Thursday, August 14, 2008

रात्र.

रात्र.
रात्र.
दिवस मावळताना आठवणींचा रंग अजूनंच गडंद होऊ लागतो.
काळोखाशी स्पर्धा करता करता आपसूक तो काळोखातंच मिसळू लागतो.
मीच निवडलेला भयाण असा एकांत मलाच गिळायला पुढे आता सरसावतो.
जीवाच्या आकांताने मग मी ऊजेडाकडे धावतो.
ईथे सुरु होतो आठवणींचा नि माझा पाठशिवणीचा खेळ.
सुखंद आठवणींचा कधीच बसत नाहि आता माझ्याशी मेळ.
कितीहि धावलं तरी ऊजेड काहि दिसत नाही.
पौर्णिमेच्या रात्रीही आता आकशात चंद्र माझ्यासाठी असत नाही.
रातकिड्यांच्या आवाजांत एकट्यानं जागणं आता अंगवळणी पडलंय.
तुझ्या जाण्यानं सगळं कसं हे अगदि विपरीतंच घडलंय.
सकाळ होता होता कधी तरी चुकून डोळा लागतो.
तुझ्या आठवणींपासून दूर धावता धावता तुझ्या आठवणीतंच मी रात्रभर जागतो, रात्रभर जागतो........

No comments: