Monday, December 27, 2010

प्रेम नाही करता आलं परत....

प्रेम नाही करता आलं परत
लग्न मात्र करावंच लागल
भावनांना विरहाच्या शय्येवर झोपवून
पुन्हा एकदा जगावंच लागल

अलीकडे भावना बिलकुल गोंधळ घालत नाहीत
बहुतेक त्या शिकल्यात आता मुक्यानेच रडण.....
माझ्याप्रमाणे त्यानाही वाटल होत
सहन करू शकतील त्या हे विरहाच वावटळ
पण अस काही जगण वाहून गेलंय की
आभाळ राहिलंय ना मनाचा तळ....


आता नाही कुठेच ठिकाणा
फिरता आहेत भावना पोरक्या होऊन......
रखरखत्या उन्हात......
ओसाड वाळवंटात.....


तू पडशील नजरेस एकदा या आशेवर......
अगणित विरहाच्या सुया टोचून घेतल्या आहेत
नेहमीच......
नेहमीच वेदनेशिवाय तुझ्या प्रेमाने काहीच दिल नाही
पण दोष त्यांचाही नाही,
निस्वार्थी प्रेमाशिवाय त्यांनीही दुसरं काहीच केलं नाही

No comments: