आसवे मला त्याचं उत्तर द्यायचीमी वागलोच का असा ,जो तो विचारत होता.आसवे मला त्याचं उत्तर द्यायची,ज्याचा प्रश्न कधी मला पडत नव्हता.सांत्वना दाखवून ती म्हणाली,जे झाले ते छान झाले.तिच्या याच शब्दांनी,परत माझेच तर रान झाले.चुक माझी काय झाली,हाच विचार डोक्यात घुटमळत होता.आसवे मला त्याचं उत्तर द्यायची,ज्याचा प्रश्न कधी मला पडत नव्हता.ऐकले ना काही तिने,व्यथा जरी माझ्या ओरडल्या होत्या.मी गेल्यावर शब्दात माझ्या,लोकांना तिच्याच तर पाऊलखुणा सापडल्या होत्या.पडदा माझ्या नावावर पडला आणि,जो तो तिच्यामागे फिरत होता.आसवे मला त्याचं उत्तर द्यायची,ज्याचा प्रश्न कधी मला पडत नव्हता.
No comments:
Post a Comment