Wednesday, August 13, 2008

आम्हास वाटले……..आत्ता पाउस पडेल…..!

आम्हास वाटले….......आत्ता पाउस पडेल…..!रखरखत्या उन्हात काले ढग जमले…….पावसात भिजण्यासाठी मग मन रमले…...!अचानक एक वीज चमक्ली……आम्हास वाटले……..आत्ता पाउस पडेल…..!अंगाची लाही लाही होत होती…….मनात भिजण्याची तमन्ना झाली…..कुठून एक सर आली……आम्हास वाटले……..आत्ता पाउस पडेल…..!एक थेम्ब मग वरुन पडला तळहातावर…….ओंजलित घेउन मग त्याच्याकडे पाहू लागलोढग सरला……सूर्य तापलाथेम्ब वाफ होउन उडून गेला…….पुन्हा केंव्हातरी एक ढग येईल……मनास पावसाची चाहुल देईल…….अचानक वीज चमकेल……..आम्हास वाटेल……..आत्ता पाउस पडेल…..!आत्ता पाउस पडेल…..!

No comments: