Wednesday, August 13, 2008

किती दिवस झाले ना

किती दिवस झाले नामाझे मन धुंदावले नाहीकुठल्या गाण्याने वेडावले नाहीमोगऱ्यानेदेखील गंधाळले नाहीगाणीच चांगली नाहीत अताशामोगराही छान फ़ुलत नाही अताशा
आज मला आठवतीये ती अल्लड तूपोक्तपणाच्या जळमटांमागची हुल्लड तूपावसाच्या सरीने बेभान होणारी तूठेक्यावर थिरकणारी नादान तूक्षितिजाकडे पाहात हरवणारी तूचांदण्या डोळ्यात जागवत निजणारी तू
तेव्हाही तुला विचार होतेचआता त्याची मतं झालीयेततेव्हाही तुझी आवड होतीचआता मात्र तुझी निवड ठरलीयेतुझी रसिकतेची छिद्रं बुजलीयेतदारं बंद करुन घेतलीस गीतं कुजलीयेत
बघ परत एकदा हात पसरुनपाउस देईल तुला तुझं तळंबघ परत एकदा खिडकीत बसूनआभाळ अजून आहे तसंच निळंनव्या जाणीवेने बघ मोगरा हुंगूनखात्री आहे मला तो टाकेल मोहरून
बघ परत एकदा परतूनसापडशील बघ स्वत:लाबघ तर परत एकदा हरवून

No comments: