Thursday, February 26, 2009

कुंकु

तिने पाहीला, दर्पणी पाहतानातिच्या कुंकुवाचा पसरलेला टिळातिला आकळेना, कधी चंद्र ढळलाअताशा नीटस तर होता कपाळा
आता उलगडले ,मघाचे गुपीतसासू मुक पदरी, हसू ते दाबीतनणंद गेली उगा, टिचकी मारीतकशी मिळवू डोळा, सुटे ना गणितकुंकुमलाली, झाली गाली गोळा
म्हणूनी हरेक नजर प्रश्नासंगेखट्याळ ते पाही, कसे भाळ रंगेखोडी ही कुणाची, कुणाचे हे दंगेअता काय सांगू, कशी कोर भंगेनाही इकडून, बाळाचाच चाळा

No comments: