Sunday, June 14, 2009

उत्साह

उत्साह वयात नसतो , असतो तो मनातमनाने रहा उत्साही , येईल सारे हातात ! ..इंद्रधनुची कमान, रंग त्यात सातउधळुनिया रंग , करू सर्वांवर मात..रंग भंगले कां ? उत्साह संपतात !हात सुटला कां ? घेतला जो हातात..रंगात रंगताना, तुझी असो साथमार्ग क्रमणे आहे, घेउन हाती हात..मार्गी कोण आले, गुंतले की कोणात ?खुलली न असता, कलिका सुकतात ? ..मार्गात थांबणे नाही, होई जरी रातमाघार नाही जराही, जरी होय आकांत..माहीत नाही सारे, उगा झुंजतातया मिळून सारे, करूयात रुजुवात..घेऊ शपथ, ना बाहेर काही आंतनिर्धास्त होऊद्या आजची सांजवात..आजच्या दिवशी करूया एक बातप्रेम देऊ, प्रेम घेऊ करू बरसात

No comments: