Wednesday, November 25, 2009

तुझा हात सोडतांन

भावनाना कागदावर उमटवणे भावनाना कागदावर उमटवणे तितकेसे सोपे नसते अश्रुना लपवन्या इतके ते सुद्धा कठिन असते …….. मनातले त्याला कळले असते मनातले त्याला कळले असते तर शब्द जोडावे लागले नसते शब्द जोड़ता जोड़ता जग सोडावे लागले नसते प्रेमाची शाल आंगवर घेऊन प्रेमाची शाल आंगवर घेऊन शरीर माज़े सवस्थ ज़ोपते पण शाली ची उब आसूनही ह्रदय माज़े का धढधढ तय………. माझी कहाणी एकूण माझी कहाणी एकूण आज तो ही रडला लोक मात्र मणाली अरे आज पाउस कसा पडला…………… तुझ्या केसतील फूल तुझ्या केसतील फूल सारखा मुसू मुसू रडत होते, कारण काही झाले तरीही ते तुज्यापेक्षा सुंदर दिसत होते

तुझा मी……

काही दिवसांपुर्वीचे अपरीचीत आपण


लगेच कसे ओलखीचे झालो

वाटसरु आपण वेगळेवेगळे

आता सहजिवनाचे सोबती झालो…



निरगस तुझे बोलके डोळे

वेड मजसी लाउन गेले

भिडता नजर एकमेंकाशी

पापण्यानी स्वत:स जुळवुन दिले…



मनमोकळा तुझा हसरा स्वभाव

जिवास मझ्या खुप भावला

समजणेच न मला आता

मज लळा तुजा कसा लगला ???



देशील न साथ मज मरणोत्तर सुध्धा?

वचन मागतोे मी…

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही


बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही



पहिले जेव्हा तुला फक्त तुलाच बघत राहिलो

फक्त तुलाच पहावे असेच दिनक्रम करत राहिलो

खरच तुझ्या नादाने मी स्वता लाच हरवत राहिलो

काय करू प्रेमाचा ताज महल् ला सजवीताही येत नाही

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही



आज नाहीतर उद्या बोलेन दिवस फक्त जात आहे

कधी येईल ती वेळ त्याचीच वाट पाहत आहे

यशस्वी नक्की होऊ हेच मनाला समजवात आहे

खरच आता तुझ्याशिवाय मला जगताही येत नाही

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही



दिवस रात्र फक्त तुझाच विचार येत च आहे.

माझी पावले तुझ्याच मागे जातच आहे

हृदयात या माझ्या प्रेमाचे झरे वाहातच आहे

काय करू माझी प्रेमाची धार तुझ्या हृदयात वाहताही येत नाही

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही



बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही…….

अगं वेडे…मी तुझ्यावर प्रेम करतो…

ती म्हणाली तू मला इतका कसा ओळखतोस,


कितीदा भेटलास मला की, माझ्या साठीच जगतोस….

आपण एकत्र घालवलेले क्षण किती थोड़े होते,

तरी का रात्रं-दिवस तुला माझीच ‘आठवण’ येते.

नीट पहिलेहि नसशील, तू मला डोळे भरून,

तरी मी छळते तुला का, रोज स्वप्नी येऊन?

हे असं होण शक्य तरी कसं आहे,

नक्की माहित नाही, पण माझीही गत तीच आहे.

अगं वेडे… मी म्हणालो, अगं वेडे मी म्हणालो,

क्षण एकच पुरे होता, जो तुझ्या मुळे मी जगलो.

अन् कुणी सांगितलं क्षण ते दोघांचे थोड़े होते,

तुझ्या आठवणीने दिवस उगवतो, आठवणीनेच रात्र होते.

येता जाता उठता बसता क्षण न क्षण मी तुझाच असतो,

तुझ्या सवे गं सखये मी, नित्य नवा असा जगतो.

तुला दु:ख होतं तिथे अन्, आसवे मी गाळतो,

तुला लगते ठेच तिथे अन् पाय माझा रक्ताळतो.

तुला वाटेल का बरे हा नित्य माझ्यासाठी झुरतो,

मी म्हणेन अगं वेडे, मी तुझ्यावर प्रेम करतो….

Monday, November 23, 2009

मैत्री म्हणजे का य असत?


मैत्री म्हणजे काय असत? एकमेकांचा विश्वास असतो? अतूट बंधन असत? की हसता खेळता सहवास असतो? मैत्री म्हणजे मैत्री असते, व्याख्या नाही तिच्यासाठी; अतूट बंधन नसत, त्या असतात रेशीमगाठी मैत्री असते पहाटेच्या दवासारखी, थंडगार स्पर्श करणारी; मैत्री असते केवड्यासारखी, तना-मनात सुगंध पसरवणारी मैत्री असते सुर्योदयासारखी, मनाला नवचैतन्य देणारी; मैत्री असते झाडासारखी, उन्हात राहून सावली देणारी; मैत्री करावी सोन्यासारखी, तावुन-सुलासुलाखून चमचमणा; मैत्री करावी हिर्या सारखी, पैलू पडताच लख-लखणारी; मैत्री असावी पहाडासारखी, गगनाला भिडणारी; मैत्री असावी समुद्रासारखी, तलाचा थान्ग नसणारी; मैत्री म्हणजे समिधा असते, जीवन यद्न्यात अर्पण झालेली; स्वताच्या असन्याने सुद्धा मन पवित्र करणारी; मैत्री हे नाव दिलय मनाच्या नात्यासाठी; अतूट बंधन नसत त्या असतात … रेशीमगाठी ….

तुझा हात सोडतांना..

तुझा हात सोडतांना..
तुझा हात सोडतांना आभाळ भरलं होतं गेला देहातून प्राण प्रेत माझं उरलं होतं

भावनाना कागदावर उमटवणे
भावनाना कागदावर उमटवणे तितकेसे सोपे नसते अश्रुना लपवन्या इतके ते सुद्धा कठिन असते ……..
मनातले त्याला कळले असते
मनातले त्याला कळले असते तर शब्द जोडावे लागले नसते शब्द जोड़ता जोड़ता जग सोडावे लागले नसते
प्रेमाची शाल आंगवर घेऊन
प्रेमाची शाल आंगवर घेऊन शरीर माज़े सवस्थ ज़ोपते पण शाली ची उब आसूनही ह्रदय माज़े का धढधढ तय……….
माझी कहाणी एकूण
माझी कहाणी एकूण आज तो ही रडला लोक मात्र मणाली अरे आज पाउस कसा पडला……………
तुझ्या केसतील फूल
तुझ्या केसतील फूल सारखा मुसू मुसू रडत होते, कारण काही झाले तरीही ते तुज्यापेक्षा सुंदर दिसत होते,

तुझ्या आठवणीला, तुझ्या आठवणीला…. ………

काय म्हणावं तुझ्या आठवणीला……
चुकवुन पाहवी नजर मी जेव्हा
स्वप्नांची रोज रात्रीच्या प्रहराला
नेमकं तेव्हाच जाग्या होती तुझ्या आठवणी
मनावर माझ्या खड्या पह-याला
आता तुच सांग, काय म्हणावं तुझ्या आठवणीला……
झाडुन काढावं म्हणतो मी जेव्हा
मनातल्या तुझ्या असताव्यस्त प्रेमाच्या ओसरीला
पण, नेमका तेव्हाच उडतो तुझ्या
आठवणीचा बेशिस्त तो सुमार पाला-पाचोळा
आता तुच सांग, काय म्हणावं तुझ्या आठवणीला……
जगुन पहावं म्हणतो मी जेव्हा
दुख:-वेदना अनुभवत प्रत्येक श्वासाला
पण नेमकं तेव्हा तुझ्या आठवणीचा श्वास
त्याआधीच कोंडतो काळजात माझ्या, स्वत:ला
आता तुच सांग, काय म्हणावं तुझ्या आठवणीला…… रडुन काढावी रात्र म्हणतो मी जेव्हा
आठवुन तुझ्या शेवटच्या निरोपाला
अनं, नेमका तेव्हाच उगवतो सुर्य तुझ्या आठवणीचा
सारुन बाजुला त्या भयाण तिमिराला
खरंच गं , काय म्हणांव सांग मी
तुझ्या आठवणीला, तुझ्या आठवणीला…. ……..

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.


मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

घन्टा व्हायची वाट का असेना
मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असुदे… जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्र बस 

श्रावणाची पहीली सर आज पुन्हा दारी आली…….

श्रावणाची पहीली सर आज पुन्हा दारी आली…….
खुप दिवसानंतर आज
मला ती पुन्हा दिसली
जेव्हा श्रावणाची पहीली सर
आज पुन्हा माझ्या दारी बरसली

फ़ेर धरुन ती आज पुन्हा
माझ्या अंगणी नाचली
तिन्ही विश्वाची दौलत
जणु तेव्हा मला
त्या तीन क्षणातच मिळाली
काय सांगु मित्रांनो…………..
ही ना नेहमी अशीच येते
वाट पाहणा-या कोरड्या
पापण्यांवर मग ती गार ओलवा रचते
ओला स्पर्श मी करताच
गुलाबी गाली मोहक लाजते
श्रावणाची ही सर जेव्हा
माझ्या दारी बरसते
आज ती पुन्हा तशीच आली
तिच्या गरम श्वासांच थबकणं,
तिच्या कोमल ओठांच थरथरणं
आज मी भिजल्या नजरेनं पाहील
तिच्या प्रेमाच्या प्रीतील आज मी,
ह्रुदयात जपुन ठेवलं
वाटलं जणु तेव्हा मनाची
हरऎक इछचा पुर्ण झाली
श्रावणाची ही पहीली सर जेव्हा
आज पुन्हा दारी आली …….

अशी आहेस तू…

अशी आहेस तू…
सप्तसुरांची उधळण करीत…
सुरांगणा घेवूनी आली..
चातकासारखी वाट पाहत होतो आम्ही..
अन तु तर एक श्रावणसरी सारखी चिंब बरसली…

हसणं तुझं आहे कीती अवखळ..
गालावर पडते ती त्याचीच सुंदर खळ..
तुझं वागण आहे किती सरळ..
जशी मत्स्यकन्या पाण्यामधे हळुवार तरळ…
नयन तुझे किती आहे प्रेमळ..
एकटक पाहता मग पडते तुझी भुरळ..
अशी आहेस तु जशी तळ्य़ात..
लाटांवर डोलते राजहंसिनी निर्मळ…
तुझ्या मधुर वाणीचे
करावे तितके कौतुक कमीच
हळुवार पुटपुटलीस जरी..
त्याला लाभलीये मधाची गोडी भारी…
मनं तुझं आहे खुप उदार
देतेस आपल्या परीने तु इतरांना आधार…
तुझ्या या चांगुलपणाचा..
होतो सगळीकडे जय जयकार..
गर्वाला तुझ्या दुनियेत ..
काडीमात्र स्थान नाही…
प्रेमाचं रान मात्र
कुठेही रिकामं नाही…
अशी आहेस तु..
सुखाचे करतेस दान भरभरुन
अन दु:खाचे डोंगर मात्र
सहन करतेस स्वत:हून…

अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे

अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे
विझलेल्या दिव्यांना उजळायला हवे
नाही आठवले शब्द तरी गीत गायला हवे
नसेल जरी खुष तरी हसायला हवे
नको समजूस तुझ्याशीवाय सुखी आहे मी
जगासाठी पण खुष दिसायला हवे
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे

पुन्हा घेऊन शपत खोटी
तू भेटीस आली नाहीसच
मजबुरी असेल तुझीही काही
खोटेच मनाला समजवायला हवे
तरफडत असशील तू ही भेटीसाठी
स्वत:लाच बजवायला हवे
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे
तुटलेल्या स्वप्नांना कुरव ळायला हवे
नाही जमत तुझ्याशीवाय तरी जगायला हवे
नसेल जरी सुखी तरी हसायला हवे
नाही भेटलीस सत्यात तु
स्वप्नात तरी तु यायलाच हवे
वाग कशीही तु तरी पण
आपलीच तुला मानायला हवे
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे

आज अस वाटलं की कोणी

आज अस वाटलं की कोणी
जिवनात माझ्या डोकाउन गेलं
आज अस वाटलं की कोणी
मनात माझ्या पाहून गेलं
माझे डोळे बदं होते त्यावेळी
आणि श्वास जणू यांबला होता
मग असं वाटलं की कोणी
ह्दयाचे टोके कोणी मोजून गेलं
आज अस वाटलं की कोणी
जणू केस माझे कुरवाळून गेलं
आज अस वाटलं की कोणी
जणू पदराने मला झाकून गेलं
मला आटवतयं उश्याकडे कागंद
होती आणि हातात पेन होता
आज अस वाटलं की मानेखाली
मग उशी कोणी सरकवुन गेलं
आज अस वाटलं की कोणी
जणू दु:ख माझं जाणून गेलं
आज अस वाटलं की कोणी
जणू डोळे माझे पुसून गेलं
हो ती नक्कीच माझी माय होती
माझी आई आणी कोणी नाही
मग पदराने डोळो पुसले कोणी
आणि देवापुटे हात कोणी जोडून गेलं.

आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कीतीही सुदर मुलगी दीसली
तरी,
तीची स्तुती करुन तीला
हरबरयाच्या झाडावर
चढ्वायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम
करायला अजुन जमलेच नाही
कोणाच्या मागे
शीट्ट्यामारत फीरण
आमच्या तत्वात कधी बसलेच
नाही
म्हणुन आम्हाला प्रेम
करायला अजुन जमलेच नाही कोणी जर आवड्लीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात
करायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम
करायला अजुन जमलेच नाही दुसरयाचे वीचार ऎकत
असतांना
आपले वीचार मांडण्याचि
संधी
आम्हाला कधी साधताच आली
नाही
म्हणुन आम्हाला प्रेम
करायला अजुन जमलेच नाही
कधी हीमत करुन कोणाला जर
वीचारलेच
तर मी तुला त्या
द्रुषटीनीकधी बघीतलेच नाही
या व्यतीरीक्त दुसरे काही
आम्हाला ऎकायलाच मीळाले नाही
म्हणुन आम्हाला प्रेम
करायला अजुन जमलेच नाही प्रेमात नाहीचा अर्थ हो
असतो
हे गणीत आम्हाल कधी समजलेच
ही
म्हणुन आम्हाला प्रेम
करायला अजुन जमलेच नाही फुलपाखरा प्रमाणे आम्ही ही
बरयाच सुदर फुलां मधे
वाव्ररत होतो
पण जाउन बसन्यासारखे फुल
अजुन आम्हाला दीसलेच नाही

एकतरी….

एकतरी ठिकाण असं असावं
जिथं मनातलं सगळं बोलता यावं
एकतरी कलश रिकामा असावा
जिथे सुकलं निर्माल्य वाहता यावं.
कुणीतरी थोडंतरी मोकळं असावं
साचलेलं सगळं ओतता यावं.
सांगता सांगता – ऐकता ऐकता
आभाळ खाली वाकुन वहावं…

होकार्-नकार

डोळ्यात तुझ्या आक्षेप होता
स्पर्शात हळु होकार होता
माझ्यासाठी आतुरलेला
असा तुझा पेहराव होता…
दार लोटताना हलके उघडा
ठेवला तु होता झरोका,
मीही म्हंटले वाट पाहु
मला सजा, तुझा तर खेळ होता…
डोळ्यांनी गातेस काय गुपचुप?
मी भला, देहात लपला बेबंद होता
आज होवो हे असे, ते तसे वा
मनास धरला हट्ट होता…
तो मगाचा आवेग तुझा मग
श्वास चढता आलेख होता,
हरवलो की गवसले? उरला
फक्त तुझा तो ध्यास होता…..

आयुष्य

सुखः दुखः ने विणलेली प्रत्येकाची एक कहाणी असते.
कधी गोड तर कधी कडू आठवणींची शिदोरी असते.
सुखः हसण्याच्या रुपात तर दुखः अश्रूंच्या रुपात वाहते.
पहिल्यांदा केलेल्या गोष्टींचे स्पुरण असते.
 दुसर्यांचे पाहून केलेले अनुकरण असते.
 आठवण्यासारखे बरेच असते आणि विसरण्यासारखे काहीच नसते.
आयुष्याच्या लघुपटावर आपणच जिंकलेलो असतो.
कारण छान जगण्या  इतपत तरी आपण  शिकलेलो असतो. 

*कुणीतरी हव असत……*

*कुणीतरी हव असत……*
*कुणीतरी हव असत…… कुणीतरी हव असत ,जीवनात साथ देनार हातात हात घेउन , शब्दान्शिवाय बोलनार्….

कुणीतरी हव असत ,जीवाला जीव देनार फ़ुलातल्या सुगन्धासारख,आयुष्यभर जपनार्……
कुणीतरी हव असत ,हक्कान् रागावनार, चुका ज़ाल्या तरी,मायेन समज़ावनार……..
कुणीतरी हव असत ,आपल म्हननार नजरेतले भाव जानुन,आपल्याला ओळखणार……..
कुणीतरी हव असत ,बरोबर चालणार, कशीही वाट असली तरी,माग न फ़िरनार……..
कुणीतरी हव असत ,वास्तवाच भान देणार, कल्पनेच्या विश्वातही,माझ्यासवे रमणार……
कुणीतरी हव असत,मनापासुन धीर देणार, स्वतहाच्या दुखातही,मला सामाउन घेणार………
कुणीतरी हव असत,एकान्तातही रेन्गाळनार, माझ्यासोबत नसतानाही,मझ्यासोबतच असनार….
कुणीतरी हव असत,विश्वास ठेवणार, माझ्या विश्वासाला.कधीही न फ़सवणार…..

Wednesday, November 18, 2009

तुझ्या सहवासाची जोड

माझ्या एका स्वप्नाला जपण्यासाठी
तुझ्या सहवासाची जोड हवी
मनातील भावना सावरण्यासाठी
तुझी ती प्रेमळ साथ हवी

पण.............

तुझा अखेरचा निरोप घेताना
मनात जागी होते खंत नवी

तुझ्या सहवासात घालवलेल्या क्षणांना
मी कधीच विसरू शकत नाही....

म्हणूनच...........

माझ्या त्या स्वप्नाला जपण्यासाठी
तुझ्या सहवासाची जोड हवी......

तू नाहीस याची जाणीव.............

हे मन आज एकांतात
उगीचच रडत आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.

कधी- कधी ....
तूझं ते माझ्यावर रागावणं,
आणि मी रागावले तर झटक्यात मला मनवणं,
ती एक-एक आठवण, मनाला आज सलत आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.

कधी-कधी ....
तूझं ते मला भेटण्यासाठी बोलावणं,
आणि मी "नाही" म्हणताच, अल्लडपणे हट्ट धरणं,
तूजा तो हट्ट आजही माझ्या स्मरणात आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.

तू दिलेलं गुलाबाचं फुल

तू दिलेलं गुलाबाचं फुल

आजही जिवंत आहे माझ्याकडे
जगत तर आहे ते पण...........
विस्कटलेल्या पाकळ्यांच्या सहवासात.
जशी मी जगत आहे आज तुझ्या आठवणीच्या सहवासात

तू दिलेलं गुलाबाचं फुल
आजही तसच आहे ते
माझ्या डायरीच्या पानांमध्ये
रंग तोच पण फक्त उडालेला आहे.
जश्या आज तुझ्या मनात माझ्यासाठी असणार्या भावना....


तू दिलेलं गुलाबाचं फुल
आजही जिवंत आहे ते
पण फक्त मलूलपने जगत आहे
जशी मी..........

दोन शब्दात बोललीस तु

दोन शब्दात बोललीस तु
सार काही संपल
कसे समजावू तुझ्या त्या शब्दाने
जगच माझे लुटल
रचत बसलो स्वप्न
स्वताला फसवत फसवत
कसे समजावू मनाला
स्वप्न आता ते तुटल
दोन शब्दात बोललीस तु
सार काही संपल
टव टवित प्रीत फुल माझे
क्षनामध्ये आचानक सुकल
जगविल होत ज्याला मी
आयुष्याची किंमत मोजुन
त्यानेच सांगितले आज
आसतित्व माझे मिटल
दोन शब्दात बोललीस तु
सार काही संपल
नाही दोष तुला देणार
तुझे तर सारेच मी मानल
तुझा प्रत्येक आश्रू पुसन्यासाठी
रक्त ही माझे सांडल
कसे सांगू हे बोलण्या पेक्ष्या
तु प्राणच का नाही घेतल ?
दोन शब्दात बोललीस तु
सार काही संपल
कसे समजावू तुझ्या त्या शब्दाने
जगच माझे लुटल

गरज आहे आज मला.........

गरज आहे आज मला.........
त्या तुझ्या आधाराची
अडखळनारे पाऊल माझे
सावरणाऱ्या तुझ्या हातांची

गरज आहे आज मला...........
त्या  तूझ्या मोहक मिठीची
दडपण असता या मनी
तुझ्यात स्वतःला सामावून टाकणाऱ्या त्या बाहूंची

गरज आहे आज मला..............
 त्या तुझ्या कोमल प्रीतीची
भय दाटताच या मनी
आपलेपणा देणाऱ्या त्या तुझ्या स्पर्शाची

गरज आहे आजहि  मला..........
माझ्यावरच्या त्या तूझ्या निस्वार्थी प्रेमाची
सारे जग असुरक्षित वाटताच
तू जवळ आहेस या  जाणिवेची

गरज आहे मला
खूप गरज आहे............. तुझी...........

काय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस..

चांदणं माळून स्वप्नांना लेऊन
शब्द फुलांचा सुगंध घेऊन तू येतेस
आनंदाची पखरण जेव्हा तू करीत जातेस
काय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस..

अंबराची शाल निळी अंगावर ओढून
निळाईच्या रंगाने तू अशी बरसतेस
श्रावणाच्या उन्हात, इंद्रधनुष्य फुलवतेस
काय सांगू तेव्हा, तू कित्ती गूढ दिसतेस

निराश मनाला, पुन्हा उभारी,
हळुवार साद, शब्दात तुझ्या, अलवार तू घालतेस
बेभान भरारी, माझ्या स्वप्नांना, पंख तुझे तू देतेस
काय सांगू तेव्हा, तू निळाईच असतेस !!!

कुणीतरी असावे

कुणीतरी असावे
गालातल्या गालात हसणारं,
भरलेच जर डोळे कधी तर ओल्या असवांना पुसणारं,

कुणीतरी असावे
पैलतीरी साद घालणारं,
शब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देणारं,

कुणीतरी असावे,
चांदण्यांच्या बरोबर नेणारं,
अंधारलेल्या वाटेत आपल्याबरोबर येणारं,

कुणीतरी असावे,
फ़ुलांसारख फ़ुलणारं,
फ़ुलता फ़ुलता सुगंध दरवळणारं,

कुणीतरी असावे
आपल्या मनात रमणारं,
पलिकडील किना-यावरून आपली वाट पाहणार

-- तो क्षण

-- तो क्षण

आयुष्यातला तो क्षण किती छान असतो,
माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो.

स्वप्नांचा झुला मनात नेहमीच झुलत असतो,
माझ्या समवेत असताना तो नेहमीच बेभान असतो.

दोघांचे हि श्वास मग स्थिरावलेले असतात,
त्याच्या बाहुपाशात हात माझे जखडलेले असतात.

दोघांच्याही मनात शब्दांचे वादळ माजलेले असते,
पण ओठांपर्यंत यायला त्या शब्दांचेच धाडस नसते.

हळुवार पणे मग मने आमची बोलत असतात,
आयुष्यातल्या त्या सुंदर क्षणांचा मनमुराद आनंद लुटत असतात.

माझ्यासाठी हे करशील ना?

माझ्यासाठी हे करशील ना?

भिजू नयेस म्हणून मी तुझ्यासाठी छत्री आणेन,

पण भिजण्याची गळ तू घालशील ना?

तुझ्याबरोबर मीही घाम गाळेन

पण एखादा थेंब टिपशील ना?

असाच खेचत राहिलास तर मी गुंतत जाईन

पण झालेला गुंता सोडवशील ना?

खांद्यावर डोके ठेवून अश्रू गाळेन

तेव्हा ओठांनी टिपून घेशील ना?

तु असताना तुझाशी

तु असताना तुझाशी
तु असताना तुझाशी,
खुप खुप बोलायचं ठरवतो,
मुक्या भावनांना,
शब्दात बसवायचं ठरवतो,
चार ओळी जोडुन
कवीता करायची ठरवतो,
पण तु आलीस की,
शब्द अबोल होतात,
मन मात्र बोलयला लागत
तु नसताना मात्र
मुक्या भावनांनचे शब्द होतात,
आपसुक चार ओळींची कविता होते,
एक गोष्ट मात्र नक्की
तुझ्या असण्यापेक्शा तुझ्या,
नसण्यातच मी जास्त जगतो

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे........


एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण थकल्यावरही आधारसाठी त्याच्याकडेच पहावे........


एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे.........


एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच राहावे, जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे.......


एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे...........


एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
सूर त्याचा आणि शब्द माझे असावे
_____________________________

विचार करत होतो मी

विचार करत होतो मी
कोण माझा विचार करतय का?
विचार करुन सांग मला
तु माझा विचार करतेस का?
जर करत् असशील विचार् माझा
तर पुढे काय विचार तुझा?
जर करत नसशील विचार् माझा
तर का करत नाहीस विचार माझा?
मी तुझा विचार करत असताना
तु माझ्याबद्द्ल अविचारी का?
हा प्रश्न मी तुला विचारलाच् का?
ह्याचा विचार तु कधी केलास का?
विचार करुन विचारतो तुला
जर् पटला माझा विचार तुला
तर कळव तुझा विचार मला

कधी कधी वाटते,

कधी कधी वाटते,

एका अशा ठिकाणी जावे,
"तो आणि मी"
सोबत दुसरे कुणीही नसावे,

वळण-वळणाची ती वाट असावी
हिरव्या-गर्द झाडांनी जी डुंबून जावी,
लाल मातीचा गंध असावा,
धुंद गंधाने त्याच्या
हवेत गारवा घुमावा,

हवेच्या नाजूक झुळकीने
मनाला माझ्या भेदून जावे,
स्पर्शाने तिच्या मग
हे देह अगदी रोमांचित व्हावे,
धुंद अशा त्या क्षणी
भाव-भावनांचे काहूर माजावे,
आणि मधुर मिठीत त्याच्या
माझे सर्व विश्व एकरूप व्हावे,

सांगायचे आहे तुला......

सांगायचे आहे तुला ,

सुमनांचा पाऊस पडतो माझ्यावर,
तूझा केवळ चुकून स्पर्श झाला कि..

शमून जाते तहान कानांची,
तू एक जरी शब्द बोललास कि..

पूर्ण दिवस हसरा जातो माझा,
तू स्मित हसलास कि..

डोळे सुखावतात माझे,
तू फ़क़्त पाठमोरा दिसलास कि..

आता तू फ़क़्त कल्पना कर....,

                काय अवस्था होत असेल माझी
            तू दूर किंवा अदृश्य असलास कि.....

सांजवेळ

दिवस चिंब भिजला
वळचणीला बसला
काळोखाच्या पदरात
उजेडही लपला

पाखरांचे पंख भिजले
वाऱ्याने जरा थरथरले
आडोश्या कोपऱ्यात
दोन जीव ओले
 
किर्रर्र रातकिड्यांची
टपटप पागोळयाची 
भरल्या नभात
कडकड विजेची

संध्या छाया  मंद
रातराणीचा धुंद गंध
लपलेला ढगात
चवथीचा चांद

मी शांत तुही गप्प
वाफाळता कॉफ़िचा कप
सांजेच्या डोळ्यात
अनिवार झोप 

डोळ्यांची गर्द निळाई
पाठीवरला तीळ मृण्मयी
मखमली झोपेत
पावसाची अंगाई

तू

तू

कोडयात टाकतं खरंतर मला
कधी कधी तुझं वागणं,
कधी प्रेम, कधी अबोला
कधी नूसतचं एकटक पाहणं.

कधी असतोस पावसांच्या सरी
मनाला हळुवार स्पर्शून जाणा-या,
कधी होतोस इंद्रधनुष्य
आयुष्याचे विविध रंग दाखविणारा.

कधी येऊन भुंग्याप्रमाणे
माझे सर्वस्वच लुटतोस,
कधी नाजुक फुलांप्रमाणे
मला अलगद जपतोस.

कधी बनून विशाल व्रुक्ष
मायेची सावली देतोस,
रागावल्यावर जणू काही
तप्त वाळवंटच भासतोस.

खंर सांगु का, तु मला
केव्हा जास्त आवडतोस,
मी काही न बोलताही
मनातील सर्वच जाणतोस.

"ENGAGE"

एकदा "BEST" मध्ये प्रवास करतांना
एक सुंदर गोड अप्सरा मला दिसली
CONDUCTOR च्या सीट वर ती
कोप-यात एकटीच होती बसली

मोकळी जागा पाहुन मी
माझी "तशरिफ" तेथेच ठेवली
मला पाहताक्षणीच तिने
आपली पर्सच उचलुन ठेवली

उघडया खिडकितुन वारा
तसा फ़ारच जोरात येत होता
तिच्या ओढनीला माझ्या चेह-यावर
हळुवार उडवीत होता

ती मात्र ओढनी सावरत सावरत
स्वत:शीच गुनगुनत होती
नकळत दोघातील अंतर कमी करन्यासाठी
मला हाथभार लावत होती

तेवढ्यात बसच्या धक्क्याने
आमच्या दोघांतील अंतर कमी केले
एका मिनीटासाठी का होईना
मला स्वप्नाच्या दुणियेत नेले

येवढ्यात CONDUCTOR माझ्याजवळ आला
लेडिज सीट सांगुन मला उठवुन गेला
तेव्हा त्या मेल्याचा राग भलताच आला
स्वप्नाचा माझ्या त्याने चुराडाच केला

मग पुढच्या STOP वर उतरन्यासाठी
ती तीची PURSE सावरायला लागली
गर्दित मला खेटत खेटत
स्वत:ची वाट काढु लागली

खाली उतरताच माझी नजर
एकटक तिला शोधु लागली
ती मात्र BOYFRIEND च्या गाडीवर बसुन
केव्हाचीच हवेशी बोलु लागली

आमच्या महालात रानीची जागा
नेहमी अशीच खाली असते
आम्हाला आवडलेली रानी
जेव्हा तेव्हा "ENGAGE"च असते

तुझा सहवास

तुझा सहवास

तुझ्या सहवासातील ते दिवस,
अजूनही मला आठवतात
कधी हसत, कधी रुसत,
जाणून बुझून तुझी आठवण करून देतात.

तुझेच विचार मनात घेऊन
जगत असते नव्या आशेने
सहवासातील ते क्षण टिपते मी स्वप्नाने

त्या स्वप्नाला जपण्यासाठीच
मला तुझा आधार हवा
म्हणूनच,.............
आयुष्यभरासाठी मला तुझा सहवास हवा.......

तू अनोळखी, तरी ओळखीची..

तू अनोळखी, तरी ओळखीची..
असुनी दूर, का जवळची....

पाहिले न तुजला कधी
माझी परी तू सावली..
शोधितो मीच मजला
का देहात अशी सामावाली..

बोलणे लटके तुझे
का, कसे हटके असे
मोकळा होवुनी गुंततो मी
का, मन झाले वेडेपिसे...

सांग ना ग कोण तू
बहरले का ऋतू
गंध तू कुसुमातला
का कस्तुरी सुवास तू..

डोळ्यांतली आस तू
का खुळी प्रीत तू..
अनोळखी, का ओळखीची
गूढ सखे हे खोल तू....

होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची

होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची
होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची
फोनवर माझ्याशी तासंतास बोलत बसायची
माझे PJ सुध्हा ती हसत हसत ऐकायची
तिच्या मनातल सगळच मला सांगायची
सुखांमध्ये मला नेहमीच तिची साथ होती
दुःखांमध्ये मला सावरनारा हात होती
माझ्या सोबत हसायची माझ्या सोबत रडायची
अशी होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची

एक दिवशी अचानक तिने मला भेटायला बोलवल
तिच्या आवाजात थोडस दडपण मला जाणवल
"लग्न ठरलय रे माझ" तिने भेटल्यावर सांगितल
"लग्नाला नक्की ये" अस आहेर माझ्याकडे मागितल
पायाखाली माझ्या जमीन राहिली न्हवती ते ऐकून
थोडावेळ स्तब्ध राहिलो आणि अश्रु टाकले मी पिउन
बिखरलेल्या ह्रुदयाच मात्र कमी होत न्हवत कंपन
खोट हास्य आणून चेहरयावर कसबस केल तिला अभिनंदन

ती गेल्यावर चुक माझी मला उलगडली होती
मीच मैत्रीची पायरी न कळत ओलांडली होती
प्रेम होत माझ तिच्यावर पण तिच्या मनातल माहित न्हवत
म्हणुन प्रेमासाठी मैत्रीचा बळी देन मनाला कधीच पटत न्हवत
नक्की मोठी चुक कोणती? तिच्यावर प्रेम करण की प्रेम व्यक्त न करण
हे माझ्या जीवनातल न उलगड़लेल कोड होत
माझ्या चुकीचे प्रायच्छित बहुदा फ़क्त तिच्या दूर गेल्याने झाल न्हवत
म्हणुनच बहुतेक ते कोड सोडवायला तीच मला पुन्हा एकदा भेटण ठरल होत

ती समोर आली पण सुरवात कुठून करायची तेच ती विसरली
तेव्हा आम्हा दोघांमध्ये जणू बोचरया शांततेची लाटच पसरली
एकमेकांबरोबरच्या प्रवासाचा FLASHBACK डोळ्यांसमोर आला होता
आणि अश्रूंचा उद्र्येक दोघांनीही कसाबसा रोखला होता
"सगळ सांगितल रे मनातल तुला, पण एकच गोष्ट सांगायची राहिली"
"खुप प्रेम केल रे तुझ्यावर आणि तुझ्या विचारण्याची नेहमीच वाट पहिली"
न राहवून तिने तिच्या ह्रुदयाच अस मौन तोडल
आणि न कळतच तिने माझ ह्रदय पुन्हा एकदा मोडल


--
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......

Tuesday, November 17, 2009

काही माणसे……..


*काही माणसे….. *
*काही माणसे असतात खास जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात, दुःख आले जिवनात तरीही कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र म्रुगजळाप्रमाणे भासतात, जेवढे जवळ जावे त्यांच्या तेवढेच लांब पळत जातात.
काही माणसे ही गजबजलेल्या शहरासारखी असतात, गरज काही पडली तरच आपला विचार करतात, बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.
मात्र काही माणसं ही पिंपळाच्या पानासारखी असतात, जाळी झाली त्यांची तरी मनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात * **

या वाटेवर न गेलेल ेच बरे………..

प्रियकराची हजार लफडी प्रेयसीचे हजार नखरे म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे.

तो म्हणतो मी चुकलोच नाही ती म्हणते फक्त माझेच खरे. प्रेमाचे दिवस संपले की वाहतात संशयाचे वारे..!! म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे…
त्याला भेटायाची वेळ ती मुद्दाम विसरते. त्याला काही केल्या तिचा जन्मदिन न स्मरे..!! म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे…
लग्न झाले की ओढ सरते, सुकतात सारे प्रेमाचे झरे. महिन्याचा खर्च भागवताना डोळ्यांसमोर दिसतात तारे..!! म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे…
ओफिसमध्ये साहेबाची कटकट, घरात बायको आणि पोरे. पाहुणे येऊन त्रास देती तशात ही महागाई मारे..!! म्हणून म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे…
एकटेपणा जरी वाटला बरा, संध्या छाया भिववती मना. ते सूरकुतलेले मावळतीचे दिवस सांगा घालवावे कोणाच्या आधारे? तरीही म्हणतो ऐका माझे या वाटेवर न गेलेलेच बरे…

काहीच घडले नाही ……… ….


काहीच घडले नाही आज तरी डोळे भरूण आले जुने काही परत येऊन पुन्हा छळून गेले विसरलो म्हणता म्हणता काही तरी आठवून आले जळालेले हृदय आग आश्रूमधे बुडून गेले का घडावे असे ? का तिने वागावे असे प्रश्ना मधे या मन खरेच गडबडून गेले काहीच घडले नाही आज तरी डोळे भरूण आले जुने काही परत येऊन पुन्हा छळून गेले संपलेले सारे पुन्हा पुन्हा उगलते मन पुढे जायचे तरौन ही मगेच भरकतटे मन नाही उत्तरे त्या साठीच तर फडते मन तिची बाजू ही न समजता जळत राहते मन कसे समजाउ त्याला ते सारे आता सारून गेले काहीच घडले नाही आज तरी डोळे भरूण

न बोलता बोललेले शब्द

हे फक्त माझ्याचसोबत नेहमी असंच घडणार आहे? तुझ्याबरोबरची प्रत्येक भेट ‘ते’ न बोलताच संपणार आहे?

भेट-वेळ रोजची ठरलेलीच तरी अजून काय ठरणार आहे? बोलायचं पटकन पण वेडं मन त्याचाही मुहुर्त पाहणार आहे !
भेटतो तेव्हाच माहित असतं निघायची वेळ येणार आहे पटकन विचारावा प्रश्न हवासा तर शब्द ओठीच अडणार आहे !
मी न विचारताच तू काय हवं ते उत्तर देणार आहे? हे पुरतं कळतंय तरीही तोंड माझं का बोलणार आहे?
न बोलता बोललेले शब्द तुला वेड्याला कळणार आहे? मी बोलले/न बोलले तरी गप्पच नेहमीसारखा तू राहणार आहे !
भावभावना समजून घेणं सगळंसगळं थांबणार आहे उष्ट्या कुल्फीची चव मात्र जिभेवरती रेंगाळणार आहे
स्वप्न माझं हे संपलं तरीही मनात तूच उरणार आहे तुझ्यात मी नसले तरी माझ्यात तूच सापडणार आहे !

मी तिला विचारलं -मंगेश पाडगांवकर

मी तिला विचारलं -मंगेश पाडगांवकर


मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….
तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घाडलं?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं……..
तुमचं लग्न ठरवुन झालं?
कोवळेपण हरवुन झालं?
देणार काय? घेणार काय?
हुंडा किती,बिंडा किती?
याचा मान,त्याचा पान
सगळा मामला रोख होता,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं…
ते सगळं जाउ द्या, मला माझं गाणं गाउ द्या..
मी तिला विचारल,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….
त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….
मग एक दिवस,
चंद्र, सुर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणाऱ्या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधिच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरिसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे
मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येउन बसलं
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं……
पुढे मग तिच्याशिच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली…
तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

 आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
एकामेकांना भॆट्ण्य़ाची दोघानाही आस आहे
आपल्या मैत्रीमध्ये हीच एक गोष्ट फ़क्त खास आहे
इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

अस कस रे हे नातं…..तुझ आणी माझ

ना पाहिलं ना भेटलं

फ़क्त शब्दांत अनुभवलं
कधी साथ देत तर कधी
कोवळ्या वादात गुंतलेलं

मी ऎकलेय भाव तुझे
तुझे शब्द माझ्याशी बोलतात
हसत, खेळत, बागडत
कागदावर असेच उतरतात

तु गातोस शब्द माझे
ते ओठांत तुझ्या फ़ुलतात
सहज, सुंदर, सुमधुर
मनात येवुन गुणगुणतात

तु कधी असा तर कधी कसा
रंग बदलणारा बहुरुपिया जसा
मनाच्या खोलीत खोल शिरत
गोल फ़िरणारा भोवरा जसा

तुझे बदलणारे रंग
माझ्यात रंग भरतात
भोवर्‍यात गोल फ़िरत
माझे श्वास गुंतवतात

तुझे असणारे आभास
माझ्यात जिव ओततात
एकटेपणात अलगद येवुन
सोबतीची चाहुल देतात

माझ्या मनात मी
तुला असच कोरलय
प्रत्यक्ष न भेटता
माझ्यातुनच तुला चोरलय

अस कस रे हे नातं…..तुझ आणी माझ