Tuesday, August 19, 2008

बायकोत काय नसतं ते अशा मैत्रीणीत असतं ?

बायकोत काय नसतं ते अशा मैत्रीणीत असतं ?ह्यासारख्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची?माझ्या मते अशी मैत्रीण जी हवीशी वाटते, ती बायकोच्याऐवजी हावी असते।हा समज चुकीचा आहे.तिला बायकोने सुध्दा स्वीकारावं ही गरज असते.तसं झालं नाही की होणा-या यातना फक्त मैत्रीणीला समजतात.बायकोला समजत नाहीत.नि:स्वार्थी मैत्रीण मित्राचा संसार उधळला जावा,पण आपली मैत्री टिकावी अशी कधीच अपेक्षा करीत नाही.पण ही धडपडही बायकोपर्यंत पोहोचत नाही.मैत्रीण मित्राच्या पत्नीची मर्जी आणि प्रतिष्ठा संभाळते,पण तो समंजसपणा पत्नी दाखवत नाही.बायकोचे मन धाब्यावर बसवून मैत्री जपणारे महाभाग किती टक्के असतात आणि किती टक्के स्त्री पुरुष, त्याच्या व तिच्या मैत्रीला तिलांजली देतात, ह्या टक्केवारीत जाण्यात अर्थ नाही.समजूतदारपणाच्या बाबतीत संसारातल्या साथीदारापेक्षा मैत्रीतला जोडीदार वरचढ ठरला ह्याचा आनंदही चिरकाल उरत नाही, कारण समजूतदार घटकालाच अन्याय सहन करावा लागला हे शल्य पुसता येत नाही.

No comments: