मृत्यू ज्ञात तरीही त्याची, बेगडी ती धाव.
वार्यावरती फ़ुल आणि चंद्रावरती झूलखिश्यांमधे कोंबलेला पोटासाठी पाव.
ह्याला जीवन ऐसे नाव...
भरभर वाटभर चांदण्यांचा थर
कुणी म्हणे धुळ त्याला घेई माथ्यावर
घामेजल्या अंगाचा हा कुणा पेहराव.
ह्याला जीवन ऐसे नाव...
चुल्ह्यावर भाकरीची थाप त्याला येई
नळावर पाण्यासाठी धाप त्याला येई
कमाई काय? दारावर तेव्हडच नाव.
ह्याला जीवन ऐसे नाव...
नव काय, जुन काय, वाहतं ते पाणी
साचलेल्या स्वप्नांमधे जाते जिंदगानी
सरड्याची ठरलेली कुंपणाची धाव.
ह्याला जीवन ऐसे नाव...
थकलेल्या देहाला ह्या फ़ुंकराची आस
बायको देते चहा बसं तेव्हडा वाटे खास
हातात घेतो रिमोट जरा M TV लाव.
ह्याला जीवन ऐसे नाव...
No comments:
Post a Comment