आठवण म्हणजे...
आठवण म्हणजे नक्की
काय भानगड असते?
प्रत्येकाच्या मानामध्ये
का घर करुन बसते?
आठवण असते...
कधी तिखट कधी गोड
कधी लहान कधी थोर,
कधी व्यक्त कधी अव्यक्त
कधी दु:खी कधी आनंदी.
आठवण असते...
आईचा हात धरुन
दुडू दुडू पळणारी,
बाबांच्या खांद्यावरुन
सारं गावं फ़िरणारी.
आठवण असते...
वर्गामधल्या मित्राची
हळूच खोडी काढणारी,
शाळेला दांडी मारुन
चिंचा बोर खाणारी.
आठवण असते...
बावरलेल्या नजरेनं
कॉलेजकडे पाहणारी,
कट्य़ावरच्या गप्पांमधे
तासनतास रमणारी.
आठवण असते...
तिच्या लाज-या स्मीतासाठी
दिवस रात्र झुरणारी,
मनातल्या भावना तिला
सांगायला घाबरणारी...
आठवण म्हणजे...
गतकाळाच्या क्षणांची ती
गोड साठवण असते,
प्रत्येकाच्या आयुष्याला
सुवर्ण कोंदण असते.
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment