Wednesday, August 13, 2008

आठवणीने दे

चंद्राने पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे,नभावर लुकलुकनारे तारे मात्र आठवणीने दे
बेधुंद करणारा रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे,जाताना एक मोगा-याची कळी मात्र आठवणीने दे
बेभान कोसळणारा मुक्त पाऊस नाही मागत तुझ्याकडे ,ओल्या मातीचा दरवळणारा सुवास मात्र आठवणीने दे
मुठी एवढे ह्रदय नाही मागत तुझ्याकडे,माझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवणीने दे

No comments: