Saturday, August 23, 2008

हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो... -मंगेश पाडगांवकर

हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...आपलं जे असतं;ते आपलं असतंआपलं जे नसतं;ते आपलं नसतंहसतं डोळे पुसुन आतुन फळासारखं पीकलोहे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...आलेला मोहोर;कधी जळुन जातोफुलांचा बहर;कधी गळुन जातोपुन्हा प्रवास सुरु केला, जरी चालुन थकलोहे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...कधी आपलं गाव;आपलं नसतंकधी आपलं नाव;आपलं नसतंअश्या परक्या देशात वाट नाही चुकलोहे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...पींजऱ्यात कोंडुन;पाखरं आपली होत नाहीतहात बांधुन;हात गुंफले जात नाहीतहे मला कळलं तेंव्हा हरुन सुध्दा जींकलोहे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...झाड मुकं दीसलं तरी;गात असतंन दीसणाऱ्या पावसात;मन न्हात असतंकळोखावरं चांदण्याची वेल होऊन झुकलोहे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...

No comments: