Saturday, August 23, 2008

शुक्रतारा मंद वारा -- मंगेश पाडगावकर

शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनीचंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातूनीआज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहातू अशी जवळी रहा ॥ १ ॥मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला?तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुलाअंतरीचा गंध माझा आज तू पवन वाहातू असा जवळी रहा ॥ २ ॥लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जिवाअंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवाभारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हातू अशी जवळी रहा ॥ ३ ॥शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणीदाटूनी आलास तू रे आज माझ्या लोचनीवाकला फ़ांदीपरी आता फुलांनी जीव हातू असा जवळी रहा ॥ ४ ॥

No comments: