Wednesday, August 13, 2008

शब्दांपलीकडची भाषा आपण विसरून चाललो

माणसे नुसत्या स्मिताने बोलतात. डोळ्यांनी बोलतात्. स्पर्शाने बोलतात्,झाडांवर नुकते उमललेले फूल आपल्या रंगगंधाच्या भाषेत आपल्याशी बोलत असते. शेपूट हलवणारा कुत्रा आपल्याला ओळख देत असतो. पाळण्यातले तान्हुले जेव्हा कुणाला बघून हात पाय आनंदाने नाचवते,तेव्हा तेही त्याच्या भाषेत समोरच्या माणसाशी बोलतच असते.झादांची सळसळती पालवी, आभाळात भरून आलेले ढग, वार्याची हळुवार झुळूक या सर्वांची एक भाषा असते. ती शब्दहीन असते, पण फार बोलकी, फार अर्थपूर्ण असते. सतत ठणठणाट करणार्या कर्कश शब्दांच्या कोलाहलात ही शब्दांपलीकडची भाषा आपण विसरून चाललो

No comments: