Wednesday, March 30, 2011

एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

दोघांच्याही मनात होतं,
दोघांनाही ते ठाऊक होतं
कुनी कधी काही बोललेच नाही…..
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

जाण्या-येण्याच्या वेळाही एक,
ठरुनच गेल्या होत्या बहुतेक
वाटा दोहोंच्या जुळल्याच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

नजर भिरभिरते,एकमेंका शोधते;
दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते
नजरेपलिकडे काही घडलेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

नसेना का घडले मिलन परि…
आजन्म फुलतिल प्रेमांकुर ऊरी
नियतीचे कोडे कळ्लेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

राहिले जरी हे प्रेम अव्यक्त
मनी न उरली बोच हि फक्त
जगणे…..वाटणार ओझे नाही
ज़रि……. हे अबोल प्रेम फुललेच नाही !!

एखाद्याच्या येण्याने असं काही बदलून जातं ......

एखाद्याच्या येण्याने असं काही बदलून जातं .......

की सर्व जग त्याला सुंदर दिसू लागतं.
फुलांचा सुवास त्याला प्रफुल्लित करून टाकतो,
पक्ष्यांची किलबिल जणू त्याला मधुर गाणं वाटू लागतं...
जगणे हे तर आत्ताच सुरु झाले आहे याचा आनंद मिळू लागतो.
एखाद्याच्या येण्याने असं काही बदलून जातं .......

कामातील नीरसपणा जाऊन त्यात उत्साह येऊ लागतो,
काम काम न राहता तो एक खेळ आहे असे वाटू लागतं .
रात्रीच्या वेळी आकाश पाहताना एक वेगळीचं मजा येऊ लागते,
झोपल्यावर स्वप्नांच्या दुनियेत जगण्याची एक वेगळीच किमया वाटू लागते.

हे सर्व असचं घडत राहत
कारण

एखाद्याच्या येण्याने असं काही बदलून जातं .......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे....


एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण थकल्यावरही आधारसाठी त्याच्याकडेच पहावे........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे.........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच राहावे, जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे.......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे...........

आयुष्यातली एकच इच्छा......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
सूर त्याचा आणि शब्द माझे असावे

Wednesday, March 23, 2011

जीवनाचे मोल


जीवनाचे मोल



जीवनाचे मोल, मला कळून आले
जेंव्हा माझे प्रेत, अवघे जळून आले

बघ उमलून आली, पहाटेची लाली
बोचर्‍या थंडीत येती, रोमांच गाली
बघ शुक्राचे रंग, कसे उजळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

डोंगरामागून सुर्याचे, लाल बिंब आले
गवताचे हिरवे पाते, ओलेचिंब झाले
दरीतले धुके बघ, विरघळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

पाखरांचा थवा बघ, रानात चालला
किलबिलाट त्यांचा, कानात चालला
वासरु बघ गाईकडे, पळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

बघ शाळेत पोरांचा, घोळका चालला
कोण आले कोण नाही, घोळ का चालला?
सरळ कोणी, कोणी मागे वळून चाले
जीवनाचे मोल, मला कळून आले

बघ आमराईची, ती गर्द सावली
गाई गुरे उन्हाची, तेथे विसावली
वासरु हुंदडून पुन्हा, तेथे वळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

तिन्ही सांजेला पावसाचे, चार थेंब आले
स्वागताला त्यांच्या, बाहेर कोंब आले
नको झळा त्यांना, उन टळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

बघ सांजेला ते, किती रंग झाले
ढग मावळतीचे, इंद्रधनूत न्हाले
हळूच चांदण्याचे थवे, उजळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

इथे श्वासांची मंदी आहे .....


इथे श्वासांची मंदी आहे .....



जीविताचे नाक दाबले गर्दीने
नव्या अभ्रकास तोंड उघडणे
बंदी आहे ......
मोजकेच आहेत वाटून घ्या
इथे श्वासांची
मंदी आहे.............

गोर गरीब असाल तर मरून जा
इथे श्रीमंतांचीच चांदी आहे
लुटा किवा तुटून पडा
फाटक्याना हीच शेवटची
संधी आहे .............
मोजकेच आहेत वाटून घ्या इथे श्वासांची मंदी आहे....

श्वास तोडकेच तुझे
काड्यांचे कुंपण...
इथे वादळाना चढलेली
धुंदी आहे.................
ते ठेवतील जपून बरेच
त्यांचे वाडे
चिरेबंदी आहे.........
मोजकेच आहेत वाटून घ्या इथे श्वासांची मंदी आहे...

विकले जातील
खरीदले जातील
श्वास हे ....हिसकून
घेतले जातील
तू सावध राहशील किती
डोळ्या देखत ते
चोरले जातील

विश्वास राहील गहाण इथे
श्वासांचीच भूक नि तहान
मरण्याचे भाव वधारतील
नि जीवन होयील लहान
सावरशील किती प्राण
पाखरा ....
उडणारयांची नांदी आहे
एक घे मिळाला तर श्वास
कारभार इथे सुरु
अंधाधुंदी आहे .............
मोजकेच आहेत वाटून घ्या इथे श्वासांची मंदी आहे.

इथे श्वासांची मंदी आहे .....



जीविताचे नाक दाबले गर्दीने
नव्या अभ्रकास तोंड उघडणे
बंदी आहे ......
मोजकेच आहेत वाटून घ्या
इथे श्वासांची
मंदी आहे.............

गोर गरीब असाल तर मरून जा
इथे श्रीमंतांचीच चांदी आहे
लुटा किवा तुटून पडा
फाटक्याना हीच शेवटची
संधी आहे .............
मोजकेच आहेत वाटून घ्या इथे श्वासांची मंदी आहे....

श्वास तोडकेच तुझे
काड्यांचे कुंपण...
इथे वादळाना चढलेली
धुंदी आहे.................
ते ठेवतील जपून बरेच
त्यांचे वाडे
चिरेबंदी आहे.........
मोजकेच आहेत वाटून घ्या इथे श्वासांची मंदी आहे...

विकले जातील
खरीदले जातील
श्वास हे ....हिसकून
घेतले जातील
तू सावध राहशील किती
डोळ्या देखत ते
चोरले जातील

विश्वास राहील गहाण इथे
श्वासांचीच भूक नि तहान
मरण्याचे भाव वधारतील
नि जीवन होयील लहान
सावरशील किती प्राण
पाखरा ....
उडणारयांची नांदी आहे
एक घे मिळाला तर श्वास
कारभार इथे सुरु
अंधाधुंदी आहे .............
मोजकेच आहेत वाटून घ्या इथे श्वासांची मंदी आहे.

ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं

ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं
ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या
रात्री जगतात
त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं....
माझे आसू
पुसून तिने आमच्या सुखात हसव..
कधीतरी वाटत यार आपलंही कुणी
असावं...

छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण ...
भेटीनंतर
निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं
बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा...
तिने
माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं...
ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव
....
नेहमीचा यार वाटत..... आपलंही कुणी असावं...ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं
ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या
रात्री जगतात
त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं....
माझे आसू
पुसून तिने आमच्या सुखात हसव..
कधीतरी वाटत यार आपलंही कुणी
असावं...

छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण ...
भेटीनंतर
निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं
बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा...
तिने
माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं...
ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव
....
नेहमीचा यार वाटत..... आपलंही कुणी असावं...

न मागताच तू खूप काही दिलेस ..........

न मागताच तू खूप काही दिलेस ..........

पहाटेच्या गुलाबी थंडीत आठवणींची ऊबदार रजई दिलीस
चांदण्यांच्या शीतल प्रकाशात उजळणारी स्वप्नांची रात्र दिलीस

एका क्षणातच जणू आयुष्य जगण्याचा हर्ष दिलास
दुःखी निराश मनाला मायेचा हळूवार स्पर्श दिलास

आकांक्षांचे ढासळलेले मनोरे पुन्हा एकदा उभे केलेस
हरवलेले सूर छेडूनी अंतरी प्रीतीचे गीत फुलविलेस

आयुष्यात ज्याची कमी होती ते सारे काही पदरात टाकलेस
एका कोमेजलेल्या कळीला जणू पुन्हा नवजीवन दिलेस

काही उरलेच नाही आता मागण्यासारखे ...

खरंच ... न मागताच तू खूप काही दिलेस !!!

आठवणीच काय ..केव्हा ही येतात..

आठवणीच काय
केव्हा ही येतात
तू दाखवलेल्या "सव्प्नाची"
आठवण करून देतात


तुझी आठवण येते आणि
मी "अश्रुच्या" पावसात भिजते
आभाळ फाटून वीज कोसलावी
तशी अवस्ता माझी होते
आठवण येताच सख्या तुझी
ओलावली ही पापन्याची कडा
वेडे "डोळे" उगीच पाहत आहेत तुझी वाट
अन अनावर होताच वहातयेत अश्रुंचे पाट

Thursday, March 10, 2011

एक पाखरू मनातलं,

एक पाखरू मनातलं,


खूप दिवसापासून जपलेलं,

आताशा कुठे भिरभिरू लागलेलं,



एक पाखरू मनातलं,

कधी खूप आनंदून जाणारं,

तर कधी लगेच खट्टू होणारं,



एक पाखरू मनातलं,

खूप खूप अगदी जीवापाड प्रेम करणाऱ,

अन तेवढ्याच रागाने लाल-लाल होणारं,



एक पाखरू मनातलं,

पावसात ओलं-चिंब होऊन नाचणारं,

रणरणत्या उन्हात खूप कष्ट करणारं,



एक पाखरू मनातलं,

मोठ्या कारणावरून मुसमुसून रडणार,

आणि छोट्या आनंदासाठी लढणार,



एक पाखरू मनातलं,

कायम स्वप्नात रमणार,

वास्तवाशी बिनघोरपणे झगडणार,



एक पाखरू मनातलं,

मायेच्या कुशीत अलगद शिरणार,

मोठ होऊन समजुतदारपणे थोपटणार,



एक पाखरू मनातलं,

आवडतं गाण हळुवार गुनगुनणार,

स्वतःच अस्तित्व ताकदीने शोधणार ,



एक पाखरू मनातलं,

आपल्या माणसाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल,

तितक्याच तन्मयतेने वेगळी वाट नव्याने हुडकणार,



एक पाखरू मनातलं,

वाईट अनुभवांना भेदरणार,

अन दिलखुलासपणे हसत सर्वांगाने स्वीकारणार,



एक पाखरू मनातलं,

खूप घाबरून भुरकन उडणार,

पण "वेड" होऊन आकाशाकडे झेपावणार,



एक पाखरू मनातलं,

एक होती मैत्रीण

एक होती मैत्रीण


होती ती जिवलग



हसवत होतो एकमेकांना

ओरडत होतो एकमेकांना



बोल्याशिवाय राहवत नव्हते

भेटल्याशिवाय जमत नव्हते



प्रेम माझ्यावर करत होती

मैत्रीसाठी गप्प बसत होती



पण केली मी चूक मोठी

न मिळणारे दिले प्रेम तिला



त्या प्रेमाने मैत्रीचा वध केला

नकळत तिने मैत्रीचा शेवट केला



आता हसायला जमत नाही

डोळ्यातून पाणी येत नाही



पुन्हा अशी मैत्रीण भेटणार नाही

या जन्मी तरी मी मैत्री करणार ना

असं.. कधी वाटलंच नव्हतं..??

असं.. कधी वाटलंच नव्हतं..??


जीवनातून तू.. एवढं सहज दूर जाशील..

अनोळखी नजरेनं अशा.. माझ्याकडे पाहशील..

पाहून नंतर.. हळूच मनाशी हसशील..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

मनाच्या बागेत, भावनेचं रोपटं..

एवढ्या खोलवर जाईल..

मुळापासून उखडलं तरी..

थोडी आठवण शिल्लक राहील..

ती आठवण सुद्धा वेदनाच देईल..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

तुझी निरागसता संपून..

निष्ठुरता डोळ्यांत उरेल..

माझ्या डोळ्यांत मात्र..

काकुळतीने.. पाणी तरेल..

भयाण हे स्वप्न, कधी वास्तवातही उतरेल..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

ठसठसणारी वेदना..

तुझीच आठवण करुन देईल..

वेडं.. मनाचं पाखरु..

पुन्हा तुलाच शोधत राहील..

अवघड प्रयत्नानं त्याचा मात्र जीव जाईल..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

मी सुद्धा.. अडखळत..

न्हा उभा राहीन..

तुझ्या पलीकडे असणाऱ्या..

अंतिम ध्येयाला पाहीन..

आयुष्य पुढचे, त्याच्या चरणांवर वाहीन..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

आयुष्याच्या पानांवर पुढे..

माचं पर्व अधुरंच राहील..

तुझ्या उल्लेखाशिवाय माझं जीवनसुद्धा..

अपुरंच जाईल..

मरताना सुद्धा ओठांवर तुझंच नाव घेत जाईन..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

असं.. कधी वाटलंच नव्हतं

आयुष्य हे.........!!

आयुष्य हे.........!!


जीवन एक शाळा म्हणून...

जन्मभर शिकत राहिलो...

मोठा न होता आले कधी....

फक्त happy birthday ऎकत वाढत राहिलो.



कोणाला न देऊ शकलो काही .....

जन्मभर मी मागत राहिलो...

आला दिवस गेला तैसा.....

घटका फक्त मोजत राहिलो.



गुन्हा न करताही.......

शिक्षा फक्त भोगत राहिलो....

अहो......! वाईट नाही मी खरच..........!!

आयुष्यभर पटवून देत राहिलो.



एकामागून एक गेले.........

नवे नाते जोडत राहिलो.......

भेटेल का कोणी जीव देणारा.....

हेच फक्त शोधत राहिलो.



उरला न भरोसा कुणाचा........

फक्त दिलासे मनाला देत राहिलो...

रडण्याची न मुभा मला....

दुसर्यांचे डोळे पुसत राहिलो.



शपथेवरचे खेळ इथले.......

खेळत आणि हरत राहिलो.......

जखमेवरती हात ठेउनी..........

आयुष्यभर हसत राहिलो

एक मैत्री अशी हवी

एक मैत्री अशी हवी ........


पाहता क्षणी मन भरून यावे.......



एक

मैत्री अशी हवी ........

मन तिच्याच भोवती सतत रुंजी घलाव.........



एक

मैत्री अशी हवी ........

मनातल्या गोष्टी तिला संगीतल्याशिवाय मन हलके न

व्हावे



एक मैत्री अशी हवी ........

अवगुनाकडे हक्काने बोट

दखावानारी

आणि आदराने चूका कबूल करणारी



एक मैत्री अशी हवी

........

प्रेमाचा स्पर्श असलेली

प्रेमाने चेहर्यावर हस्याची कारंजी

फुलावनारी



एक मैत्री अशी हवी ........

विश्वसाने विश्वास

सम्पादुन

मैत्रिच्या नात्याला एकरूप करणारी



एक मैत्री अशी हवी

........

भविष्यत कितीही नाती जोडली गेली

तरी मैत्री या नत्याला अंतर

न देणारी ....

समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.


1) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.



2) आयुष्यातल्या

कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.



3) मनात आणलं तर या जगात अश्यक्य

असं काहीच नाही.



4) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.



5) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.



6) आवडतं तेच

करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.



7) तुम्ही किती जगलात

ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.



8) अश्रु येणं हे माणसाला

ह्रदय असल्याचं द्योतक आहे



9) कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल , तर

अपयश पचविण्यास शिका.



10) स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी मनुष्य

इतरांच्या त्रुटींकडे लक्ष

" मन "


आथांग, विशाल असं काहीतरी असतं

वेगलं काही नसून ते अपलं मन असतं;

अस्थिर, चंचल असं काहीतरी असतं,

खरंच ते आपलं वेडं मनंच असतं



काही क्षण फारंच सुंदर असतात,

ते मनाच्या गाभार्यात साठवायचे असतात,

काही गोष्टी कोणाला सांगायच्या नसतात,

त्या फक्त आपल्या मनाशी बोलायच्या असतात,



जगण्यासाठी प्राणवायु मानसास लागतो,

सोबत एक चांगलं मनसुद्धा लागतं,

जगण्यासाठी मनासंसुद्धा एक छानसं स्वप्नं लागतं,

तुटलं जर ते, तर बिचार्‍या मनालाही लागतं



क्षणात हसवणारं,क्षणात रडवणारं हे मनंच असतं,

रहस्यमयी,फसव्या गोष्टींन्चं ते गोदामंच असतं,





जर हे मन कायम रिकामंच राहिलं असतं

तर वाटतं किती बरं झालं असतं,किती बरं झालं असतं....

पाने आज आयुष्याची

पाने आज आयुष्याची


थोडी चाळून पाहिली

चोळामोळा झालेल्या

त्या पानांवर ...

सुरकुत्या पडलेली

अक्षरे फक्त तेव्हडी राहिली



बालपण पहिल्या पानावर

हसत खेळत होत ...

वाटचाल करीत ...नाजूक पावलांनी

तरुण एक पान....

२५ पाने मागे सोडून ..

दिमाखात स्वताच्या पायावर

एकटच उभ होत....



जबाबदारीच एक पान..

दुमडलेल ..थकलेल भासल

शब्द परिवार माझा ...

म्हणत त्याच पानाला

वोघळलेला घाम पुसत हसलं..



एकावर एक बरीच पाने होती

काही कोरी करकरीत

न वाचलेली ....

काही वाचून वाचून ....

मळलेली ...



शेवटास एक पान ..

खूप जीर्ण झालेलं

फाटलेल ...स्वतावर लिहिलेल्या

शब्दांना कस बस ..त्याने

अंग चोरून सवरलेल ...



पण ते दुखी दिसलं नाही..

किवा हसलही नाही ...

शेवटी असल्यावरही..

सुरवात आहे ...

असच म्हणताना भासल काही..



बऱ्याच पानावर मला

काही जागा सुटल्यागत दिसल्या

पण त्याही तेवढ्याच ...

समाधानी वाटल्या .....

Thursday, February 10, 2011

मैत्री म्हणजे काय असतं?


मैत्री म्हणजे काय असतं?
एकमेकांचा विश्वास असतो?
अतूट बंधन असत? की
हसता खेळता सहवास असतो?
मैत्री म्हणजे मैत्री असते,
व्याख्या नाही तिच्यासाठी;
अतूट बंधन नसत,
त्या असतात रेशीमगाठी
मैत्री असते पहाटेच्या दवासारखी,
थंडगार स्पर्श करणारी;
मैत्री असते केवड्यासारखी,
तना-मनात सुगंध पसरवणारी
मैत्री असते सुर्योदयासारखी,
मनाला नवचैतन्य देणारी;
मैत्री असते झाडासारखी,
उन्हात राहून सावली देणारी;
मैत्री करावी सोन्यासारखी,
तावुन-सुलासुलाखून चमचमणा;
मैत्री करावी हिर्या सारखी,
पैलू पडताच लख-लखणारी;
मैत्री असावी पहाडासारखी,
गगनाला भिडणारी;
मैत्री असावी समुद्रासारखी,
तलाचा थान्ग नसणारी;
मैत्री म्हणजे समिधा असते,
जीवन यद्न्यात अर्पण झालेली;
स्वताच्या असन्याने सुद्धा
मन पवित्र करणारी;
मैत्री हे नाव दिलय
मनाच्या नात्यासाठी;
अतूट बंधन नसत त्या असतात







तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटू लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटू लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपून ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवू नयेत म्हणून
काळजाच्या तिजोरीत लपून ठेवतो

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असच राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील

मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतून
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात

बसले होते एकांतात आठवल्या त्या आठवणी

बसले होते एकांतात आठवल्या त्या आठवणी
काही पुसटश्या तर काही दिसेनाश्या......

काहींना लागलेला गंज
तर काही अडगळीत पडलेल्या
वर्षानुवर्ष जपलेल्या
पण म्हाताऱ्या झालेल्या.....

काही अलीकडच्याच स्वप्नात झुलत होत्या
स्वताला न्याहाळत आकर्षित करत होत्या
त्यातही काही गोड तर काही कडू होत्या
काही सुखद तर काही दुखद......

जवळ कोणी नसताना
सोबत असल्याचा धीर देतात
फेकल्या कितीही दूर तरी
जीवनाचा आधार बनतात.....

किती विचित्र असतात या आठवणी
पण एकांतात साथ आपली देतात.....
मनात दुख असतानाही
चेहऱ्यावर हास्य आणतात
 
 
 
जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात........

काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात........

नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........

पण् कुणी दूर गेले तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही....

येशील ?



अंधारात वाट शोधता येत नाही,
आणि कधीही परत येत नाही
त्याची कुणीच वाट बघत नाही....
तरीही मी अंधारात चाचपडायचं,
आणि वाट बघत रहायची..... तुझ्या येण्याची !

तू जाताना रणरणत्या उन्हाने
तुझे पाय भाजले असतील,
माळरानीचा उनाड वारा
तुझ्या केसांशी भांडला असेल....
आता मात्र तोच वारा
फुलांचा सुगंध गोळा करतोय,
आणि हिरव्यागार गवताचा स्पर्श
चुकलेल्या पावलालाही सुखावतोय... येशील ?

तेव्हा गावची नदी आटली होती,
आणि बहुतेक आपली मैत्री आणि गप्पाही...
आता काठांनाही पालवी फुटली आहे,
आणि शब्दांचा तर पूरच पूर....

बाकी काही नाही तरी
शब्दांना शब्दांची जोड द्यायला.... एकदा तरी येच !

दोन क्षण.....


मी पाहिले तुला
तु न् पाहिले मला,
चातकाने किती पाहिली वाट
ढ़ग मात्र न् बरसताच गेला!

कळया नुकत्याच उमललेल्या
पहाटेच्या दवाने न्हालेल्या,
तुज़्या ओन्जळित् हव्या होत्या खरया
पहिल्या मी सन्ध्याकाळि कोमेजलेल्या!

छोटासाच मी एक
खऴाऴता आहे झरा,
पारिजातक वाहण्याची होती आस
पाहिला मी रिक्त सडा!

सूर्यसुध्दा थाम्बलेला
चन्द्राच चान्दण प्यायला,
तुला खरच का वेळ नव्हता
मला दोन क्षण पहायला?

ह्याला जीवन ऐसे नाव...

 मृत्यू ज्ञात तरीही त्याची, बेगडी ती धाव.

वा‌र्‍यावरती फ़ुल आणि चंद्रावरती झूल
खिश्यांमधे कोंबलेला पोटासाठी पाव.
ह्याला जीवन ऐसे नाव...

भरभर वाटभर चांदण्यांचा थर
कुणी म्हणे धुळ त्याला घेई माथ्यावर
घामेजल्या अंगाचा हा कुणा पेहराव.
ह्याला जीवन ऐसे नाव...

चुल्ह्यावर भाकरीची थाप त्याला येई
नळावर पाण्यासाठी धाप त्याला येई
कमाई काय? दारावर तेव्हडच नाव.
ह्याला जीवन ऐसे नाव...

नव काय, जुन काय, वाहतं ते पाणी
साचलेल्या स्वप्नांमधे जाते जिंदगानी
सरड्याची ठरलेली कुंपणाची धाव.
ह्याला जीवन ऐसे नाव...

थकलेल्या देहाला ह्या फ़ुंकराची आस
बायको देते चहा बसं तेव्हडा वाटे खास
हातात घेतो रिमोट जरा M TV लाव.
ह्याला जीवन ऐसे नाव...

Friday, January 28, 2011

जीवन असंच जगायचं

जीवन असंच जगायचं
काहितरी वेगळ करायचय........

ढगातुन थेंबाच्या सोबत बरसायचय
पाणवठा जरी गढुळ असला तरी
पुन्हा पाणवठयात येवून नहायचय.

काहितरी वेगळ करायचय........

आसमंतात वा-यासारख झाडांना झोंबायचाय
पानांच्या जाळीवर बसुन उडायचय
मिटलेल्या श्वासांना आता
अस्तित्वातात आणायचय.

काहितरी वेगळ करायचय........

स्वप्नांच्या देशात भटकायचय
प्रयोगानिशी शोधायचय
भवनेच्या पंखात बळ घेऊन
पुन्हा मायदेशी परतायचय.

काहितरी वेगळ करायचय........

चिखलातल्या कमळाला फुलवायचय
सुकलेल्या फुलांना जगवायचय
माती रुक्ष असलि तरी
मातीतल्या माणसांसाठी जगायचय

जीवन असंच जगायचं

जीवन असंच जगायचं
काहितरी वेगळ करायचय........

ढगातुन थेंबाच्या सोबत बरसायचय
पाणवठा जरी गढुळ असला तरी
पुन्हा पाणवठयात येवून नहायचय.

काहितरी वेगळ करायचय........

आसमंतात वा-यासारख झाडांना झोंबायचाय
पानांच्या जाळीवर बसुन उडायचय
मिटलेल्या श्वासांना आता
अस्तित्वातात आणायचय.

काहितरी वेगळ करायचय........

स्वप्नांच्या देशात भटकायचय
प्रयोगानिशी शोधायचय
भवनेच्या पंखात बळ घेऊन
पुन्हा मायदेशी परतायचय.

काहितरी वेगळ करायचय........

चिखलातल्या कमळाला फुलवायचय
सुकलेल्या फुलांना जगवायचय
माती रुक्ष असलि तरी
मातीतल्या माणसांसाठी जगायचय

जीवन असंच जगायचं

जीवन असंच जगायचं
तुझी नि माझी मैत्री एक
गाठ असावी
कुठल्याही मतभेदाला तेथे
वाट नसावी
मी आनंदात असताना हास्य तुझे असावे
तू दुःखात असताना अश्रु माझे असावेत
मी एककी असताना सोबत तुझी असावी
तू मुक असताना शब्द माझे असावेत

Monday, January 24, 2011

मैत्री म्हणजे सुंदर पहाट

मैत्री म्हणजे सुंदर पहाट




कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..



आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं



सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..



फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं



कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं



आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ



हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..



मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा



अन् जणू दरवळणारा मारवा



अंगावर घ्यावा असा राघवशेला



एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...



ऍकत रहावी अशी हरीची बासरी



अस्मानीची असावी जशी एक परी...



मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी



दु:खावरची हळुवार जादूची झप्पी



मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात



नेहमीकरता असणारी तुझीचं साथ

काही माणसे असतात खास

काही माणसे असतात खास


जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,

दुःख आले जिवनात तरीही

कायम साथ देत राहातात.



काही माणसं मात्र

म्रुगजळाप्रमाणे भासतात,

जेवढे जवळ जावे त्यांच्या

तेवढेच लांब पळत जातात.



काही माणसे ही गजबजलेल्या

शहरासारखी असतात,

गरज काही पडली तरच

आपला विचार करतात,

बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात

काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.



मात्र काही माणसं ही

पिंपळाच्या पानासारखी असतात,

जाळी झाली त्यांची तरी मनाच्या

मैत्री करत असाल तर

मैत्री करत असाल तर


पाण्या सारखी निर्मळ करा

दूरवर जाऊन सुद्धा

क्षणों क्षणी आठवेल अशी करा



मैत्री करत असाल तर

चंद्र तारे यां सारखी अतूट करा

ओंजळीत घेवून सुद्धा

आकाशात न मावेल अशी करा



मैत्री करत असाल तर

दिव्यातल्या पणती सारखी करा

अंधारात जे प्रकाश देईल

हृदयात अस एक मंदीर करा



मैत्री करत असाल तर

निसर्गापेक्षा ही सुंदर करा

शेवट पर्यंत निभावण्या करता

लाख क्षण अपूरे पडतातआयुष्याला दिशा देण्यासाठीपण,

""लाख क्षण अपूरे पडतात


आयुष्याला दिशा देण्यासाठी

पण, एक चुक पुश्कळ आहे

ते दिशाहीन नेण्यासाठी,,,,,,,,,,,,,,,,!

किती प्रयास घ्यावे लागतात

यशाचं शिखर चढण्यासाठी

पण, जरासा गर्व पुरा पडतो

वरुन खाली गडगडण्यासाठी,,,,,,,,,,,,!

देवालाही दोष देतो आपण

नवसाला न पावण्यासाठी

कितींदा जिगर दाखवतो आपण

इतरांच्या मदतीला धावण्यासाठी,,,,,,,,,!

किती सराव करावा लागतो

विजश्रीवर नाव कोरण्यासाठी

पण, जरासा आळस कारणीभूत ठरतो

जिंकता जिंकता हरण्यासाठी,,,,,,,!

कितीतरी उत्तरं अपुरी पडतात

आयुष्याचं गणित सुटण्यासाठी

कितीतरी अनुभवातनं जावं लागतं

आयुष्य कोडं आहे पटण्यासाठी,,,,,,,,,!

विश्वासाची ऊब द्यावी लागते

नात्याला जिवनभर तारण्यासाठी

एक अविश्वासाचा दगड सक्षम आहे

ते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी

Thursday, January 20, 2011

आठवणींचे कपाट ...


आठवणींचे कपाट ...


काय कराव काही सुचत नव्हत
काम तर होत पण करायचं नव्हत
शांत बसायला कधी जमलच नाही
बोलायलाही तेव्हा जवळ कुणी नव्हत

घरभर उगीच मग तसाच फिरत राहिलो
अडगळीच्या खोलीत जरा हळूच शिरलो
समोरच दिसलं ते छोट जून कपाट
उघडावं की जाव हाच विचार करत राहिलो

न राहवून शेवटी मी उघडलंच ते
करकरल थोड ... थोड डगमगल ते
धुळीचा एक लोट मग हवेत उठला
जळमट काढून नीट निरखल ते

काय काय नव्हत त्या एवढ्याश्या कपाटात
अख्ख बालपण माझ ठासून भरलेलं त्यात
एक एक कप्पा एक किस्सा होता सांगत
साठवायलाही आज पण जागा नव्हती घरात

मी जिंकलेल्या त्या पिशवीभर गोट्या
भातुकलीच्या खेळातल्या पितळेच्या वाट्या
रंगबिरंगी जमवलेल्या आता फुटलेल्या काचा
थोडे शंख-शिंपले, थोड्या लगोरीच्या चपऱ्या

कोपऱ्यात जुन्या पुस्तकांची थोडी थप्पी होती
रंगवलेल्या चित्रांची एक वहीही होती
लाकडी डब्यात एका तांब्याची नाणी होती
एक हत्ती, एक घोडा, एक बैलगाडीही होती

सारे किती क्षुल्लक किती स्वस्त होते
चार दोन आण्यांच्या किमतीलाही नव्हते
लाखमोलाचे क्षण परी त्यात होते गुंतलेले
कसे आज सांगू किती निसटले होते

दिवसभर तसाच मी तिथेच रमलेला
स्पर्श होता साऱ्याचा लहानगा झालेला
हाक मारली कुणी तेव्हा भानावर आलेला
आठवणींचे कपाट मनी बंद करून निघालेला ...

आठवणींचे कपाट मनी बंद करून निघालेला ...

जन्मी पुढच्या चालू आपण !!!



 फुले पाकळी मन मोहणारी
कोमजली आहे या वसंतात
या जन्माची उजाड़ बाग़
जन्मी पुढच्या फुलवू आपण !!!

आठवून भेट प्रथम आपली
आजुनही होते हृदयात कम्पन
सात पावले या जन्मातली
जन्मी पुढच्या चालू आपण !!!

रंग गुलाल उधळले सारे
रंग विहीन जीवन झाले
या जन्मी न रंग्लो जरी
जन्मी पुढच्या रंगु आपण !!!

भातकुलीचा खेळ हा
मोडला जरी अर्ध्यावर्ती
या जन्मातले राजा राणी
जन्मी पुढच्या होऊ आपण !!!

एकत्र पुन्हा येण्यासाठी
चल आता संपू आपण
नाहीतरी कुठे जगतोए एकटे
जन्मी पुढच्या जगु आपण !!

कधी काळी मी तुझा श्वास होतो..


 मी तुझ्यावर जेव्हा प्रेम करायचो
काय माहित काय मी करायचो...
तुझ्याच स्वप्नात मी जगायचो
आठ्वानित तुझ्या मी मरायचो...

पण आता का असे भासत नाही
तुझ्या नेत्रात हल्ली तो भाव असत नाही...
स्वप्न पड़न्यासाठी झोपायचा प्रयत्न करतोए
झोप तर नाही म्हणुन आठ्वानित नुस्त मरतोए...

काय ग करू मी जगता पुन्हा येत नाही
तुझ्या माझ्या मधे जो बांध तो कळत नाही ...
तू फ़क्त दखावतेस की तुला सुध्हा कळत नाही
जानतेस तू सारं पण मुद्दाम तू वळत नाही ...

प्रेम करत राहलो मी आजवर पाहित
डोळे बंद करून घाव राहलो सहित...
तूच म्हणायचिस प्रेमात जगायचे असते मरायचे नाही
पण जगणारेच घात करतात येथे मरणारे नाहीत ...

मी तर तुझा प्राण होतो
इतका कसा मी खोटा झालोए...
तुट्लेल्या तुझ्या ह्रुदयाचा
चुकीने पडलेला ठोका झालोए ...

कधी काळी मी तुझा ख़ास होतो
का आता परका झालोए...
कधी काळी मी तुझा श्वास होतो
आता मात्र ठसका झालोए...

विराहाच्या या जगात


विराहाच्या या जगात
असच काही होत असते
बाहेर कुणी हसत असते
आत कुणी रडत असते


काटयांनी भरलेल्या वाटेवर
मूकाटयाणे चालTयचे असते
पायाला रुतला जरी कटा
फुलाचा स्पर्श दाखवायचे असते


मग नको असते ति पहाट
नसते आपली ति सायंकाळ
उरतो फ़क्त आपल्या हक्काचा
रक्तबंबाळ करणारा भुतकाळ


पण ते मला मान्य आहे
तो तुझ्या सारखा ह्रदय मोड़त नाही
कितीही वेदना दिल्या तरी
मला एकटे सोडत नाही...


सर्वे ह्रदय तोड़णारे ऐकून घ्या
तुमचाही कधी हाच हाल असंणार आहे
रडाल जेव्हा तुम्ही तेव्हा
आम्ही सर्व हसणार आहे


त्या हसू मागे किती अश्रु आहेत
तेव्हा तुम्हा लोकांना कळणार आहे
याल धावत तुम्ही आमच्या बाहुत
अणि आम्ही मागे वळणार आहे


पण खरं प्रेम करणारे
कधीच असं नाही करू शकत
कितीही स्वतः रडले तरी
त्या डोळ्यात अश्रु नाही बघू शकत


त्या पणावलेल्या डोळ्यांना मग
आपल्या हास्याने सुकवायचं असतं
मन कितीही रक्त रडले तरी
चेहर्यावर हसू उम्लायचं असतं


विराहाच्या या विश्वात
असच सारे जगत असतात
बाहेर कुणी हसत असतात
आत सर्वे रडत असतात ...


आत .....
सर्वे .....रडत असतात

"कदाचित तुला माझी आठवण येईल !


"कदाचित तुला माझी आठवण येईल !"

खिडकीत जेव्हा उभा तू असशील
ऐकू येईल पानांची सळसळ
काही शब्द ओळखीचे वाटतील
दबक्या आवाजातले, अधीर मिलनाचे
बघ त्यांना ऐकताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !

चहाचा कप ओठी तू लावताना
अचानक तुझ्या लक्षात येईल
अजूनही तिच्या ओठांचे ठसे
कपावर उष्ण उसासे घेत आहेत
बघ त्यांना जाणवताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !

एकट्याने बाईक चालवताना
मंद झुळूक कानाशी खेळेल
स्पीड-ब्रेक जवळ ब्रेक मारताच
कुणी घट्ट बिलगल्याचे जाणवेल
बघ तो स्पर्श आठवताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !

मुसळधार पाऊस असतानाही
पानांवरचे ओघळते थेंब पाहून
तिच्या निथळत्या केसांमधून
भिजलेले ते क्षण, तुला स्मरतील
बघ त्यांना स्मरताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !

रात्री गोड झोपेत असताना
हलकेच कुणी स्पर्शून जाईल
पावलांना तुझ्या स्पर्श होता,
ती असल्याचा भास होईल
बघ तो भास होताच, कदाचित तुला माझी आठवण येईल !

मी काही जगात पहिला नाही


मी काही जगात पहिला नाही
ज्याच्या प्रियसीच लग्न झालाय
आता दु:ख करण्यात काय अर्थ
ती थोडीच परत येणार आहे
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

मी माझ्या मनाला समज घातली
पण, थोडा वेळ तर लागणारच
सार काही एका क्षणांत नाही संपत
या सारया लोकांना कोण सांगणार
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

मी जीवाच बर वाईट नाही करणार
मला पण भरपूर जगायचं
तिने मला प्रेमात नकार दिला म्हणून काय
मला अजून बरच काही बघायचं
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

मी कधी गप्प गप्प राहतो
याचा अर्थ मी तिचा विचार करतो असा
सारेच मला समजावण्याचा प्रयंत्न करतात
तुला हे वागण शोभत नाही असा म्हणतात
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

बाहेरच्या लोकांच एवढ मनावर घेत नव्हतो
पण, आता घरच्यानिहि सुरवात केली
काय झाल जरा सांगशील का आम्हला
का तिच्यासाठी तू हि अवस्था झाली
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

तिच्याएवढी ती सुंदर नसलीतरी
कोणीतरी नक्कीच असेल माझासाठी
अण, मी पण तिच्याच शोधात आहे
जिच्यासोबत देवाने बांधल्या सातजन्माच्या गाठी
(कारण आठव्या जन्मी फक्त ती हवी)

And that time no more compromise

म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

पण तुझ्यासाठी सखे मी तुझाच त्याग करेन ....


माहित आहे मला,
 माहित आहे मला तुझ विण हे जीवन व्यर्थ ठरेल ,
पण तुझ्या साठी सखे मी तुझाच त्याग करेन....
पण तुझ्या साठी सखे मी तुझाच त्याग करेन....


तू दिलेल्या वचनांपैकी एक वचन होत,तुला सुखी ठेवायच ,
म्हणूनच...........
म्हणूनच धाडस केल सखे तुला नाही विच्यारायच ,


इच्छा नाही.
इच्छा नाही मला डोळ्यात तुझ्या अश्रु पहायची म्हणूनच वेळ आली आज तुझा निरोप घेण्याची ,
मला स्वार्थी म्हणनार्यानी खुशाल स्वार्थी म्हनाव...................
मला स्वार्थी म्हणनार्यानी खुशाल स्वार्थी म्हनाव...................
पण देवारयात देव म्हणुन बसनार्याने एखादा तरी मानुस म्हणुन बघाव ,


मी वेडा आहे ,
हो मी वेडा आहे फ़क्त तुझ्या प्रेमासाठी ,
मला वेडा म्हणनार्यानी खुशाल वेडा म्हनाव ,
पण वेडा म्हनतानाही मझ्यातल शाहाणपण जनाव,


मला माहित आहे तुझी प्रत्येक आठवण मला रडवेल
पण तुझ्यासाठी सखे मी तुझाच त्याग करेन ........

ते एक वडील असतात..


ते एक वडील असतात...
आई प्रेमाची नदी तर, वडील सागर असतात
खारट पाणी असूनसुद्धा ,सर्वाना समावून घेत असतात

घरातल्या सर्वांवर त्यांची, करडी नजर असते
मुले घरी वेळेवर नसली तर, गच्चीतच त्याची मूर्ती उभी असते

पोरांनी खूप मोठे झालेले पाहणे, हे त्याचे स्वप्न असते
त्यासाठी घरदार सोडून पळण, त्याच्या जिवालाच माहिती असते

नसेल प्रेम दाखवत तरी ,आतून वाहता झरा असतात
पोर जेवली का विचारल्याशिवाय ,ते ताटाला हात लावत नसतात

शाळा कॉलेज च्या प्रवेशासाठी, घाम टिपत रांगेत तेच उभ असतात
पैशाची जमवाजमव करत, तुटकी चप्पल पुन्हापुन्हा शिवत असतात

पोरग शाळेत जाऊ लागले कि, त्याला सायकल हवी असते
थोडी वरची पायरी चढल्यावर, त्याला बाइक नवी लागते

वडील आपल अजूनही ,बसच्या मागे पळत असतात
पोर नोकरीला लागल्यावर, आता चार चाकीच घेईन म्हणतात

मुलांची लग्न झाल्यावर, स्वेच्छा निवृत्ती घेईन म्हणतात
मुले नातवंडे परदेशी गेल्यावर रिकाम्या घरात, नोकरीला गेलेलेच बरे म्हणतात

चारचौघात कोडकौतुक करणार, ते एक वडील असतात
आई समईतील ज्योत, तर जळणारी फुलवात वडील असतात

आर्जवी ही हाक माझी, एकदा ऐकून जा...


चिघळल्या जखमा मनी, स्पर्शू नको,फुंकून जा
आर्जवी ही हाक माझी, एकदा ऐकून जा....

भावना-संवेदनांचा बांध कोसळला असा,
कोरड्या डोळ्यात माझ्या खार-पाण्याचा ठसा.....
सांत्वनाची चार वाक्ये, खोटीच तू बोलून जा...
आर्जवी ही हाक माझी, एकदा ऐकून जा....

निखार्यावर चालतांना भाजले हे पाय रे,
पाऊसही तेज़ाब झाला, झेलता मी हाय रे !!
जाळ उरी चेतला, विझवू नको, पाहून जा....
आर्जवी ही हाक माझी, एकदा ऐकून जा....

कोमेजल्या मनी अजुनी, गंध आहे मोगरा,
करपल्या श्वासात थोडा उरला रे केवडा...
जपले जे तुजसाठी, तुझे तुच घेऊन जा...
आर्जवी ही हाक माझी, एकदा ऐकून जा....

सरणाची राख झाली, प्रेत नाही संपले,
अंताच्या क्षणात होते, तुजमध्ये गुंतले....
अखेरची आग आता, शेवटी लाऊन जा....
आर्जवी ही हाक माझी, एकदा ऐकून जा....

मनी तुझ्या काय.


मनी तुझ्या काय..
मनी तुझ्या काय..
मनात तुझ्या काय हे आजपर्यंत नाही उमजल,
खुपदा प्रयत्न करते तुला विसरण्याचा पण बघ ना
मला एवढही नाही जमल,
का बोललास माझ्याशी तू एवढ काही ,
आता या जन्मात तुला विसरण शक्य नाही,
एखाद्या जागेवर असूनही मी मनानी तिथे नसते,
हाथांमधल्या वाकड्यातिकड्या रेषांत मी तुला शोधते,
का भेटलास मला तू जर ,
तुला मला त्रासच देऊन जायचं होत,
का खोट बोलला माझ्याशी,
डोळ्यांत तुला माझ्या आसवच देऊन जायचं होत....

Monday, December 27, 2010

माफ कर मित्रा मला, मोठी चूक झाली यार

माफ कर मित्रा मला, मोठी चूक झाली यार,
त्या चुकीसाठी एवढी शिक्षा खूप झाली यार.
त्यादिवशी आपण एकमेकांशी विनाकारण भांडलो,
मग तू माझ्याशी कधीही न बोलण्याची शपथ घेतलीस,
तू माझ्याशी बोलणं सोडलस आणि मला एकट केलंस,
तोंड असून माझ्याकडे मला मुकं करून टाकलस,
खरंच सांगतो, मी आजकाल फारसं कुणाशी बोलत नाही रे,
बोलण्याकरता अनेक गोष्टी सुचतात आणि आतल्या आत विरतात...
तू जरी बोलणं सोडलस, तरी मी मात्र तुझ्याशी आजही पूर्वी इतकाच बोलतो,
पूर्वी फक्त मी तुझ्यातल्याच तुझ्याशी बोलायचो,
आज मी माझ्यातल्या तुझ्याशी बोलतो...
आजकाल तू मला नेहमीच टाळतोस,
मी असेन जिथे, तेथून तू पळ काढतोस,
थांबावं लागलंच तुला, तर माझ्या आरपार तू पाहतोस,
इतर मित्रांमध्ये तू खूष आहेस, आनंदात आहेस,
हे दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्नही करतोस,
कधी एकदा माझ्याकडे, माझ्या डोळ्यांकडे बघ,
खात्रीनं सांगतो, मी त्याही वेळेस तुझ्याच कडे बघत असणार......




आठवतात का रे तुला क्रिकेटच्या मॅचेस पाहायचो आपण,
इंडियाची कुठलीही मॅच पाहताना सारं जग विसरायचो आपण.
आपल्या सचिनची मध्ये एकदा डबल century झाली होती,
यार, काय तुफान मजा आली होती.
त्यानं शेवटच्या over मध्ये २०० धावा पूर्ण केल्या,
आणि मी आनंदानं उडीच मारली,
टाळी देण्यासाठी हात वर केला, आणि.............
मग लक्षात आलं, घरात एकटाच होतो रे मी,
मगाच पासून एकटाच ओरडत बडबडत होतो मी,
तू जवळपास आहेस असं समजून आनंदात होतो मी......
त्यादिवशी तुझ्या जवळ असण्याची किंमत माझ्या टाळीसाठी आसुसलेल्या हातांनाही समजली.
तुझ्या असण्याची खूप सवय झाली आहे रे,
त्यामुळे तुझ्या नसण्याची सवय नाही करता येत मला.
तू जवळपासच आहेस, असा भास होतो मला, त्रास होतो मला.
खरंच एक सांगू , सचिनने त्या दिवशी उगाच एवढ्या धावा केल्या.......
उगाच एवढ्या धावा केल्या...............




लोकं विचारतात , तुमच्या भांडणाच कारण काय होतं?
कारण महत्त्वाचं नव्हतं रे, इतके दिवस ते टिकलंच कसं हाच प्रश्न पडलाय बघ मला,
खरं तर ती असते एक excitement , ओसरल्यावर राग जातो पण भांडण उरतं,
पूर्वी केलेल्या चुकांच्या पश्चातापामध्ये आपण रोज जळत राहतो,
झालेल्या जखमेवर खपली धरायच्या आधीच भळभळून रक्त वाहू लागतं.
पण मला ठावूक आहे, ही जखम फक्त मलाच झाली नाही,
त्या अग्नीमध्ये फक्त मीच जळतो असं नाही,
कारण मला माहीत आहे, माझं बोलणं ऐकणारे जर कोणी नसतील,
तर तुझ्याशी बोलणारेही खूप कमी असतील.
माझी टाळी घेणारे जर कोणी नसतील ,
तर तुला टाळी देणारेही कोणी नसेन.
आणि मला हेही ठावूक आहे , वर्गात बाकावर जशी माझ्या डावीकडील जागा नेहमीच रिकामी असते,
तशी तुझ्या उजवीकडील जागासुद्धा रिकामीच असते..............




आणि एक दिवस मी असाच तुझ्या विचारात खिडकी शेजारी बसून होतो,
तेवढ्यात मी तुला माझ्या घरी येताना बघितलं,
माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसत नव्हता, पण ते घडत होतं.
तू घरात आलास, नकळत माझा हात हातात घेतलास.
खरं तर आता काहीच बोलण्याची गरज नव्हती, आणि शक्यही नव्हतं,
कारण शब्दांपेक्षा बाहेर पडायची घाई साल्या अश्रूंना झाली होती.........
मग तूच वाचा फोडलीस , आणि "Sorry" म्हणालास.
मीही तुला 'Sorry' म्हणणार इतक्यात.......गजराच घड्याळ वाजलं,
आणि नेहमीप्रमाणे त्या दिवशीही ते स्वप्न अर्धवट राहिलं,
पण खरंच एक सांगू, स्वप्नात का असेना,
तुला असं जवळून, हातात हात घालून पाहण्याचं सुख वाटत मला.
आजही मी असाच तुझ्या विचारात त्याच खिडकीशेजारी बसून राहतो,
कारण मला खात्री आहे, तू नक्की येशील ,
आणि नुसता हात हातात नाही तर घट्ट मिठीच मारशील.
अश्रूंना मी थांबवू शकणार नाही, पण मात्र माफी मीच आधी मागणार बरं का........
तेव्हा......करशील ना माफ मला?

नाही ती मला ,नाही सोडून गेली...

नाही ती मला ,नाही सोडून गेली...


नाही ती मला नाही सोडून गेली,
थोडस हसवून पार तोडून गेली..
स्वप्नांत छोटे घरटे बनवलेले,
स्वप्नातच ती ते मोडून गेली...

ती येण्या आधी,
मी माझा होतो...
ती आल्यावर तिचा...
मी ना आता माझा उरलो..
ना उरलो मी तिचा....

साला माझ्या डोळ्या देखात ती मला,
रक्ताळलेल्या शब्दांशी जोडुन गेली...
नाही ती मला नाही सोडून गेली....

रडायला येत ना,
पण मुलगा ना..
रडू शकत नाही..
मरावस ही वाटत ना..
पण जवाबदारी ना
मरु ही नाही शकत...

मरता येत नाही,
जगू शकत नाही..
मृत्यू ही माझ्या,
श्वासानशी भांडून गेली
नाही ती मला नाही सोडून गेली...

मला सोडून जाइलच कशी ती..
माझ्या डोळ्यात आहे ती...
माझ्या शब्दात आहे ती....
माज्या स्वप्नात आहे ती..
एवढाच काय..
तर माझ्या श्वासात आहे ती...

ती नाही..
तीच शरीर गेलय..
तीच मन तर माझ्याकडेच आहे...
स्वप्न घेऊन गेली तर गेली..
आठवणी तर माझ्याकडेच आहे....

कदाचित..
माझ्या पासून दूर जाताना..
ती तिलाच मारुन गेली
नाही ती मला नाही सोडून गेली...

आयुष्य खूप सुंदर आहे बघायला गेलं तर..................

आयुष्य खूप सुंदर आहे बघायला गेलं तर..................


आयुष्य खूप सुंदर आहे
बघायला गेलं तर

दु:खातही सुख आहे
जगायला गेलं तर

अश्रूंतही एक समाधान आहे
वाटायला गेलं तर

समाधानातही चिंता आहे
जपायला गेलं तर

काट्यांतही मखमल आहे
सोसायला गेलं तर

फुलां कडूनही जख्म आहे
कुस्करायला गेलं तर

अपयशातही नवी आशा आहे
पचवायला गेलं तर

यश खूपच क्षणिक आहे
उमजायला गेलं तर

मातीतच खरं सोनं आहे
शरीर श्रमाने माखल्यावर

रत्नांची शेवटी मातीच होते
फुलांनी शरीर झाकल्यावर

निखाऱ्यांवर चालावं लागतं
कापसावर उतानी पडल्यावर

वेदनांशी स्पर्धा करावी लागते
हास्य चेहऱ्या मागे दडल्यावर

कल्पना शक्तीचं प्रगती आहे
विज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर

प्रगतीच विनाशाचं कारण आहे
इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर

"त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहे
विचारात गीतासार साठवला तर

उदार वृत्ती कधी कधी घातक ठरते
सुर्यपुत्र कर्ण आठवला तर....

खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलं
त्या भाग्यवंतांचं ठीक आहे

उरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पण
अगणित उत्तरांचं पीक आहे

आषाढातल्या मेघासम

आषाढातल्या मेघासम
भरुन आलो कितीदातरी
पण तू भिजशील म्हणून
बरसलोच नाही कधी

सप्तरंगी रंगात तुझ्या
रंगून गेलो कितीदातरी
पण तुझा रंग ओळखशील
म्हणून बोललोच नाही कधी

कितीदातरी बहरून आलो
प्रजाक्तासारखा .. तू भोवती असताना
पण कधी सांगितलं नाही तुला ..
सुगंधानं भोवळ येईल म्हणून

तुझ्याकडे येताना कितीदातरी
ओंजळ भरभरून फुलं आणली होती ..
पण ओंजळ लपवली मी ,
माझ्या फुलानीही तुझे हात पोळ्तील की काय म्हणून

कितीदातरी कविता माझी
शब्दांची शीडं भरुन हाकारली होती तुझ्याकडे
पण ओळींच्या मधलं
सांगितलं नाही तुला ..तू बावरशील म्हणून ..

कितीदातरी भेटलो आपण ,
बोलताना अडखळलो आपण
पण अडखळण्याचे अर्थ कधी
विचारले नाहीत तुला..कदाचित तुला ठेच लागेल म्हणून ..

सखे, तूच सांग आज मी
ओंजळ माझी कशी लपवू ?
ओंजळीतल्या फुलांचे
श्वास कसे मी रोखू ?

...निघालीसच सखे , तर
आज तशी तू जाऊ नको
माझी ओंजळ हाती घेतल्याशिवाय
निरोप माझा घेऊ नको

माझ्या ओंजळीतली चार फुलं
वेणीमध्ये खोचून जा
'तूझी होते रे ... काही क्षणतरी ..'
असं एकदाच लाजून सांगून

प्रेम नाही करता आलं परत....

प्रेम नाही करता आलं परत
लग्न मात्र करावंच लागल
भावनांना विरहाच्या शय्येवर झोपवून
पुन्हा एकदा जगावंच लागल

अलीकडे भावना बिलकुल गोंधळ घालत नाहीत
बहुतेक त्या शिकल्यात आता मुक्यानेच रडण.....
माझ्याप्रमाणे त्यानाही वाटल होत
सहन करू शकतील त्या हे विरहाच वावटळ
पण अस काही जगण वाहून गेलंय की
आभाळ राहिलंय ना मनाचा तळ....


आता नाही कुठेच ठिकाणा
फिरता आहेत भावना पोरक्या होऊन......
रखरखत्या उन्हात......
ओसाड वाळवंटात.....


तू पडशील नजरेस एकदा या आशेवर......
अगणित विरहाच्या सुया टोचून घेतल्या आहेत
नेहमीच......
नेहमीच वेदनेशिवाय तुझ्या प्रेमाने काहीच दिल नाही
पण दोष त्यांचाही नाही,
निस्वार्थी प्रेमाशिवाय त्यांनीही दुसरं काहीच केलं नाही

ते दोघही एकमेकांवर

ते दोघही एकमेकांवर

जीव ओवालुन टाकत होते

ते फ़क्त एकमेकांसाठीच बनले आहेत

असे प्रत्येक जन म्हणत होते

एक क्षणही ते एकमेकांना सोडून राहु शकत नव्हते

त्या दिवशी त्याला गावाकडून बोलावणे आले

तो तिला काही दिवसात येतो म्हणून निघाला

आज खुप दिवस झाले पण तो आणखी आला नाही

ती सतत त्या वाटेला बघत रहायची

भकास डोळ्यात त्याचेच स्वप्न पहायची

पण तो काही आलाच नाही

मग काही दिवसाने तो आला

परन्तु तोवर खुप वेळ झाली होती

तिचा हाथ आज कुमाच्या तरी हातात होता

त्याला पाहताच तिची नजर बोलून गेली

ती म्हणाली=

वाट पहिली तू येशील म्हणून

पंती लावून ठेवली होती

अंधार पडेल म्हणून

तू तेव्हा आलास जेव्हा पंती गेली होती विझून

माझे दुर्भाग्य बघ तू मला शोधत आहेस

माझ्याच समाधीवर बसून

तो म्हणाला=

आता मी तुला काय शोधणार

तुझ्याच समाधीवर बसून

आग ! मी आज स्वताच समाधिस्त झालो आहे

तुझी ती समाधी बघून

कसलं रे हे तुझं logic.......?

कसलं रे हे तुझं logic.......?


म्हणे दूर राहिलो की समोरच्याला आपली किंमत कळते
कसलं रे हे तुझं logic.......?
मला मुळीच कळत नाही
तू बोलेनासा झालास ना मग
हे तुझ प्रेम आहे की राग.......
याचंही उत्तर मिळत नाही
मनाची गुंतागुंत होते sms करावा,
phone करावा की गप्पं रहावं?
खुपदा sms type करून delete होतो,
सारखं number dial करून cut केला जातो...
माहितेय मला दुरावा तुला असाह्य होतो
पण नाही बोलता आलं कधी म्हणून प्रेम का कुठे आटत?
बघ ना आभाळही कधी-कधीच काळभोर होऊन दाटत
आणि क्वचितच क्षितीजापलीकडे जमिनीला भेटत
कस पटवून देऊ तुला मलाही तुझ्याइतकाच
दुरावा असाह्य होतो.
फरक इतकाच आहे.....
मी लिहून सांगते आणि तू
न बोलता खूप काही बोलून जातो.....!

आठवण म्हणजे...

आठवण म्हणजे...


आठवण म्हणजे नक्की
काय भानगड असते?
प्रत्येकाच्या मानामध्ये
का घर करुन बसते?

आठवण असते...
कधी तिखट कधी गोड
कधी लहान कधी थोर,
कधी व्यक्त कधी अव्यक्त
कधी दु:खी कधी आनंदी.

आठवण असते...
आईचा हात धरुन
दुडू दुडू पळणारी,
बाबांच्या खांद्यावरुन
सारं गावं फ़िरणारी.

आठवण असते...
वर्गामधल्या मित्राची
हळूच खोडी काढणारी,
शाळेला दांडी मारुन
चिंचा बोर खाणारी.

आठवण असते...
बावरलेल्या नजरेनं
कॉलेजकडे पाहणारी,
कट्य़ावरच्या गप्पांमधे
तासनतास रमणारी.

आठवण असते...
तिच्या लाज-या स्मीतासाठी
दिवस रात्र झुरणारी,
मनातल्या भावना तिला
सांगायला घाबरणारी...

आठवण म्हणजे...
गतकाळाच्या क्षणांची ती
गोड साठवण असते,
प्रत्येकाच्या आयुष्याला
सुवर्ण कोंदण असते.

Tuesday, December 14, 2010

काय सांगु माझ्या बद्द

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
चार शब्द सांगतो
पण कोणी ऐकतच नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
ज्यांना आम्ही मित्र मानतो
मित्र ते आम्हाला समजतच नाहीत.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
मांडायचा प्रयत्न करतोय
पण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत. ......

Chetan Bhagat Message

स्पर्शं ..........!

स्पर्शं ..........!
केसांचा गुंता सोडतांना
एकदा तरी विचार कर,
बघ डोळे भरून येतील....
अश्रू भरभरून वहुत दे;
हृदयाला समजवण्यासाठी......!
पण............
पण तेव्हाच;
माझ्या हातांच्या स्पर्शाला
तुझे आसवे आसुसलेली असतील.
कदाचित......
कदाचित त्यामुळे तरी
ती डोळ्यांतून येणार नाहीत ...!
कारण...
तुला माहीतच आहे;
त्यांनाही माझ्या स्पर्शाची थोडी फार सवय झालेली असेल......!

केसात गजरा लावतांना
माझे एखादे वाक्य आठव;
हात हळूच मागे येतील....
पण..........
पण तेव्हाच,
नेहमी सारखा हट्ट पणा तुझा
तो तू घालाशिलच ....!
पण तो गजरा सुद्धा क्षणार्धात शोशीला जाईल.
कारण...........
तुला माहीतच आहे;
त्या गजऱ्यालाही माझ्या स्पर्शाची थोडीफार सवय झालेली असेल....!

जरा कधी चालतांना,
ठेच लागून खाली पडशील;
स्वताला सांभाळ.....
पडतांना हात तुझा हळूच वर उंचावलेला असेल,
आधार शोधायला त्यालाही वरती यावं लागेल....
कारण....
तुला माहीतच आहे;
तुझ्या हातांनाही माझ्या स्पर्शाची थोडीफार सवय झालेली असेल.

"प्रेम कथा "

"प्रेम कथा "
अंजली:- "हो विशाल, तू चांगला मुलगा आहेस, ........... पण मी राहुल ला सोडू नाही शकत....... कारण राहुलच्या हृदयाला
होल आहे आणि आता त्याच्याकडे कमी दिवस राहीले आहेत, त्याचे राहिलेले आयुष्य मी त्याच्या बरोबर राहावे अशी आमची दोघांची इच्छा आहे........... कारण आमचे प्रेम खरे आहे "

विशाल:- "माझे पण तुझ्यावर खरे प्रेम आहे त्यामुळे तुला आमच्या दोघांपैकी एकाची निवड करावि लागेल"

अंजली :- "राहुल कडे कमी आयुष्य आहे म्हणून मी त्याला सोडून तुझ्याबरोबर येऊन खर्या प्रेमाचे नाव बदनाम नाही करू शकत" So I am sorry Vishal ........!!

(10 दिवसांनतर)

राहुल :- "अंजली एक आनंदाची बातमी,....... मी heart transplant करून घेतले,......... दोघेही खूप खुश झाले.......

तितक्यात डॉक्टरांनी त्यांना एक पत्र दिले,

त्या पत्रात लिहिले होते की, "अंजली मी तुमच्या प्रेमामधे येऊ शकत नाही...... पण तुझ्यावर प्रेम करणेही थांबवु शकत नाही आणि तुझ्या शिवाय जगू सुधा शकत नाही, म्हणून मी माझे हृदय राहुलला दिले आहे फक्त एका छोट्या अपेक्षेने की मलाही तुझे प्रेम मिळत राहील"

I love you and now have a long love life ahead. फक्त तुझाच, स्वर्गवासी (हृदयवासी) विशाल