आठवणींनी व्याकूळ मन
तुझ्या मिठीत सुखावले
कसे सांगू किती सुख
या विरहानंतर मिळाले
विरहानंतरच्या सुखाचे
काय करू वर्णन
नजर मिळता नजरेला
धडधडू लागले मन
लटका राग लटके भांडण
सर्व काही गेले विसरून
स्पर्श तुझा होताच
झली मने एकरूप
डोळ्यांत डोळे हातात हात
काय वर्णू ती सायंकाळ
समुद्रांच्या लाटांसवे
पुढे सरू लागला काळ
अचानक भानावर आले
पाहिले, निघण्याची वेळ झाली
आता येतील विरहाचे क्षण
याची प्रकर्षाने जाणीव झाली
दाटून कंठ आला
डोळे भरून आले
प्रियकरा,तुझा निरोप घेताना
मनास फार दुःख झाले
पण विरहाचे ते क्षण
खूप महत्त्वाचे असतात
पुन्हा भेटण्याच्या आशेने
आयुष्याला नवा अर्थ देतात.....
जे घडेल ते सहन करायचे असतं..
14 years ago

No comments:
Post a Comment