Thursday, August 14, 2008

कुणास ठाऊक?

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....मी बोलतच नाहीडोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....तिला कळतच नाहीतिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...स्तब्ध होऊनतिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...क्षुब्ध होऊनचंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतंपण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येतमग मी माझी इच्छा फुलावरच भागवतोबुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतोपण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाहीबोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाहीमग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातंसगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातंकाही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाहीमाझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाहीती नाही म्हणेल याची भीती वाटतेती नाही म्हणेल याची भीती वाटतेपण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचंतिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचंकुणास ठाऊक?तिच्याही एखाद्या पुस्तकातमाझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!

No comments: