Thursday, August 14, 2008

मैत्रिणीचं लग्न......

वाटलं आता आयुष्यातलं सगळं काही सरलंआवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलंम्हणाली, चांगल्या नवऱ्यासाठी नवस करायला गेलो होतोचांगला नवराच हवा होता तर आम्ही काय मेलो होतो ?टेंपररी नोकरीमुळे नाही विचारायचा धीर झालानेहमीप्रमाणे नंतर कळलं की आता फार उशीर झालाआता प्रत्येक संध्याकाळी हिचं फक्त नवरा पुराणदुसऱ्या पुरुषाची स्तुती एकून झालो आम्ही पुरते हैराणमग शेवटी एके दिवशी आम्हाला त्याचं दर्शन झालंविचार नुसता करत राहिलो की ह्याच्यात हिने काय पाहिलंएक पर्मनंट नोकरी, लग्नासाठी पुरेशी असू शकते?Security ची एकच भावना सगळ्यात मोठी ठरू शकते?शेवटी accept केलं आम्ही, नशीबाची आहे चालच तिरकीप्रेमासारख्या नाजुक बाबतीत ही दैवाने आमची घेतली फिरकीलग्नानंतर दोन वर्षांनी मग रस्त्यात नवऱ्याबरोबर ती भेटलीहसायलाही पैसे पडतात ह्याची आम्हाला खात्रीच पटलीप्रेमाचं आम्ही विसरून गेलो पण मैत्रीही आता शाबूत नसतेकारण आपल्या काही क्षणांची मैत्रीण,ही अनंतकाळची तिच्या नवऱ्याची पत्नी असते

No comments: