Wednesday, November 11, 2009

मैत्रीचं हे नातं . ….

मैत्रीचं हे नातं . ….

*मैत्री म्हंटली की आठवतं ते बालपणं आणि मैत्रीतून मिळालेलं ते खरंखुरं शहाणपण*

*कोणी कितीही बोललं तरी कोणाचं काही ऐकायचं नाही कधीही पकडले गेलो तरी मित्रांची नावं सांगायची नाही*
*मैत्रीचं हे नातं सगळ्या नात्यात श्रेष्ठं हे नातं टिकवण्यासाठी नकोत खुप सारे कष्टं
**मैत्रीचा हा धागा रेशमापेक्षाही मऊ सूत मैत्रीच्या कुशीतच शमते मायेची ती सूप्त भूक
**मैत्रीच्या सहवासात श्रम सारे विसरता येतात पण खरे मित्रं मिळवण्यासाठी काहीदा कितीतरी पावसाळे जातात
**मैत्री म्हणजे रखरखत्या उन्हात मायेची सावली सुखाच्या दवात भिजून चिंब चिंब नाहली
**मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे जुन्या आठवणींना उजाळा देऊन गालातल्या गालात हसणारे
**मैत्री पाहत नाही कोण गरीब कोण श्रीमंत ती पाहते फ़क्त मित्राचं अंतरंग
**मैत्री म्हणजे समाधानाने भरलेली ओंजळ वाळवंटात जसं कधी सापडतं मृगजळ
****मैत्रीच्या सहवासात अवघं आयुष्य सफ़ल होतं देवाच्या चरणी पडून जसं फ़ुलांचही निर्माल्य होतं*

No comments: