वाट पाहण सफल ठरत होतं…
मग आली पावसाची सर धावून आमच्या भेटीला,
अन सारं काही विसरून ऎकमेकांच्या मिठीत आयुष्य पुन्हा अंकुरलं होतं…
No comments:
Post a Comment