Monday, July 6, 2009

आपण . . . .



संदिप खरे यांच्या आणखीन कविता वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.
आपण एखाद्यासाठी कोण असतो...
अधराचे शब्द ऐकत
"हा आपला" असे स्वत:लाच समजावत
रात्रभर उराशी बसणारा एखादा जिवलग....?
असं म्हणत-म्हणत डोळ्यातील बाहूल्यांशी
संवाद साधू बघणारे एखादे प्रौढ़ बालक....?

आपण एखाद्यासाठी कितपत असतो ?
एखाद्याच्या इछेभोवती पडलेच आपल्या नकाराचे कुंपण
तर स्मरणात राहतो का "जिवलग" शब्दाचा खोल अर्थ ?
का आपण असतो त्याच्यासाठी गोड गोड गाणारा बंदिस्त पक्षी...
जेव्हा जेव्हा चोच उघडेल तेव्हा तेव्हा मंजूळ आणि मंजूळच आवाज काढणारा ?

आपण एखाद्यासाठी कोण असू...?
पाखरांना पंख फुटतील, दिशा समजतील
आणि कळतील झाड़ सोडून जाण्याच्या आवश्यकता....
आपण असू जागा न सोडू शकणारे झाड़ !!!
भरारीच्या आवेगात पक्षी फिरकलाच कधी परत
तर त्याच्या आठवणीच्या दु:खाचे चोचले पूरवणारे झाड़ !

आपण एखाद्यासाठी कोण होतो....?
भेटलो नसतो असे कोणीतरी...?
आपण एखाद्यासाठी कोण असतो..?
ज्याच्यावाचून अड़त नाही असे आगंतुक सहावे बोट...?
आपण एखाद्यासाठी कोण असू...?
कधी लहर आलीच तर अश्रू पूरवणारे एखादे कारण...?
.........................
..........
आपण खुप करायचो अट्टाहास
पण आपण फार तर फार पाणी होऊ शकतो एखाद्यासाठी....
एखाद्याची तहान होऊ शकत नाही......

No comments: