Wednesday, August 13, 2008

सहवास…सारा सुखाचा हव्यास


सहवास…सारा सुखाचा हव्यास
सहवास…सारा सुखाचा हव्यास
सहवास अडकवतो
एकान्त छळतो,
सॆरभॆर आयुष्य
कशासाठि कळेना………
विश्वासातून नाईलाज, कि
नाईलाजाने विश्वास?
आवासलेले प्रश्न...
उत्तर मात्र मिळेना…
गूंतलेल्या भावना, का
भावनांचाच गुंता
सा-या विवस्त्र चिंता
सरणंहि जळेना……
खरतरं……….
सहवासातून आयुष्य
आणि आयुष्यासाठि सहवास…
सारा सुखाचा हव्यास
सुटता कुणा सुटेना………
बापुना डोयातुन माये पावसानी वाट
तान-भुक हरपुन बापु ढगाले पहात
वावरात पेरलेल माये जवाराच पीक
आसु बापुना डोयाले मना जीव कासावीस
माये इठ्ठल ग तुना कसा पावता पाईना
काया रंगबी ढगाले कसा चढता चढीना ?
निस्ता पिवळट झाला वावराचा कवडसा
हिरवट रंग कसा माये दिसता दिसेना ?
आज घाम लई येतो वर चिन्ह पावसानी
वारा गातु कशी ओवी, माये तुझ्याच मुखानी
पहिलाच थेंब माये गेला बापुच्या वठाशी
बापु पितुया पावुस जणु चातक उपाशी
आज नाचु दे गा माये, वावराच्या चिखुलात
वावरातुन व्हातया काया पाण्याच अत्तरकाल
इचारला व्हता माये प्रश्न इठ्ठलाला
आज पावुस धाडुन त्यानी दिलया उत्तर
{ डोयातुन - डोळ्यांतुन, तुना - तुझा, काया - काळ्या }

No comments: