Tuesday, August 19, 2008

फुलावं कसं आणि भुलावं कसं

फुलावं कसं आणि भुलावं कसं'मी तुझ्याकडे आत्ता सरळ सरळ बघतोय. बाकीचेही बघताहेत. तुला पुरुषांच्या नजरेची, बघण्याची चीड़ नाही का येत?' 'का यावी? मी स्विमिंग ड्रेसमध्ये असताना पुरुष बघणारच. त्यांनी बघावं म्हणुन मी इथं येत नाही. It is the part of the game !!! पुरुष पाहाणारच. स्वाभाविक गोष्टींवर चिडण्यात अर्थच नसतो. भुंगे जमावेत म्हणुन कमळ फुलत नाही, आणि एखादं कमळ पकडायचं असं ठरवून भुंगे भ्रमण करीत नाहीत. फूलणं हा कमळाचा धर्म, भूलणं हा भुंग्याचा धर्म. जाणकारांनी, रसिकांनी कमळाकडे पाहावं, भुंग्याकड़े पाहावं आणि फुलावं कसं आणि भुलावं कसं हे शिकावं.'

No comments: