Thursday, February 10, 2011

बसले होते एकांतात आठवल्या त्या आठवणी

बसले होते एकांतात आठवल्या त्या आठवणी
काही पुसटश्या तर काही दिसेनाश्या......

काहींना लागलेला गंज
तर काही अडगळीत पडलेल्या
वर्षानुवर्ष जपलेल्या
पण म्हाताऱ्या झालेल्या.....

काही अलीकडच्याच स्वप्नात झुलत होत्या
स्वताला न्याहाळत आकर्षित करत होत्या
त्यातही काही गोड तर काही कडू होत्या
काही सुखद तर काही दुखद......

जवळ कोणी नसताना
सोबत असल्याचा धीर देतात
फेकल्या कितीही दूर तरी
जीवनाचा आधार बनतात.....

किती विचित्र असतात या आठवणी
पण एकांतात साथ आपली देतात.....
मनात दुख असतानाही
चेहऱ्यावर हास्य आणतात
 
 
 
जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात........

काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात........

नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........

पण् कुणी दूर गेले तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही....

No comments: