काही असे काही तसे !जगलो असे जमले जसे!लाचार कधी झालो नाही,स्व कधी विकला नाही,हात कधी पसरला नाही ,पडले मनासारखे फासे!जगलो असे जमले जसे!गरिबिची लाज नाही,ऐश्वर्याचा माज नाही,सरळ मार्ग सोडला नाही,टाकले नाही घेतले वसे!जगलो असे जमले जसे!हवेत इमले बांधले नाही,म्रुगजळामागे धावलो नाही,शब्दात कधी सापडलो नाही,झाले नाही कधीच हसे!जगलो असे जमले जसे!भावनेत कधी वाहिलो नाही,वास्तवाला सोडले नाही,विवेकाला तोडले नाही,वागावे लागले जशास तसे!जगलो असे जमले जसे!वावगा हट्ट कधी नाही,तडजोडीला ना नाही,रक्त उगा आटवले नाही,सजवले क्षण छोटे छोटेसे!जगलो असे जमले जसे!काही असे काही तसे!जगलो असे जमले जसे!
No comments:
Post a Comment