Thursday, June 11, 2009

जमलच नाही

जगाकडे बघून जगताना ,असे दिवस , रात्री पळताना .तुझ्याकडे कधी लक्ष द्यायला जमलच नाही गालावरल्या रंगाचा अर्थ...मिठितिल स्पर्शाचा अर्थ....रुसवे फुगव्यातील अर्थ ....डोळ्यातील भावांचा अर्थ ....समजायला वेळच मिळाला नाही .....खरच प्रेम व्यक्त करण कधी जमलच नाही .उभे केले जीने, चालायला शिकवले .....एक घास चिउचा म्हणत बळ बळ भरविले...जेव्हा गरज होती तिला माझी, तेव्हा ......तिच्यासाठी वेळ द्यायला जमलच नाही .....श्वाश म्हणायचा मी ज्यांना ,ज्यांच्यात स्वताला मी शोधायचो .....त्यांच्या साठीच सारे लढने ,स्वताच स्वताला फसवायचो.....त्याना उमलताना पहायला जमलच नाही आज विचार करतोय ,.अखेरचा दिवा मालवताना...भरलेले डोळे पुसताना....आणि जिवंत जळताना ..खरच एकही नाटक आपल्याला जमलच नाही ....धावलो आपण खुप पण,कश्यासाठी तेच कळले नाही....

No comments: