Wednesday, August 13, 2008

एक रंगीत गोड गोळी

काहीतरी भन्नाटसा शोध लावावाको~या कागदावर फक्त उजेड रंगवावाआकाशाला काखोटीला मारूनसरळ सूर्य गाठावाआजकाल असं काही वाटत नाही डॉक्टरमला काय झालंय?आजकाल ऑफिसच्या पार्किंग मधे सावलीत मिळावी जागाएवढंच वाटतं रोजडॉक्टर, मला काय झालंय?मला माणसाळायंच नाहीये डॉक्टर.बघा ना, असेल एखादी गोळी...पांढरी नाही, रंगीत असेलएक गोड गोळी......

No comments: