Thursday, February 26, 2009

चूक..

एकदा चुकलो होतो रस्ताचालता चालता नेहमीचाच...
चल म्हणाल्या, "तुला रस्ता दाखवतो"माझ्याच काही भरकटलेल्या ओळी"आम्ही फिरलोत या खाच खळग्यातूनतुच भरलीयेस आमची अनुभवाची झोळी""धन्यवाद" म्हणालो मी, म्हटलं"आता तरी मला माफ करा""लिहिता लिहिता राहिलेत बरेचसे डागशक्य असेल तर त्यांनाही जरा साफ करा"समजूतदार माझ्या ओळी, म्हणाल्या"तुझं आमच्याशी कुठे वैर होतं,आमची खंत इतकीच की,तुझं लेखणीवर नाही, कागदावर प्रेम होतं"

आई, तुझ्यासाठी....

वाळु इथे खूप तापलीयथरथरणारी मी अजुन उभीयअंग तापलंय, मनही तापलंयएवढ्या सार्‍या अश्रुंनी तरी नाही विझलंय...कपाळावरुन पाठीवरुनघाम निथळुन रक्त गेलं पाणी बनुन.आठवण आली तुझीवार्‍याची मंद झुळुक जशी.जन्मा आले तेव्हापासुन तुझाच एक भागम्हणुन जपलंस तु मला,केसांनाही कधी चुकुनहीत्या तप्त उन्हाचा स्पर्श होउ दिला नाहीस.मोत्याचे दाणे भरवतानाएकेक दाणा पारखुन भरवायचीस.घरट्यांत पिसं पसरवतानामखमली पिसं मलाबोचरी पिसं स्वतःला ठेवायचीस.पंखांवर तुझ्या वादळी पाउसतुझ्या पंखाखाली मी मात्र सुरक्षित.तुझा हात पाठीवरुन,अवघा स्वर्गाचा वारा देहभर....तुझ्या शरिराचा वास,गं आई,अजुन इथं दरवळतोय सुवास्...पंख फुटले चिमण्या पाखरालातुझं चिमण गेलं दूर तुझ्यापासुन,म्हणुन का गं तुही पिलाला सोडुन गेलीस?आता नाहीत माझ्याजवळते हिरवं झाड, मखमली पिसं आणितुझे मऊ हात....आहेत मोत्याचे दाणे पण नाही त्यात तो गोडवा...माझ्याजवळ तुझ्या आठवणींची हळुवार प्रेमळ झुळुकपण भोवती,तप्त वाळु, तप्त आसवं आणि.......

तुझ्याविण

बोलायाचे सारे शब्दओठांत मिटले,बांधायाचे सारे बंधक्षणांत सुटले.
नेमाचे बोलणे आताथांबले सदाचे,जपायाचे नाते आतामनात लपले.
आठवणी ओल्या गेल्याअश्रुंत वाहून,कोरडे ते अभ्र माझ्याउरात दाटले.
कठीण हे जीणे माझेकधीच नव्हते,सोपे तुझ्याविण मलानाही सापडले.-हर्षल

तुझी आठवण.....

तुझी आठवणम्हणजे ऊरी आगहृदयावर जसानिखार्‍याचा भाग....तुझी फुले आठवण....१तुझी आठवणकापसाचा तागऊबदार शालीलामऊ मऊ जाग.....तुझी झुले आठवण....२तुझी आठवणदेवापुढचा दिवाअंधार होतो दूरउरतो प्रकाशाचा नाद....तुझी एक आठवण....३

प्रीती.......

कोरड्या उदास मनावर हळूवार फुंकर घालणारातुझ्यासोबत मला कुठेतरी दूर नेऊन हरवून देणारातुझ्या श्वासांचा खोडकरपणा मला रिझवतो आहे...
निराशेच्या काळोख्या रात्रीतूनआशेच्या सोनेरी पहाटेकडे घेऊन जाणारा,जीवनाच्या प्रवासात प्रत्येक पावलावरतू माझ्या सोबत आहेस याची साक्ष पटवून देणारातुझ्या स्पर्शातला प्रेमळपणा मला जगवतो आहे...
माझ्यातल्या 'मी' ला सुखावणारा,प्रेमातल्या तुझ्या समर्पणानेदेहापलीकडच्या पवित्र प्रेमाचा अनुभव देणारातुझ्या मिठीतला उबदारपणा मला फुलवतो आहे...
कधी उगीचच माझ्या ओठांवरहास्याची लकेर उमटविणारातर कधी माझ्याच नकळतमाझ्या डोळ्यांच्या कडा पाणावणारातुझ्या आठवणींचा ओलेपणा मला जळवतो आहे...

ओढ

सरते पुढे, अडते, फिरतेतुज पाहता, पाऊल हेओसंडते डोळ्यातूनीहिंदकळते ह्रदयात जे
मी लाख थांबवी तरीवळते नजर, झुकते नजरअन लाज बोलते मलाभिडवू नको, नजरेस गे....
किती करावी याचनावेड्या मना तुझी रे मीवागू नको, असा.. तसा.. ,आवर मना, आवर हे....
चाहुल ती येता जराअडखळते मीच चालतावर भास हे झुलवी मलासावरशील, सावर रे....
अता छतावरी कितीमी कोरली स्वप्ने नवीअजाणता झाले तुझीतुज आळवी, सत्यात ये....

तुझ्या आठवणी ...

तशा तुझ्या आठवणी बेशिस्तच होत्यातुझ्यासारख्या!बोलावल्याशिवाय,वाटेल तेंव्हा आणिबहुधा उशीराच येणार्‍यामग उशीरापर्यंत रेंगाळणाऱ्या.कुणाहि समोर मला निर्लज्ज बिलगणार्‍या....तशा तुझ्या आठवणी जरा कडवटच होत्यामध्यरात्रीच्या कॉफीच्या चवीसारख्या!(ही कॉफीची सवय तू लावलीस!)आता कॉफीमुळे आठवणी येतात कीआठवणीमुळे कॉफी होतेकोण जाणे!...तशा तुझ्या आठवणी मजेदारच होत्यातुझ्यासारख्या!तू नाही का जाताना उशीखालीएखादं चॉकलेट ठेवून जायचीस.. विसरल्यासारखं दाखवून!(तू वाचतांना पुस्तकात वाचनखूण म्हणूनचॉकलेटच ठेवलेलं असायचं)तुझ्या आठवणी अजूनही जातांनाउशीखाली एखादं स्वप्न ठेवून जातात....आता तुझ्या आठवणी 'समंजस' झाल्यातअनलाईक यू!चार,चार दिवस गायब झाल्यावरआल्या आल्या, न आल्याची कारणं सांगत बसत नाहीत!मुख्य म्हणजे त्यांना हवं तेंव्हा आणता येतंआणि 'थांबा' म्हटल्यावर थांबतात....आठवणी,कॉफी,चॉकलेट अन स्वप्नं..अजून सर्व तसेच आहेत.माझ्याशी एकनिष्ठ!तुझ्या बाबतीत मात्र आताशा तशी खात्री देता येत नाही...

थोडा ओलावा प्रेमाचा

थोड परकेपण आजही असूदे...थोड नाविन्य आजही असूदे.....
थोडा ओलावा प्रेमाचा.....डोळ्यात आजही असूदे.....
असूदे.....हात हातामध्येनजर नजरेला मिळूदे
हळूवार तुझ्या गालाला....मिस्किल खळी पडू दे.....
थोडा ओलावा प्रेमाचा.....डोळ्यात आजही असूदे.....

स्वप्नसुन्दरी

एकदा काय झाले गम्मतच झालीमाझी प्रिया मोती घ्यायला दुकानात गेलीपाहूनी तिच्या गुलाबी गालान्वरची लालीसर्व मोत्ये लाजेने गुलाबी झालीएकदा काय झाले गम्मतच झालीमाझी प्रिया मोती घ्यायला दुकानात गेलीशुभ्र हसू स्फटिकासम उमट्ताच गालीसर्व मोत्ये दीपून परत शुभ्र झाली

का?

आलीस जीवनात मझ्या काही क्षण,मधुनच का निघुन गेलीस?जायचच॑ होत॑ तर मनमन्दीरी माझ्या,तुझी मुर्ती का कोरुन गेलीस?जळत होती ज्योत प्रेमाची ह्रदयात माझ्या,का तु विझवून गेलीस?विरहाच्या अ॑धारात एकट्याला,का तू सोडून गेलीस?
प्रेमच॑ करत नव्हतीअस॑ समजाव॑ तर,जाता-जाता डोळ्यातीलआसवा॑ना का लपवत होतीस?

बायकोवर प्रेम

खरचं सांगतो,मी प्रेम करतो माझ्या बायकोवर.
काय म्हणताय,तिच्या भितीयुक्त आदराने मी म्हणतोय?,ती समोर असल्याने मी असे म्हणतोय?काय म्हणताय,मला खोटं बोलण्याची सवय आहेमी तिच्यापुढे भित्री भागाबाई आहेकाय म्हणताय,वटसावित्रीविरूद्ध नकाराधिकार वापरावा का ?रामदासस्वामींचा मी खरा भक्त आहे का ?अहो, पण मी खरचं सांगतो----मी प्रेम करतो माझ्या बायकोवर.....
.......मनापासून सांगतो..दुसरा काही पर्याय आहे का माझ्यासमोर?

कुंकु

तिने पाहीला, दर्पणी पाहतानातिच्या कुंकुवाचा पसरलेला टिळातिला आकळेना, कधी चंद्र ढळलाअताशा नीटस तर होता कपाळा
आता उलगडले ,मघाचे गुपीतसासू मुक पदरी, हसू ते दाबीतनणंद गेली उगा, टिचकी मारीतकशी मिळवू डोळा, सुटे ना गणितकुंकुमलाली, झाली गाली गोळा
म्हणूनी हरेक नजर प्रश्नासंगेखट्याळ ते पाही, कसे भाळ रंगेखोडी ही कुणाची, कुणाचे हे दंगेअता काय सांगू, कशी कोर भंगेनाही इकडून, बाळाचाच चाळा

एक रात्र....

एक रात्र....एकच चंद्र्...एकच तारा....
एकाच क्षणात एकटवुनी.....आठवणींचा समुद्र सारा....
एकाच सागराचा...एकच किनारा....
वादळ घेऊन मनात्.....आला प्रीतीचा वारा.....
एकच तू.....एकच मी...एकच आपली भेट.....
एकाच भेटीत गमावुनी बसलो....आयुष्यातला आनंद सारा.....
नाहि देणार म्हणतो...आता तुझ्या आठवणींना थारा....
झंकारतील ह्रदयामध्ये नाहितर....पुन्हा दु:खाच्या तारा.....

आकर्षण आणि प्रेम..

आकर्षण आणि प्रेम..यात एक रेघ असते..पुसट की ठळक ...ती आपण मारायची असते..
प्रेमाकडे जाणारा रस्ताआकर्षणाच्या बोगद्यातून जात ही असेल...पण त्या गहि-या मोहजालाततुला तुझा मार्ग खरच का गवसेल??
आकर्षणाला प्रेम समजूनआपण उगीच वाहून जातो..पण. थोड्याच दिवसान्नी कळत...खरतर अस काहीच नव्हत..
म्रुगजळाच्या मागे उगीच धावत असतो..पण तो तर फ़क्त एक आभास असतो

बालहट्ट

फार वर्शापूर्वीचन्द्रासाठी रूसलेल्यारामाची समजूत कौसल्येनेताटात रूपया दाखवूनकाढली होतीपण.................रूपयाही गाठीशी नसलेल्याआजच्याकौसल्येनेभाकरीसाठी रूसलेल्यारामाची समजूतकशी कढावी?????

मी आणि माझी लेक

दिवस ते शाळेबाहेरील झाडाखाली बसलेल्याम्हातारीकडून ५ पैश्यात चिंचाबोरं विकत घेण्याचे;दिवस हे चकचकीत Mall मध्ये जावूनलेकीसाठी कॅडबरी,कुरकुरे विकत घेण्याचे,
दिवस ते बर्फाचे रंगीत-रंगीत थंडगारगोळे कोपरापर्यंत ओघळ येईतोपर्यंत खावयाचे;दिवस हे Dinsaw- Vadilalच्या पार्लरवरलेकीबरोबर जपत जपत कोन खावयाचे ,
दिवस ते वडाच्या पारंब्यावर्,नदीकाठावर,माळावरमोकाट खोंडागत उन्हातान्हात भटकंती करण्याचे;दिवस हे चकचकीत कारमध्ये लावलेल्याA.C. च्या थंडाव्यातून लेकीसह पिकनिकला जाण्याचे,
दिवस ते चंपक-चांदोबातील गोष्टीआठवणीने वाचण्याचे,बालगीते म्हणण्याचे;दिवस हे colourful comics बघण्याचेलेकीबरोबर powerranger,pichacho होण्याचे,
दिवस ते यात्रेतील गुलालात न्हावूनरात्री रस्त्यावरील पडद्यावर सिनेमा पाहण्याचे;दिवस हे मल्टीप्लेक्समधिल स्क्रिनवरलेकीबरोबर शहारुख्,अमीरची movie बघण्याचे,
दिवस ते दोरी लावून काडीपेटीची वाखराब टायरची गाडी करून रस्त्यावर फिरण्याचे;दिवस हे रिमोट कंट्रोलवर चालण्यार्‍यागुळगुळीत,चकचकीत कारबरोबर खेळण्याचे,
दिवस भल्या पहाटेची काकड-आरती,रात्रीची भजन-किर्तन जागून ऐकण्याचे;दिवस हे रेडिओ-मिर्चीवरील नविनtunes लेकीबरोबर enjoy करण्याचे,
दिवस ते दिवाळी-दसर्‍याचा एकच शर्टगादीखाली जपून ठेवून इस्त्री करण्याचे;दिवस हे प्रत्येक महिन्याला लेकीसाठीनव-नविन फॅशनचे ड्रेस आणण्याचे,
दिवस ते वाड्यातील सर्व मुलांनीरात्री अंगतपंगत करून एकत्र जेवण्याचे;दिवस हे फक्त आपल्याच लेकीलाघेऊन बाहेर जावून चायनीज खाण्याचे,
दिवस ते सुर-पारंब्या,लपाछपी,लंगडीवा माळावर खेळ खेळून सुट्टी घालवण्याचे;दिवस हे निरनिराळ्या व्हेकेशनमध्ये छंद वर्गालाघालून लेकीसह games व hobbies जपण्याचे,
दिवस ते वडीलांबरोबर घाबरत घाबरतआदराने दबत दबत संभाषण करण्याचे;दिवस हे मुक्तपणे गात, गप्पा मारतआपल्या लेकीचे friend होण्याचे,
दिवस ते जुने आणि दिवस हे नवे--काळाच्या गतीवर फिरण्याचे;घड्याळ तेच पण जाणवते त्यातीलकाटे बदललेले व गतीमान झाल्याचे!

स्वप्नपरी

घालीत साद फुलवित रातस्वप्नात सखी ती येतेलाजून जरा हासून जरादेहात मिसळुनी जाते
ती स्वप्नपरी तीती धुंद कळी तीती रातराणी ती माझीती मुग्ध बासरीमंद हासरीप्रिया सखी फुलराणी
श्वासात गंध ओठात चंद्रमग रात धुंद ही होतेप्रणयास रंग रेशमी संगमग कळी फुलुनि येतेती स्वप्नपरी ती ---
जागती रात धुंदीत गातकसली पहाट मग होतेजुळवीत सूर नादात चूरस्वप्नात रोज ती येतेती स्वप्नपरी ती

कधी कधी डोळेही बोलतात...

कधी कधी डोळेही बोलतात...
पहा विचारुन मनालाहरवलेल्या प्रत्येक क्षणालासर्व याचीच साक्ष देतातकधी कधी डोळेही बोलतात
सहज रमावे आठवणीतभुतकाळाच्या कुशीतविचारांच्या दिशेने पापण्याच तेव्हा हलतातकधी कधी डोळेही बोलतात
दुखाच्या आठवणीत जेव्हामन होईल खिन्न तेव्हाअलगद डोळ्याच्या कडा पाणावतातकधी कधी डोळेही बोलतात
आनंदात असतानासमोर कोणी नसतानाहर्षाचे भाव डोळ्यातूनच उमलतातकधी कधी डोळेही बोलतात
यांची असते विशिष्ट भाषाशब्दांची त्या न लगे मनिषामात्र मनातले सर्व राज खोलतातकधी कधी डोळेही बोलतात

तु आनी मी

तुझे नि माझे नाते आयुश्यभराचेतुझ्यासाथी आहे सारे,देशील का साथ मला,असेच जुलू दे धागे हे जीवनाचे.