Wednesday, August 13, 2008

तीर्थरूपांस

निरोपाच्या मंद घंटाकधीच्या रुणझुणताहेत कानातपाकुळलेला आनंदी निरोप.....त्याच वेळी उमजलं होतं आतून,आयुष्यावर पसरलेली उबदार मायेची पाखरहळूहळू विरत जाणार आहे म्हणून.......त्यानंतर आपण सगळे झगडलोतुमच्या आजाराशी..लढता लढता थकलातच तुम्ही;तरीही जिंकलात...पण आलीच अखेर ती वेळसुटकेसाठी अधीर तुमचा अशक्त श्वास.......गार कोमट पडत चाललेले तुमचे हात पाय.....विझत थकत चाललेली तुमची गात्र....कुठल्यातरी अनमिक भितीचा कापूस पिंजणारं तुमच विकल मन....घशाबाहेर न उमटणारे तुमचे अर्धेकच्चे शब्द......ते आम्हाला समजले नाहीत कीतुमच्या जीवणीवर पसरणारे बारीक मिष्किल हासू.....तल्लख मेंदूच्या कितीतरी खूणगाठी....सगळं सगळं संपणार आता हळूहळू....विरत गेलेल्या आयुष्याच्या वस्त्रालानाहीच कोणी ठिगळ लावू शकणार....हे सगळं होऊनही उरेलच की कितीतरी अजूनही-------तुमच्या लेकरांच्यात उतरलेल्या तुमच्या अनंत लकबी.......आजकाल दुर्मिळ होणार्‍या मूल्यांवरच्या निष्ठा.......आवडते संगीत;मनापासून ठरवून केलेले वाचन..........स्वत:वर किमान पैसा खर्च करण्याचा हव्यास.......अन्यायाविरूद्ध वळणार्‍या मुठी......पहाडासारखे व्यक्तिमत्व पुढे ठाकल्यावरआपसूक नम्र होणारा माथा.....चांगल्याचे कौतूक आणि चूकांना क्षमा........आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वावलंबनाचा ध्यास....आणि अजूनही कितीतरी ;चवीपरी इत्यादी......तुम्हीतर जिवंतच राहणार अहातआम्ही आहोत, तोपर्यंतम्हणून तर निरोपाच्या मंद रूणझुणार्‍या घंटाबदसूर वाटत नाहीत,या विचारांनी काळीज लक्कन हललंतरीही.........

No comments: