Thursday, August 14, 2008

आज मला तुझ्याशी खूप खूप बोलायचंय

आज मला तुझ्याशी खूप खूप बोलायचंयस्वप्न माझ्या डोळ्यांचं तुझ्या डोळ्यांना सांगायचंयतुझं वळण आयुष्याला अगदी अलगद आलंएका क्षणात सारं माझं जीवन बदलून गेलंत्या साऱ्या क्षणांना फुलांसारखं जपायचंयआज मला तुझ्याशी खूप खूप बोलायचंयशब्द शब्द साठवून साऱ्या भावनांना बद्ध केलंतुझ्या ओठावरती त्याच सुरेल गीत झालंतुझ्या सुरात जीवनाचं गाणं मला गायचंयआज मला तुझ्याशी खूप खूप बोलायचंयझुकलेले डोळे तुझे मिलनाला आतूर झालेतक्षितिजाचे रंग तुझ्या गालांना फितूर झालेततुझ्या साऱ्या रंगात आज मला रंगायचंयआज मला तुझ्याशी खूप खूप बोलायचंयमाझ्या सप्तसुरांना आज तुझी साथ हवीयसमेवरती आज मला फक्त तुझी दाद हवीयतुझ्या सरगमी श्वासांना आज मला छेडायचंयआज मला तुझ्याशी खूप खूप बोलायचंय

No comments: