Thursday, February 26, 2009

तुझ्या आठवणी ...

तशा तुझ्या आठवणी बेशिस्तच होत्यातुझ्यासारख्या!बोलावल्याशिवाय,वाटेल तेंव्हा आणिबहुधा उशीराच येणार्‍यामग उशीरापर्यंत रेंगाळणाऱ्या.कुणाहि समोर मला निर्लज्ज बिलगणार्‍या....तशा तुझ्या आठवणी जरा कडवटच होत्यामध्यरात्रीच्या कॉफीच्या चवीसारख्या!(ही कॉफीची सवय तू लावलीस!)आता कॉफीमुळे आठवणी येतात कीआठवणीमुळे कॉफी होतेकोण जाणे!...तशा तुझ्या आठवणी मजेदारच होत्यातुझ्यासारख्या!तू नाही का जाताना उशीखालीएखादं चॉकलेट ठेवून जायचीस.. विसरल्यासारखं दाखवून!(तू वाचतांना पुस्तकात वाचनखूण म्हणूनचॉकलेटच ठेवलेलं असायचं)तुझ्या आठवणी अजूनही जातांनाउशीखाली एखादं स्वप्न ठेवून जातात....आता तुझ्या आठवणी 'समंजस' झाल्यातअनलाईक यू!चार,चार दिवस गायब झाल्यावरआल्या आल्या, न आल्याची कारणं सांगत बसत नाहीत!मुख्य म्हणजे त्यांना हवं तेंव्हा आणता येतंआणि 'थांबा' म्हटल्यावर थांबतात....आठवणी,कॉफी,चॉकलेट अन स्वप्नं..अजून सर्व तसेच आहेत.माझ्याशी एकनिष्ठ!तुझ्या बाबतीत मात्र आताशा तशी खात्री देता येत नाही...

No comments: