Wednesday, August 13, 2008

तूझ्या माझ्या गं घरात...!!!

तूझ्या माझ्या गं घरात...!!!आई.....तूझ्या माझ्या गं घरात...त्या आपल्या अंगणात...फुलं प्राजक्ताची सारी...मी गं दंग वेचण्यात ...साद घातलीस मला...गोड तूझ्या आवाजात...आले धावत-पळत...उधळे रांगोळी रंग....परत घाल ना आईतशीच साद गं आज....आंगणी बहरला का...तो पारिजात परत...तूझ्या डोळ्यातले दु:ख...माझ्या पदरात घाल...नको सांडूस आसू...माझ्या नयनी तु हास...

No comments: