Thursday, March 10, 2011

पाने आज आयुष्याची

पाने आज आयुष्याची


थोडी चाळून पाहिली

चोळामोळा झालेल्या

त्या पानांवर ...

सुरकुत्या पडलेली

अक्षरे फक्त तेव्हडी राहिली



बालपण पहिल्या पानावर

हसत खेळत होत ...

वाटचाल करीत ...नाजूक पावलांनी

तरुण एक पान....

२५ पाने मागे सोडून ..

दिमाखात स्वताच्या पायावर

एकटच उभ होत....



जबाबदारीच एक पान..

दुमडलेल ..थकलेल भासल

शब्द परिवार माझा ...

म्हणत त्याच पानाला

वोघळलेला घाम पुसत हसलं..



एकावर एक बरीच पाने होती

काही कोरी करकरीत

न वाचलेली ....

काही वाचून वाचून ....

मळलेली ...



शेवटास एक पान ..

खूप जीर्ण झालेलं

फाटलेल ...स्वतावर लिहिलेल्या

शब्दांना कस बस ..त्याने

अंग चोरून सवरलेल ...



पण ते दुखी दिसलं नाही..

किवा हसलही नाही ...

शेवटी असल्यावरही..

सुरवात आहे ...

असच म्हणताना भासल काही..



बऱ्याच पानावर मला

काही जागा सुटल्यागत दिसल्या

पण त्याही तेवढ्याच ...

समाधानी वाटल्या .....

No comments: