Sunday, June 14, 2009

ठिगळ लावतोय आभाळालामाझं

ठिगळ लावतोय आभाळालामाझं आभाळच फाटलयंडोळ्यांमधलं पाणी माझ्याफार अगोदरच आटलयंतरीही रडगाणे ते नेहमीचंझिजलेलं आजकाल मी गात नाहीश्वास थांबतायत धावायचे हळुहळुतरी मन मात्र थांबत नाहीअपेक्षा भंगाचं ओझंआता माझ्याने पेलवत नाहीपावसात चालतो नेहमीच आवडीनेकारण मी रडतोय हे कधीच कुणाला कळत नाहीमाझं प्रेत बघुन उद्यातुम्ही नाकाला रुमाल लावालचांगला माणुस होता बिचाराम्हणुन दोन अश्रु ढाळालसरणावर एकदा गेलो मीकी माझ्या आठवणे देखील सरतीलमी गेल्यावर माझ्यापाठी कोणकशाला माझी आठवण देखील काढतील?उद्या त्या खोट्या अश्रुंचेव्याज माझ्या डोक्यावर नकोनिदान वर गेल्यावर् तरी मलाकाही द्यायचे बाकी राहील्याची चिंता नकोउगाच माझी कोणाला काळजी नकोअन माझ्यामुळे तुम्हाला त्रासही नकोही कवीता वाचुन कदाचीततुम्हीदेखील चुकचुकालकाहीतरी वेड्यासारखं लिहीलय ह्यानेअसेच काहीसे पुटपुटालपण ह्यातही जगण्याची एक निराळी अदा आहेमरतामरता जगण्याची एक बेगळीच नशा आहेजगलो तर जगुद्यामेलोच तर मरुद्याआभाळ शिवुन झालंय माझंत्यात निदान पाणी तरी साठु द्याह्या जगातुन जायच्या आधीमला एकदा मनसोक्त रडायचयंअन त्यासाठी कदाचीत मलाअगदी चिंब होउन भिजायचयं

No comments: