Wednesday, August 13, 2008

पाउस हा खूळयागत असा का ग वागतो..?

पाउस हा खूळयागत असा का ग वागतो..?मला भेटण्याआधी तुलाच का तो भेटतो.?
कधी तुझ्या स्वप्नी, कधी लेखणिने बरसतोतरी तुझ्यासाठी तो उगाच का ग तरसतो...?
धाडीतो निमंत्रण तयास मीही यायचीपण मलाच पाहुनि तो कुत्सित का हासतो..?
तुला पाहुनि कसा तो सर सर सर कोसळतोमला मात्र नेहमी तो अबोल का ग वाटतो..?
तुझ्या अंगणी जणू तो मोती होऊन सांडतोमाझ्या अंगणात वेडा चिखल होऊन साचतो..!
अशी काय मोहिनी तू टाकलिस त्यावरीअनोळखीच दृष्टीने तो मला न्याहाळतो..!
त्यास ओढ मायेची जी तुझ्यात गवसतेम्हणूनि तो अधीर् होत येउनि तुज बिलगतो..!!
पाउस हा खूळयागत असा का ग वागतो ?मला भेटण्याआधी तुलाच का तो भेटतो..???

No comments: